Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Diwali नरकासूर वध: स्त्री आणि सामाजिक दृष्टिकोन

Diwali नरकासूर वध : स्त्री चा अनादर करणार्या दैत्याचा वध कृष्णाने केला पण स्त्री विषयीचा ‘सामाजिक पूर्वगृह’ मारणारे अस्त्र त्याच्याकडे नव्हते

नरकासूर वध काल्पनिक चित्र
श्रीकृष्णा मागे शक्ती बनून उभी राहिलेली पत्नी सत्त्यभामा

नरकासूराच्या कारागृहा पेक्षा ‘समाजाचे पूर्व-गृह’ या १६००० मुलींना भयावह वाटले होते

श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामेच्या सहाय्यतेने नरकासूराचा वध करून १६ हजार मुलींना कैदेतून मुक्त केले. त्यानंतर त्या मुलींना त्यांच्या माता-पित्यांकडे जाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ती विनंती नाकारली. नरकासूराच्या कारागृहा पेक्षा समाजाचे ‘पूर्व-गृह’ या मुलींना भयावह वाटत होते.  

सत्यभामेच्या सहाय्यते शिवाय कृष्णाकडून नरकासूराचा वध अशक्य होता.

 नरकासूराला कृष्णाने जरी मारले असले तरी पत्नी सत्यभामेच्या सहाय्यते शिवाय ते शक्य नव्हते कारण नरकासूर केवळ स्त्री च्या हातूनच मरू‌ शकतो असे विधी लिखित होते. सत्यभामा व‌ कृष्ण नरकासुराचे‌ पूर्वजन्मी चे माता पिता होते असं पुराण सांगतं.
नरकासूर वध काल्पनिक चित्र
नरकासूर वध – सत्त्यभामा व कृष्ण

नरकासूराची पूर्व जन्मीची आई सत्त्यभामा 

नरकासुर हा एक दैत्य होता जो विष्णू आणि भूदेवीचा पुत्र होता. त्याचे पूर्वजन्मी चे वडील विष्णू आणि आई भूदेवी यांनीच कृष्ण आणि सत्यभामा यांच्या रूपात त्याचा संहार केला होता. 

सिने संदर्भ 

प्रसिद्ध हिंदी चित्रपट Mother India मधे गावातील मुलीला घोड्यावरून पळवून नेणाऱ्या आपल्या डाकू मुलाला त्याची आई रायफल ने गोळी मारून संपवते असं मन हेलावून टाकणारे दृश्य दिग्दर्शक मेहबूब खान यांनी नर्गिस व सुनील दत्त वर चित्रित केले आहे. या दृश्यातील मूळ संकल्पना पुराणातील ‘नरकासूर वध’ कथेशी साधर्म्य सांगते.

दिवाळी तील नरक चतुर्दशी हा महत्त्वाचा पहिला दिवस

दक्षिण भारतात रामाच्या रावण वधा साठी नाही तर कृष्णा च्या नरकासुर वधाची आठवण म्हणून Diwali साजरी होते.

नरकासुराच्या वधामुळे दिवाळीत येणारा हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो . दक्षिणेत यांचे विशेष महत्त्व दिसून येते. 

महाराष्ट्राच्या कोकण भागात पहाटे उटणे लावून अभ्यंगस्नान केल्यानंतर सर्वात आधी नरकासुर वधाचे प्रतीक म्हणून चिरट हे गोल आकाराचे हिरवे फळ टाचेखाली चिरडण्याची प्रथा आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी हा दिवस “हनुमान जयंती” म्हणूनही साजरा केला जातो.

गोव्यातील नरक चतुर्दशी व अक्राळविक्राळ नरकासूर प्रतिमा |Goan Diwali 

गोव्यात दिवाळीच्या काही दिवस आधीच चौका चौकात प्रचंड नरकासूर प्रतीमा साकारलेल्या दिसू लागतात . हे नरकासूर अतीशय  उग्र व भयंकर रूपात असतात. यांची उंची अंदाजे २० फूट किंवा जास्त असू शकते.  प्रत्येक नरकासूर प्रतीमा भव्य व वैशिष्ट्य पुर्ण असते. कलात्मक व नाट्यमय सादरीकरणा बाबत गोव्यातील नरकासुराचे शिल्पकार एका पेक्षा एक सरस असतात असे म्हणावे लागेल.  

दिवाळी मधे नरकचतुर्दशीच्या दिवशी या नरकासूरांचा प्रतिकात्मक असा वध केला जातो व गोव्याची दिवाळी साजरी होते.

Diwali नरकासूर वध: स्त्री आणि सामाजिक दृष्टिकोन
गोव्यातील एक नरकासुर प्रतीमा Pic courtesy Google 

नरकासुराची पुराण कथा:

नरकासूर हा भौम वंशाचा होता. याने प्रागज्योतिष साम्राज्याची स्थापना केली. असमी आख्यायिकांनुसार नरकासुर कामरूप साम्राज्याच्या तिन्ही राजवंशांचा पूर्वज होता.

नरकासुर वधाची कथा एक प्रसिद्ध पुराणकथा आहे, जी सत्ययुगात घडल्याचे मानले जाते. नरकासुर एक अत्यंत पराक्रमी आणि क्रूर राक्षस राजा होता, ज्याने पृथ्वीवर भय निर्माण केले होते. तो भूमिदेव, पृथ्वी देवीचा पुत्र होता, आणि त्याचा जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या राक्षसांच्या वंशात झाला होता

नरकासुर अत्यंत बलाढ्य आणि शक्तिशाली होता. त्याने इंद्रलोकावर हल्ला करून इंद्राची छत्री, ऐरावत हत्ती, आणि दिव्य द्रव्य चोरून नेले. त्याने अनेक देवी-देवतांनाही वेठीस धरले. सर्वांत क्रूर असे कृत्य म्हणजे त्याने हजारो कन्यांना कैदेत ठेवले होते. त्याच्या अत्याचारांमुळे देवता आणि मानव त्रस्त झाले होते आणि मदतीसाठी भगवान श्रीकृष्णाकडे गेले.

श्रीकृष्णाचा निर्णय:

देवतांच्या विनंतीला मान देत, श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले. नरकासुराला मारण्यासाठी श्रीकृष्णाने सत्यभामा, त्यांची पत्नी, हिला बरोबर घेतले. कारण असे विधी लिखित होते की नरकासुराला फक्त एक स्त्रीच ठार मारू शकते.

नरकासुर वधाचा वृतांत:

श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर आरूढ होऊन नरकासुराच्या नगरीवर गेले. नरकासुराने आपल्या सैन्यासह त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक राक्षस योद्धे श्रीकृष्णाशी युद्धात पडले. अखेर, श्रीकृष्णाने नरकासुरावर हल्ला चढवला, पण सत्यभामा हिच्या साहाय्याने नरकासुराला ठार केले. नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेत असलेल्या १६००० कन्यांना मुक्त करण्यात आले.

नरकासूराच्या कारागृहा पेक्षा ‘समाजाचे पूर्व-गृह’ या १६००० मुलींना भयावह वाटले

श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामेच्या सहाय्यतेने नरकासूराचा वध करून १६ हजार मुलींना कैदेतून मुक्त केले. त्यानंतर त्या मुलींना त्यांच्या माता-पित्यांकडे जाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ती विनंती नाकारली. नरकासूराच्या कारागृहा पेक्षा समाजाचे ‘पूर्व-गृह’ या मुलींना भयावह वाटत होते. 

पुराण कथे मधील तार्किकता

नरकासूराच्या कैदेत राहिल्या नंतर आपल्यावर अपवित्रतेचा किंवा शीलहरणा चा संशय घेवून आपल्याला कुटुंब व समाज स्वीकारणार नाही असे म्हणने या मुलींनी कृष्णा कडे मांडले व स्वगृही परतण्यास नकार दिला. केवळ या मुलींचा समाजातला मान कायम ठेवण्यासाठी कृष्णाने या १६००० मुलींशी सांकेतिक वा औपचारिक विवाह करून त्यांना अभय दिले अशी या कथेची तार्कीकता ही सांगीतली जाते

दिवाळी : पृथ्वी वर सत्त्य प्रस्थापनेचा सोहळा Diwali

उत्तर भारतात रामाकडून रावण वध व दक्षिण भारतात कृष्णा कडून नरकासूर वध अश्या वेगवेगळ्या विजयकथांची मान्यता ठेवून‌ Diwali साजरी करण्यात येत असली तरी. असत्त्यावर सत्त्याचा विजय हे  सूत्र दिवाळी सणाचे मुख्य सूत्र व मर्म आहे. 

हे ही वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment