Northern lights म्हणजे काय?- कसा होतो आकाशाच्या पडद्यावर प्रकाश शलाकांचा खेळ?
तुम्हाला Aurora माहित आहे का? असं मुंबईकरांना विचारलं तर तुम्ही ‘आरोरा टॉकीज’ बद्दल विचारताय असंच त्यांना वाटेल. अरोरा (Aurora)हे iconic असं Art Deco शैलीत बांधलेलं ,माटुंगा उपनगरातील जुनं व प्रसिद्ध single screen थिएटर आहे. पण Aurora Borealis म्हणजे विशाल आकाशाच्या पडद्यावर दिसणारा निसर्गाचा एक भव्य सिनेमाच म्हणता येईल.या निसर्ग चमत्कारालाच Northern lights म्हणतात.
मागे एकदा भारतात लडाखमध्ये Aurora पाहिल्या गेल्याची बातमी नेटवर ट्रेंड झाली होती. ही बातमी सुप्रसिद्ध अशा NORTHERN LIGHTS बद्दल होती. Aurora Borealis हे याच Northern Lights चे तांत्रिक नाव.
Aurora -ग्रीक पुराणातील देवी

(Above is a Picture of Goddess Aurora from Greek mythology)
मूलत: Aurora हे नाव ग्रीक पुराणातील पहाटेच्या किंवा उष: कालाच्या देवीचे नाव. या देवीच्या नावावरून प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ गॅलिलिओने १६२३ साली आकाशातल्या या प्रकाश शलाकांच्या खेळाचे ‘Aurora’ असे नामकरण केले. पूर्ण नाव Aurora Borealis असे आहे, ज्याचा अर्थ ‘ऊषेचा प्रकाश’ (Light of Dawn) असा होतो. यातील थोडा विरोधाभास असा आहे की, या पहाटेच्या लालिमेसारख्या वाटणाऱ्या प्रकाशाची जादू मात्र पहाटे पेक्षा मध्यरात्री अंधाराच्या पार्श्वभूमीवरच जास्त उठून दिसते. म्हणजे जसा सिनेमा प्रोजेक्शन साठी जसा अंधार आवश्यक असतो तसा Aurora साठी ही अंधार गरजेचा आहे.
हे Aurora Borealis उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांजवळील प्रदेशांतच दिसत असतात. दक्षिण ध्रुवाकडे याचे नाव Aurora Australis असे बदलते.
Northern Lights चा निसर्ग चमत्कार फक्त ध्रूवीय देशांत दिसतो
आकाशात विस्मयकारक अशा भव्य रंगीत प्रकाश शलाकांचे दर्शन अर्थात Northern Lights हे फक्त उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव भागातच प्रामुख्याने दिसतात.
हे जगात कुठे-कुठे दिसतात?
- उत्तर कॅनडा
- नॉर्वे
- स्वीडन
- फिनलंड
- अलास्का
- रशिया
- आइसलँड
या ध्रुवीय प्रदेशाला लागून असलेल्या देशांत Northern Lights चे नेत्रदीपक दर्शन सातत्याने घडत असते.
भारतातील Northern Lights चे दर्शन
North Pole व South Pole व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी Solar Storm ची तीव्रता अधिक असल्यास हे Aurora इतरत्र अति उंच अशा भूभागांवर दर्शन देतात. याच कारणामुळे ११ मे २०२४ रोजी भारतात लडाखच्या ‘हॅन्ले’ भागात, सरस्वती पर्वताच्या वर Aurora पाहण्यात आल्याची अधिकृत नोंद Indian Astronomical Observatory ने केली आहे. नेटवर प्रसारित फोटोवरून आभाळात मध्यरात्री लालिमा पसरलेली दिसते, पण North Pole प्रमाणे प्रकाश शलाकांचा खेळ दिसत नाही. या लालिमेस ‘Aural Red Arch’ असे तांत्रिक नाव आहे.
Northern Lights दिसण्यामागचे वैज्ञानिक कारण
सूर्य हा एक अग्नी तारा आहे.या अतिप्रचंड अग्नी ताऱ्यातून उत्पन्न होणारे वायू ज्याला Solar Wind म्हटले जाते, त्यांचा विस्फोट होऊन हे वायू वादळी रूपात पृथ्वीकडे झेपावतात. ७२ कोटी किमी/तास इतक्या वेगात पृथ्वीचे चुंबकीय कवच भेदत ते इथल्या वातावरणात शिरकाव करतात, याला Coronal Mass Ejection असे म्हटले जाते.
या Solar Wind मधील प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉन्सची पृथ्वीच्या वातावरणातील घटकांना एक प्रकारे धडक बसते (Collision) व या धडकेतून होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेच्या परिणामस्वरूप आसमंतात प्रकाश शलाका फेकल्या जातात, ज्यांना आपण Aurora म्हणून पाहत असतो.
११ मे २०२४ चे Solar Storm
हे गेल्या वीस वर्षांतील सर्वात मोठे सूर्य वादळ होते. याच कारणामुळे त्याचा प्रभाव भारतात लद्दाख मध्येही दिसून आला आहे. अशा प्रकारची Solar Storms किंवा Solar Flares वरचेवर सूर्याच्या पृष्ठभागातून उद्भवत असतात व दर ११ वर्षांच्या आवर्तनानंतर याची तीव्रता वाढलेली दिसते.
Solar Storm चा मानवी जीवनास अपाय?
Solar Storms पासून मानवी जीवनास कुठलाही लक्षणीय असा अपाय झाल्याची नोंद नाही. मात्र, या सूर्य वादळाच्या पृथ्वी कक्षेतील प्रवेशामुळे Satellite Communication विस्कळीत होऊ शकते. गमतीने असे म्हणू शकतो की, समजा ‘आरोरा टॉकीज’ मध्ये जर चित्रपटाचा खेळ सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपित होत असेल, तर प्रक्षेपणात व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही!
एरवी Northern Lights चे आसमंतातील विलोभनीय प्रक्षेपण अनंतापर्यंत सुरू राहणार आहे. हा अनादी अनंत असा चालणारा निसर्गाच महा-सिनेमा आहे जो आकाशाच्या पडद्यावर दिसत रहाणार आहे. तुमच्या bucket list मधे या निसर्ग चमत्काराचीही नोंद करून ठेवा.
आयुष्यात एकदा तरी Northern Lights पाहण्याची तुमची इच्छा आहे का?
Written by: Avinash Bhanu Asha Ghodke (Screen writer)
हे ही वाचा : महाकुंभ एक प्राचीन परंपरा :२०२५ प्रयाग राजचा महाकुंभ- mahakumbh 2025 || Panch kailash yatra आणि तामिळनाडू मधील 6th Velliyangiri Kailash || येशू ख्रिस्त भारतात आले होते का? Did Christ visit India?








सुंदर लेख .. उपयुक्त माहिती.
खूप छान
धन्यवाद 🙂