2024 साली महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा आठच महिन्यांत कोसळला. प्रशासनाने तातडीने नव्या पुतळ्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना दिले होते व ते त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले. या नवीन पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. (Tallest statue of Shivaji Maharaj )

जुना पुतळा पडला होता
2024 मधै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 35 फूट उंच पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते पण पुढील आठच महिन्यांत म्हणजे August 2024 मधे हा पुतळा ऐन पावसाळ्यात कोसळला होता.या घटनेनंतर नवीन पुतळ्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना दिल्यानंतर त्यांनी ते जलद गतीने पूर्ण केले व 11 मे 2025 रोजी या नवीन पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपतींच्या नवीन पुतळ्याचे तपशील
- उंची आणि रचना
- पुतळ्याची एकूण उंची ९१ फूट आहे, ज्यामध्ये १० फूट उंच पेडेस्टल समाविष्ट आहे. हा देशातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा आहे.
- शिवाजी महाराजांच्या हातातील उंचावलेली तलवार १५ फूट लांबीची आहे.
- पुतळा कांस्य धातूपासून बनवला आहे आणि त्याच्या आत स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क वापरले आहे, जे गंजरोधक आहे.
- टिकाऊपणा
- पुतळ्याची रचना अशा पद्धतीने केली आहे की तो कोकणातील जोरदार वादळे, चक्रीवादळे आणि सोसाट्याच्या वाऱ्याला देखील तग धरू शकेल. हा पुतळा पुढील किमान १०० वर्षे कुठल्याही प्रकारच्या हवामानात टिकुन राहील एवढा मजबूत बनवला गेला आहे.
- यासाठी आयआयटीचे अभियंते आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे शिल्पकार यांच्या संयुक्त अशा कलात्मक व तांत्रिक योगदानाचे या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
- उजव्या हातातली तलवार उंचावून छत्रपती शिवाजी महाराज समुद्राकडे आवेशात पहात आहेत अशी नाट्यमय व प्रेरणादायी प्रतिमा या शिल्पातून साकारली आहे.
मागील पुतळ्याची दुर्दैवी घटना आणि नवीन उभारणी
- २०२४ मध्ये राजकोट किल्ल्यावरील मागील पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळला होता, ज्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
- त्यानंतर सरकारने २४.७२ कोटी रुपयांच्या खर्चात नवीन पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आणि प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले. शिल्पकार राम सुतार यांनीच गुजरात मधील अतीभव्य असे वल्लभभाई पटेल यांचे शिल्प साकारले आहे.
शिवरायांच्या आरमार सामर्थ्याचे प्रतीक
राजकोट किल्ला आणि त्याच्या अगदी समोर समुद्रात असलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला हा परिसर मराठा नौदलाचे मुख्य तळ होते. राजकोट किल्ल्याच्या संरक्षणाखाली मालवणच्या खाडीत मराठ्यांची युद्धनौका बांधणीची मोठी गोदी (Shipyard) कार्यरत होती. येथे गुराब, गलबत, तारंडी आणि पाल यांसारखी लढाऊ जहाजे तयार केली जात. शत्रूच्या (पोर्तुगीज किंवा इंग्रज) जहाजांनी या गोदीवर हल्ला करू नये म्हणून राजकोट किल्ल्यावरून समुद्रावर कडक पहारा ठेवला जात असे. मराठा साम्राज्याची ही ऐतिहासिक तथ्ये पाहता. राजकोट किल्ल्यावरील हा शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे त्यांच्या आरमार सामर्थ्याचे प्रतीकच आहे. राजकोट किल्ल्यावरून आवेशात तलवार उंचावून समुद्राकडे पाहणारा शिवाजी महाराजांचा पुतळा हा जाज्वल्य राष्ट्रवादाचे प्रतीक होवून उभा आहे
भारतीय नौदलाचीही मानवंदना
छत्रपती शिवरायांच्या याच आरमारी वारशाचा आदर करण्यासाठी भारतीय नौदलाने पुढाकार घेऊन राजकोट किल्ल्यावर पहिला शिवपुतळा उभारला होता हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गे येणाऱ्या आक्रमकांना थोपविण्यासाठी नौदलाचे महत्त्व ओळखले होते . महाराजांच्या याच विचारांना अनुसरून शिवकालीन आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिले आहे: “ज्यांचे आरमार त्याचा समुद्र“
शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याचे प्रतीक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील हा नवीन पुतळा केवळ एक स्मारक नसून, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे ते प्रतीक आहे. विशेषत: शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याचे प्रतीक म्हणून या पुतळ्याकडे पाहता येईल व व येणाऱ्या पिढ्यांना शिवाजी महाराजांचा हा पुतळा (Tallest statue of Shivaji Maharaj) राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहील हे निश्चित
पर्यायी मार्ग आणि वाहतूक·
- रेल्वे – जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन कुडाळ किंवा सावंतवाडी आहे. स्टेशनवरून मालवणसाठी बस किंवा टॅक्सीने सुमारे 1-1.5 तास लागतात.
- विमानतळ– जवळचा विमानतळ सिंधुदुर्ग (कुडाळ) आहे, परंतु तेथून उड्डाणे मर्यादित आहेत. पर्याय म्हणून गोवा (दाबोळी/ दाभोलिम) विमानतळाचा विचार करू शकता, तेथून मालवणपर्यंत टॅक्सीने सुमारे 2.5 तास लागतात.
- बस : मालवण एसटी स्टँड वरून स्थानिक बसने “वडचा पार” जवळ उतरा, तेथून 10 मिनिटे चालत किल्ल्यावर पोहोचता येते . किंवा मालवण जेटीपासून किनाऱ्याकिनारी सुमारे 1 किलोमीटर उत्तरेकडे चालत जाता येते .· स्वयंचलित वाहन: मालवण शहरातून किल्ल्यापर्यंत सुमारे 2.7 किलोमीटर अंतर आहे, कार किंवा टॅक्सीने सुमारे 10 मिनिटे लागतात .
- टीप : स्वतःचे वाहन असल्यास: मालवण शहरातून किल्ल्यापर्यंत सुमारे 2.7 किलोमीटर अंतर आहे, कार किंवा टॅक्सीने सुमारे 10 मिनिटे लागतात .
जवळपासची इतर पर्यटन स्थळे
सिंधुदुर्ग किल्ला:
मालवणचे सर्वात प्रसिद्ध जलदुर्ग, बोटीने जावे लागते, शिवाजी महाराजांचे मंदिर आणि तलवार पाहू शकता .
रॉक गार्डन:
राजकोट किल्ल्याच्या अगदी जवळ, अरबी समुद्राच्या लाटा खडकांवर आदळण्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी आणि Selfi छायाचित्रे काढण्यासाठी योग्य .
गणेश मंदिर:
किल्ल्याकडे जाण्याच्या वाटेवर, सोनेरी गणेश मूर्ती प्रसिद्ध आहे .
तारकर्ली बीच:
मालवणजवळील प्रसिद्ध किनारा, सूर्यास्त पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी योग्य.
सहसा पर्यटक सिंधुदुर्ग या जलदुर्गास भेट देतात. तुम्हीही हा जलदुर्ग पाहण्यासाठी गेलात तर आवर्जून जवळील राजकोट कील्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याला ही भेट द्या.
हे ही वाचा
Priyanka Chopra चा मराठी संवादांसाठी होता हट्ट- AGNEEPATH 2 – BTS
गायक संंजू राठोड- हिंदित अपयशी मराठीत मात्र Hit- आईच्या सल्ल्याने मिळाले यश – म्हणाली होती..
Charlie Chaplin यांना आवडला होता हा मराठी चित्रपट – म्हणाले होते It has a soul !..
The Great Maratha Mahadji Shinde यांचे जन्मगाव कोणते? श्रीगोंदा, जामगाव की कण्हेर खेड..
चिमाजी अप्पा : वसई किल्ल्यावर क्रांतीचा घंटानाद आणि शांतीचा घंटारव

