Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

पुण्यातील किवळे रावेत मधे जितेंद्र यांचे Weekend Home: आलिशान फ्लॅटचे आतले फोटो पहा

बॉलिवूड स्टार जीतेन्द्र यांचे पुण्यातील ‘The Vibes टॉवर’ मधील ; २३ व्या मजल्यावरील आलिशान ‘सेकंड होम’चे Inside Photos आणि डिटेल्स!

Jeetendra Pune home- बॉलिवूडचे सेलिब्रिटी weekend home साठी नेहमीच शांत आणि निसर्गरम्य जागेच्या शोधात असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते जीतेन्द्र (Jeetendra) आणि त्यांच्या कुटुंबाने (एकता कपूर आणि तुषार कपूर) आपल्या या ‘वीकेंड गेटवे’साठी पुणे PCMC शहराची निवड केली आहे. गिरगावकर असलेल्या जीतेन्द्र यांचे पुण्याकडे येणे स्वाभाविक वाटते.

२० वर्षांपूर्वी घेतली होती पुण्यात जमीन

अभिनेते जीतेन्द्र आपल्या व्यावसायिकते साठीही परिचित आहेत. पुण्याच्या किवळे (Kiwale – Ravet) भागात जीतेंद्र यांनी २० वर्षांपूर्वी जमीन विकत घेतली होती असे कळते. आज किवळे – रावेत भागातील या जमीनीपासून मुंबई पुणे Express Way जातो.

मागील वर्षीच जीतेंद्र यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली. त्यांच्या नव्या बांधकाम कंपनीने PCMC च्या प्रसिद्ध JK builders सोबत भागीदारीत किवळे -रावेत भागात The Vibes Tower बांधला आहे याच Luxurious Tower च्या 23 वा मजल्यावर जीतेंद्र यांचे स्वतःचे weekend Gateway home आहे.

१४५ कोटी रुपयांचा संपूर्ण रेसिडेन्शियल टॉवर

The Vibes Tower against the setting Sun Landscape

कपूर फॅमिलीने गुंतवणूक केलेल्या या भव्य इमारतीचे नाव ‘दी व्हाईब्स टॉवर’ (The Vibes Tower) आहे. १४५ कोटी रुपये एवढा खर्च हा टॉवर बांधण्यासाठी आला आहे असे वृत्त आहे. हा टॉवर पुण्यातील वेगाने विकसित होणाऱ्या आणि निसर्गरम्य अशा किवळे-रावेत परिसरात आहे. Jeetendra Pune home याच luxurious Vibes Tower मधे आहे.


जीतेन्द्र यांचा आलिशान फ्लॅट – व्यावसायिक तपशील

क्षेत्रफळ (Carpet Area):

५,००० स्क्वेअर फूट

किंमत:

सुमारे ६.५ कोटी रुपये

(फक्त एका मजल्यावरील घराची किंमत).

सुरक्षा आणि गोपनीयता:

संपूर्ण मजला त्यांचाच असल्याने त्यांना इथे पूर्ण प्रायव्हसी मिळते.


सुखसोई व अंतर्गत सजावट

प्रायव्हेट लिफ्ट व लिफ्ट लॉबी

फ्लॅटमध्ये थेट प्रवेश करण्यासाठी एक खास प्रायव्हेट लिफ्ट लॉबी (Private Lift Lobby) डिझाइन केली आहे, जी सोनेरी (Gold), काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या थीमध्ये सजवली आहे.

Private lift lobby with black,Gold and white colour theme

Living Room – ओपन प्लॅन लेआउट:

घराच्या भव्य दिवाणखान्यातच (Living Room), डायनिंग एरिया आणि बार हे section without Partitions समाविष्ट केले आहेत. यामुळे Living Room अतिशय प्रशस्त आणि भव्य वाटते.

Open Plan Layout Interior of a living room with Dining area , Sitting area and Bar are placed in one huge elegant Living room without any separating walls

किचन:

मॉडर्न किचनमध्ये मध्यभागी एक मोठा आयलँड कुकिंग स्टेशन (Central Island) आहे. स्वयंपाकघरातूनही डोंगरांचे विहंगम दृश्य दिसते.

Kitchen interior with Iland platform an wall to floor sliding glass wall

प्रत्येकाच्या आवडीनुसार डिझाइन केलेली एकूण ५ बेडरूम्स या घरात आहेत

Jeetendra Pune home मधील जीतेन्द्र यांची बेडरूम

जीतेन्द्र यांच्या बेडरूम मध्ये एक खास गोलाकार बेड (Circular Bed) डिझाइन करण्यात आला आहे, जो बेडरूम ला रॉयल लूक देतो. सोबतच एक प्रायव्हेट व्हॅनिटी एरिया आणि बाहेरील व्ह्यू देणारी बाल्कनी आहे.

Rounded bed in Jitedra's Bedroom with green accent wall behind

(फोटो – सौजन्य – Snehil Real estate -Youtube)


एकता कपूरची बेडरूम:

एकता कपूर ही जीतेन्द्र यांची मुलगी आणि प्रसिद्ध बालाजी टेलीफिल्म्स ची निर्माती आज खर्या अर्थाने कपूर कुटुंबाची प्रमुख आहे. यामुळेच या घरातील एकताची बेडरूम सर्वात मोठी आहे, जी पेस्टल कलर्स आणि भव्य झुंबरांनी (Chandelier) सजवली आहे.

Screen shot of a bedroom interior of a flat in The Vibes Tower.

तुषार कपूर यांची बेडरूम

तुषार कपूर यांच्या बेडरूम च्या दोंन भिंती पूर्णपणे काचेच्या आहेत जिथून निसर्गरम्य परिसराचा Panoramic view दिसतो

As per the youtube video this bedroom in Vibes Tower flat belongs to Tushar Kapoor; Jeetendra's Son

फोटो – सौजन्य – Snehil Real estate -Youtube)

स्टाफ क्वार्टर: घरगुती मदतनीसांसाठी बाल्कनीसह एक स्वतंत्र खोली आणि सुका बाल्कनी (Dry Balcony) एरिया देखील जोडला गेला आहे.

@snehil_realestate या Insta account वर Jitendra यांच्या luxurious apartment चे चित्रण आपण पाहू शकता

जीतेंद्र यांना गिरगावच्या चाळीतील घराची आजही आठवण

८५ वर्षांचे जीतेन्द्र आजही आपल्या गिरगावच्या चाळीतील घराची आठवण काढून भावूक होतात. दक्षिण मुंबई मधील गिरगावात मराठी वातावरणात वाढल्यामुळे त्यांना मराठी संस्कृती बद्दल प्रेम आहे. चित्रपती V शांताराम यांच्या तालमीत तयार झालेला हा पंजाबी स्टार अस्खलित मराठी बोलतो भारतभर जीतेन्द्र यांची अनेक घरं असावीत पण २० वर्षांपूर्वी पुण्यात जागा घेवून आज तिथे घर बांधणे ही कृती त्यांच्या मराठीपणाची एक साक्षच आहे.

Jeetendra Pune home at Vibes Tower : Location :

​पत्ता: Vibes Tower , किवळे रोड, रावेत-किवळे जवळ, पिंपरी-चिंचवड, पुणे – ४१२१०१.
​अक्षांश-रेखांश (Google Map Coordinates): १८.६४६७° N, ७३.७४३४° E

हे ही वाचा:

➡️ मुंबई,वरळी येथे 703 कोटींचा फ्लॅट विकत घेणार्या Leena Gandhi Tewari कोण आहेत?

➡️पुणे PCMC मध्ये 7 Wonders Park- आयफेल टॉवर पासून ताजमहाल पर्यंत सर्व जागतिक आश्चर्ये इथे आहेत – महाराष्ट्रातील एकमेव थीम पार्क पाहिलेत का ?

➡️कसबा मेट्रो स्थानका वरून पुण्याचे मानाचे ५ गणपती अगदी जवळ आहेत- चालत इतर ही महत्वाच्या गणपतींचे दर्शन घेवू शकाल

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment