Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

डोनाल्ड ट्रंप यांचा भारताविरुद्ध एवढा थयथयाट का? खरे कारण भारताची रशियन तेल खरेदी नाही

Donald Trump यांनी भारत-पाकिस्तान युद्धा संबंधी केलेला एक दावा भारताने अमान्य केला व त्यामूळे ट्रंप हे शांततेत च्या Nobel Prize पासून वंचित राहिले असे त्यांना वाटते.

डोनाल्ड ट्रंप यांचा भारतावर वैयक्तिक राग?

२०२५ मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% आयात शुल्क लादले…या मागे भारतावर असलेला त्यांचा वैयक्तिक राग आहे असे आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे.

Unpredictable किंवा हेकेखोर असे बिरूद ट्रंप यांना खुद्द अमेरिकन मीडियानेच दिले आहे. Trump यांची कार्यपध्दती आत्मकेंद्री व वैयक्तिक पूर्वग्रहांनी प्रेरित आहे असे म्हटले जाते व तसा ठळक पुरावा त्यांच्या राजकीय निर्णयावरून मिळतो. Trump हे एकाधिकारशहा असल्यासारखे वागतात असा समज एकूणच जागतिक राजकारणात सध्या रूढ झाला आहे.

भारताविरुद्ध हा राग निर्माण झाल्याचे मुख्य कारण

२०२५ च्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी ट्रंप यांनी भारत व पाकिस्तान मधे मध्यस्थी केली व त्यामुळेच हे युद्ध झाले नाही असा दावा Donlald Trump यांनी केला.भारताने मात्र डोनाल्ड ट्रंप यांचा हा दावा अमान्य केला होता. त्यामुळे ट्रंप यांच्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या आशेला धक्का लागला आणि त्यामुळेच त्यांनी भारतावर राग धरला , असे अनेक अमेरिकन वृत्तविश्लेषक आणि विशेषज्ञ मानतात .

भारताने संघर्षाचे निराकरण वाटाघाटीने झाले असे म्हटले

२०२५ च्या मध्यात भारत-पाकिस्तान दरम्यान काश्मीरमध्ये संघर्ष सुरू झाला. या संघर्षादरम्यान, ट्रंप यांनी जाहीररीत्या मध्यस्थीचा दावा केला आणि सांगितले की त्यांच्या “वैयक्तिक हस्तक्षेपामुळे” युद्ध थांबले .भारत सरकारने डोनाल्ड ट्रंप यांच्या या दाव्याला स्पष्टपणे अमान्य केले आणि स्पष्ट केले की या संघर्षाचे निराकरण फक्त भारत आणि पाकिस्तान दरम्यान थेट वाटाघाटीतून झाले आहे आणि त्यामागे अमेरिकेची कुठली ही मध्यस्थी नाही.

ट्रंप यांच्या दाव्याला भारताने दिलेला नकार त्यांच्या प्रतिष्ठेसाठी एक मोठा धक्का ठरला. कारण, ट्रंप यांना जगाची प्रशंसा हवी होती आणि नोबेल शांतता पारितोषिकाची अशा ही ते लावून बसले होते .

नोबेल पारितोषिकाची आशा आणि भंग

डोनाल्ड ट्रंप यांनी अनेक वेळा जाहीर केले आहे की त्यांना नोबेल शांतता पुरस्काराची खूप इच्छा आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की

“मी नोबेल पारितोषिकासाठी पात्र आहे, पण ते कधीच देणार नाहीत .!”

“भारत-पाकिस्तानमधील यशस्वी मध्यस्थी” हे त्यांच्या Nobel Peace prize पारितोषिकाच्या मागणीसाठी एक महत्त्वाचे कारण ठरू शकले असते असे डोनाल्ड ट्रंप यांना स्वतः ला वाटत होते. परंतु, भारताने त्यांचा हा दावा नाकारल्यामुळे, ट्रंप यांची ही संधी हुकली आणि ते रागाने भारताविरुद्ध प्रतिक्रिया देण्यास उद्युक्त झाले . याच्या अगदी विरुद्ध , पाकिस्तानने मात्र ट्रंप यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस केली , ज्यामुळे भारताचा नकार ट्रंप यांना आणखीनच बोचला.

भारतावरील आर्थिक प्रतिशोध

या घटनेनंतर, बदल्याच्या भावनेने ट्रंप यांनी भारतावर आर्थिक निर्बंध लावून प्रतिशोध सुरू केला. भारताने रशियाकडून प्रचंड प्रमाणात खरेदी केलेल्या कच्च्या तेलाचा पैसा रशियाकडून युद्धासाठी वापरला जातो, असे कारण देऊन Trump यांनी भारतावर प्रथम २५% आणि नंतर ५०% पर्यंत आयात शुल्क लादले .मात्र, विश्लेषकांच्या मते, हे शुल्क केवळ आर्थिक नसून, ट्रंप यांच्या वैयक्तिक अपमानाचा प्रतिशोध होता . त्यामुळे अमेरिका व भारत या दोन देशांमधील संबंध झपाट्याने ढासळू लागले.ट्रंप यांनी भारताला “मृत अर्थव्यवस्था” असे संबोधले आणि भारताला अवाजवी अतिरिक्त कर भरण्याची शिक्षा दिली गेली .

भारताची प्रतिक्रिया आणि परिणाम

भारताने ट्रंप यांच्या या कृतीला “गैरवाजवी आणि अन्याय्य” म्हणून नकार दिला आणि स्पष्ट केले की, त्यांची ऊर्जा सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय आहे आणि ते रशिया सोबत असलेला भारताचा जुना सलोखा न तोडता रशियाकडून मिळणारे स्वस्त कच्चे तेल खरेदी करत राहतील . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत” चा मंत्र दिला आणि देशवासीयांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन केले . या संघर्षामुळे अमेरिका-भारत संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक विशेषज्ञ म्हणतात की, ट्रंप यांनी भारत व अमेरिका यांच्यातील वर्षानुवर्षांचा विश्वास आणि सहकार्याचा पाया उद्ध्वस्त केला आहे .

थोडक्यात

ट्रंप यांनी भारतावर लादलेल्या ५०% आयात शुल्कामागे भारताने त्यांच्या मध्यस्थीचा दावा नाकारल्यामुळे निर्माण झालेला वैयक्तिक राग हे एक प्रमुख कारण आहे. यामुळे ट्रंप यांच्या नोबेल पारितोषिकाच्या आकांक्षेला धक्का लागला आणि त्यांनी भारतावर आर्थिक शुल्क लादून प्रतिशोध घेतला . या घटनेने दोन देशांमधील संबंध बिघडवले आणि भारताने आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला.

स्रोत:

ट्रंप यांच्या कार्यपद्धतिवर प्रश्नचिन्ह लावणारे लेख

ट्रंप यांना वाटते ते नोबल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहेत-कारण त्यांनी जगातील सात युद्धे थांबवली

(https://news.sky.com/story/why-donald-trump-believes-he-deserves-the-nobel-peace-prize-and-ended-seven-wars-13415259)

ट्रंप यांनी भारत-अमेरिकेच्या 25 वर्षे जुन्या सलोख्याला दावणीवर लावले

(https://carnegieendowment.org/emissary/2025/08/trump-tariffs-risk-us-india-relations)


Social Media वर Trump यांच्यावर टीका

Donald Trump एकीकडे भारतावर अवाजवी कर लावत आहेत व त्याच वेळी मीडिया समोर येवून “भारताबरोबरचे अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राहतील !”असा दावा ही करत आहेत. त्यांच्या या असंबद्ध वागण्यामुळेच त्यांना UNPREDICTABLE ही उपाधी Media ने बहाल केली आहे . Social Media वर ही Donald Trump यांच्या भारत नीतीवर सामान्य भारतीय आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत

https://x.com/rahul_mayfair/status/1964195176471024055?t=3xPEqPpZyCU8aitCLAJd-g&s=19

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment