Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

मुला मुलींचा दोस्ताना …

                    
मैत्री …जगातील सर्वात पवित्र नातं
म्हटलं जातं..कारण मैत्री मध्ये अपेक्षा नसतात.


 जीजस ख्राईस्ट ने बायबल
मध्ये आपल्या भक्तांना आपले मित्र म्हटले आहे. माझे हेतू ,माझे विचार ,
माझी कार्यपद्धती सर्व काही तुम्हाला स्पष्ट माहीत असावे .कारण मैत्रीच्या
नात्यात पारदर्शकता महत्वाची असते. अन्यथा मैत्रीचे नाते प्रस्थापित होऊ 
शकत नाही . हिंदू पुराणातील कृष्ण सुदामाची गोष्ट प्रसिद्ध आहे प्रत्यक्ष
भगवान आणि त्याचा गरीब  बालमित्र सुदामा यांची ती गोष्ट. पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतीय
समाज मनाने मैत्री च्या भावनेस  विशेष महत्व दिल्याचे जाणवते . हाच धागा
पकडून ७०-८० च्या दशकात जीवाला जीव देणाऱ्या दोन मित्रांच्या कथा सांगणारे
अनेक चित्रपट गाजले. एक मेकांचा आधार घेत पुढे जाण्याचा तो काळ होता.सिनेमा
वाल्यांनी समाज मनाची ती भावना ‘cash’ केली. काही सिनेमे कलात्मक
दृष्ट्या अतिशय उच् दर्जाचे होते . उदाहरणार्थ  ‘शोले’ ; …दोन मित्रांची कथा सांगणारा हा
सिनेमा भारतीय सिने इतिहासातला मैलाचा दगडच.पण शोले च्या  हि आधी राजेश
खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे मैत्र-भावनेवर आधारित दोन सिनेमे  ‘नमक-हराम’ आणि  ‘आनंद ‘ आज हि
आपल्याला आठवतात    मैत्र भावावर आधारित सिनेमे आजही बनतात  पण आता दोन मित्रांऐवजी मित्रांच्या ग्रुप ची कथा मांडली जाते. जसा
समाज बदलतो तशी त्याची सिनेमातली प्रतिबिंबे हि बदलतात.’मेल -बॉन्डीग’ वर आधारित 
पूर्वीचा दोस्ताना चित्रपट यश जोहर जींनी निर्मित केला होता पण त्याच
नावाचा …पण मैत्रीच्या ‘वेगळेच’ रंग दाखवणारा नवा ‘दोस्ताना’ चित्रपट
यशजींच्या मुलाने ,करण जोहर ने निर्मित केला.’गे रिलेशनशिप ‘वर भाष्य
करणारा हा चित्रपट हि लोकांच्या पसंतीस उतरला. नवा दोस्ताना  हा  हि
बदलत्या समाज मनाचे प्रतिबिंबच आहे .
                                अजूनही स्त्री आणि पुरुष याच्यातील
निरपेक्ष निखळ मैत्री ची कथा सांगणारे  चित्रपट अभावानेच येतात. “छुरी और खर्बुजे में दोस्ती कैसे हो सकती है” अशी शंका आज हि समाज मनात आहे. स्त्री आणि पुरुषा मध्ये मैत्री
आजच्या आधुनिक समाजाल वर्ज्य नाही पण हे नातं सिनेमाचा विषय होण्याइतपत गडद
आणि गहिरं होत नाही . अशा निखळ मैत्रीच्या नात्यात हि स्त्री ला स्वतहाला
पूर्ण झोकून देता येत नाही. इथे स्त्री च्या बाजूने समर्पणाचा भाव पूर्णपणे
प्रतिबंधित ठेवावां लागतो. ही मैत्री स्त्री ला बेताने आणि हातचं राखूनच
करावी लागते. छुरी आपल्याला लागणार याची  फार काळजी तिला घ्यावी लागते.
छुरी टरबुजा पासून लांबच आहे हे समाजाला ठळकपणाने जाणवून द्याव लागत. या
साऱ्या मानसिक आट्या-पिट्यातून  जेवढी भावनिक उर्जा शिल्लक रहाते
तेवढ्यात ती जमेल तशी थोडी फार मैत्री करते.  जीवाला जीव देणारी मैत्रीण ती
अभावानेच होते. पण तरीही मुला मुलींची मैत्री होते. अशी निखळ मैत्री असू शकते
यावर मुलांपेक्षा मुलींचा विश्वास जास्त असतो.मैत्रीला जागल्या नाहीत तरी 
त्यांच्या या  विश्वासाला त्या पुरेपूर जागतात.या नात्यात शरीर संबंध असावा कि नाही हा आजच्या काळाचा एक वेगळा असा चर्चेचा विषय आहे त्याचा उहा-पोह इथे  होऊ शकत नाही . नव्या सामाजात नव्या नात्यांच्या संकल्पना रुजू पहात आहेत. विशिष्ट परिस्थितींमध्ये त्यांच समर्थन हि होऊ शकत…” लेकिन खर्बुजे कि इच्छा बगैर छुरी उसे छू भी नही  सकती” . मुली मुलांबरोबर  बिंधास्त दोस्ताना करतात ..त्यांच्यात वावरताना
त्यांच्याच स्टाईल मधे “अबे – तुबे ” म्हणत बोलतात ..आणि  एखादा मित्र अनवधानाने अथवा जाणून बुजून  मर्यादा ओलांडतोय असं दिसताच त्याला त्यांच्याच स्टाईल मधे ” ओये !!!!!……!!” असं म्हणून सावध ही करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment