
Bath Toyes discovered sea routes : पॅसिफिक महासागरात जहाजाच्या अपघातानंतर कंटेनर मधून पडलेल्या या खेळण्यांमध्ये बहुसंख्य प्लास्टिकची पिवळी बदकं होती .या खेळण्यांत लाल बीव्हर, निळी कासवे, आणि हिरव्या बेडकांचा समावेशही होता. समुद्रात दूरवर वाहणार्या या खेळण्यांनी महासागरातील प्रवाहांवर आधारित संशोधनात ‘अपघाताने’ पण महत्त्वपूर्ण अशी माहिती पुरवली.
Friendly floatees Spill अर्थात Bath Toys चा प्रवास
पाश्चात्य देशांत बाथ टब मधल्या उबदार पाण्यात निवांत झोपून आंघोळ करण्याची प्रथा आहे. यावेळी टब मधल्या पाण्यात प्लास्टिक ची तरंगणारी छोटी खेळणी शोभेसाठी व त्याचबरोबर करमणूक म्हणून सोडण्यात येतात. विशेषत: लहान मुलांना टब मधे आंघोळ घालताना ही खेळणी पाण्यात सोडली जातात. प्रसिद्ध विनोदी सिरियल Mr Bean मधे मुख्य विनोदी पात्र Mr Bean जेंव्हा टब मधे आंघोळ करतात तेंव्हा ते अशा खेळण्यांशी खेळतानाचे दृश्य आपण पाहिलेच असेल. या Bath Toys चे उत्पादन चीन,हॉंगकॉंग मधे मोठ्या प्रमाणात होते व इथूनच हा माल जहाजाने पाश्चात्य देशांत पाठवला जातो.
Hong Kong ते अमेरिका Sea Route वर वादळात सापडले होते जहाज

10 जानेवारी 1992 सालची ही घटना अतीशय रंजक आहे . “Ever Laurel” नावाच्या कार्गो जहाजावरून अपघाताने असंख्य प्लास्टिक Bath Toys ज्यांना “Friendly Floatees” म्हणतात, समुद्रात पडले. “Ever Laurel” जहाज हाँगकाँगहून टॅकोमा, वॉशिंग्टनकडे जात असताना उत्तर पॅसिफिक महासागरात वादळात सापडले होते. या वादळात 12 कंटेनर समुद्रात पडले, त्यापैकी एका कंटेनरमध्ये 28,800 Plastic Bath Toys होते. या खेळण्यांचे पॅकेजिंग समुद्राच्या पाण्यात विरघळल्याने ती खेळणी समुद्रात वाहू लागली. या खेळण्यांना छिद्र नसल्यामुळे ती पाण्यात फुग्याप्रमाणे तरंगत राहिली. ती बुडाली नाहीत व 17000 किलोमीटर लांब अंतरापर्यंत तरंगत ही खेळणी महिनोन्महिने प्रवास करत राहिली.(Friendly Floatees Spill)
महासागर प्रवाहांचे संशोधन
सिएटल येथील समुद्रशास्त्रज्ञ कर्टिस एब्बेसमेयर आणि जेम्स इंग्राहॅम यांनी या खेळण्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊन महासागर प्रवाहांचे मॉडेलिंग केले. या घटनेने त्यांना महासागर प्रवाहांचे अधिक अचूक मॉडेल तयार करण्यास मदत केली. महासागरांमधील प्रवास करणार्या जहाजांना अशा प्रकारच्या प्रवाहांच्या माहिती मुळे प्रवास आखणीस मदत होते. तसेच धोक्याचे मार्ग टाळून जलद गतीने गंतव्य गाठणे ही यामुळे शक्य होते
17000 मैलां हून अधिक अंतर पार
या खेळण्यांनी महिनोन्महिने वाहत 17,000 मैलांहून अधिक अंतर पार केले,यातली काही खेळणी आर्क्टिक च्या बर्फात अडकली. आश्चर्यकारक गोष्ट ही की काही खेळणी (Bath Toys)तब्बल 15 वर्षांनंतर म्हणजे 2007 मध्ये ब्रिटन आणि आयर्लंडच्या किनाऱ्यावर पोहोचलेली सापडली.
समुद्र प्रदूषण समस्या जगापुढे
या घटनेने समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधले. ज्यावेळी या प्लास्टिक खेळण्यांच्या हजारो कि मी प्रवासाची चर्चा होवू लागली त्यावेळी अशाप्रकारे समुद्रात कचरा म्हणून टाकुन दिलेले प्लास्टिक ही असेच महिनोन्महिने समुद्राच्या पाण्यावर तरंगत असेल व समुद्र प्रदूषित करत असेल ही बाब प्रकर्षाने लोकांच्या व पर्यावरण कार्यकर्त्यांंच्या लक्षात आली. एक प्रकारे या घटनेने समुद्र प्रदुषणाबद्दलही लोकांना जागृत केले
Bath Toys च्या या विस्मयकारक घटनेवर आधारित “Moby-Duck” नावाचे पुस्तक डोनोव्हन होन यांनी लिहिले आहे, ज्यात या खेळण्यांच्या प्रवासाची आणि त्याच्या परिणामांची सविस्तर माहिती दिली गेली आहे.

निष्कर्ष
ही अद्भुत घटना “Friendly Floatees spill” म्हणून ओळखली जाते . सदर घटना ही केवळ एक अपघात नव्हती, तर ती महासागर प्रवाहांचे संशोधन आणि समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येची जाणीव करून देणारी एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. या प्लास्टिक Bath Toys खेळण्यांच्या सागरी प्रवासाने वैज्ञानिकांना महासागर प्रवाहांचे अधिक चांगले मॉडेल तयार करण्यास मदत केली, तसेच समुद्रातील प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येची गंभीरता देखील त्यांनी अधोरेखित केली.
FAQ
१९९२ च्या या घटनेच्या काळात जहाजांवर कोणती Navigation techniques वापरली जात होती?
त्या काळात सध्यासारखी प्रगत उपग्रह प्रणाली विकसित नव्हती. उपग्रह आधारित नेव्हिगेशनची तेंव्हा सुरूवातच झाली होती. जहाजे जिओग्राफिकल पोझिशनसाठी तेव्हा ‘ओमेगा’ (OMEGA) किंवा ‘ट्रान्झिट’ (TRANSIT) या सुरुवातीच्या उपग्रह नेव्हिगेशन प्रणालींवर, तसेच पारंपरिक खगोलशास्त्रीय नेव्हिगेशन (Celestial Navigation) आणि रडार यंत्रणेवर अवलंबून होती.
आधुनिक सागरी प्रवासात आणि कंटेनर वाहतुकीत Navigation च्या तंत्रात काय बदल झाला आहे?
आजच्या काळात जीपीएस (GPS), ग्लोबल नॅव्हिगॅशन उपग्रह प्रणाली (GNSS), ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS) आणि रिअल-टाइम हवामान रडार ट्रॅकिंग यांचा वापर केला जातो. यामुळे वादळाचा आधीच अंदाज घेऊन जहाजांचे मार्ग बदलणे आणि समुद्रात पडलेल्या मालाचे किंवा कंटेनर्सचे लोकेशन अचूकपणे ट्रॅक करणे शक्य होते.
Ever Laurel जहाजाच्या घटनेमुळे हवामानशास्त्रज्ञ आणि समुद्री प्रवाह अभ्यासकांना (Oceanographers) काय फायदा झाला?
हजारो प्लॅस्टिकच्या खेळण्यांच्या समुद्रात विखुरण्यामुळे शास्त्रज्ञांना महासागराच्या पृष्ठभागावरील प्रवाहांची ‘गती’ (Ocean Current Speeds) आणि ‘दिशा’ अचूकपणे मोजण्यास मोठी मदत मिळाली. या खेळण्यांच्या मार्गावरूनच त्यांनी ‘उत्तर पॅसिफिक महासागरातील’ प्रवाहांचे एक अचूक जागतिक मॉडेल तयार केले.
हे ही वाचा :
भोपाळ चे वकील आहेत फ्रांसचे राजा-Nepoleon 4-French king in Bhopal
Fig tree and it’s significance in religion: अंजीर झाडाचे धार्मिक महत्त्व

