Pav bhaji चा संबंध पहिल्या अमेरिकन गृह युद्धा(first American Civil War) सोबत आहे असे सांगितले तर तुम्हाला कसे वाटेल? Abraham Lincoln यांनी अमेरिकेत गुलामगिरी संपवली (Slavery Abolishment) त्यांचा हा मानवता वादी निर्णय अप्रत्यक्ष रित्या ‘पाव भाजी’ या मुंबई च्या Popular street food चा जन्मदाता ठरला. Pav bhaji Recipe history ही पावभाजी इतकीच रोचक आहे….
मुंबई च्या फेमस Pav bhaji चा जन्म दक्षिण अमेरिकेत गुलामगिरी च्या अस्तामुळे

1853 ला भारतातील पहिली ट्रेन मुंबई मधे सुरू झाली. इथून भारतात यंत्र युगाची सुरुवात झाली. पुढल्याच वर्षी म्हणजे 1854 साली मुंबईत ताडदेव इथे पहिली कॉटन मिल सुरू झाली. तिचे नाव होते The Bombay spinning and weaving mill.
पुढील पाच-सहा वर्षात आणखी दहा कॉटन मिल मुंबईत सुरू झाल्या. या सर्व मिल्स ला लागणारा कापूस हा भारत तसेच इजिप्त आणि फार मोठ्या प्रमाणात दक्षिण अमेरिकेतून मागवला जात असे.
1861 ते 1865 या काळात अमेरिकन सिविल वॉर सुरू झाले
उत्तर अमेरिकेतील युनियन विरुद्ध दक्षिण अमेरिकेची कॉन्फिडरसी यांच्यामधील हे युद्ध होते. या युद्धाचे कारण होते ‘गुलामगिरी प्रथा‘
उत्तर अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीचे नेते त्यावेळी अब्राहम लिंकन होते. मानवतावादी अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेतून गुलामगिरी नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
दक्षिण अमेरिकेत त्या काळात मोठ्या प्रमाणात आफ्रिकन गुलामांचा शेतीसाठी वापर केला जात होता. या शेतीत कापसाचे उत्पादन ही होत होते. कापड निर्मिती साठी ब्रिटन हा कापूस आयात करत होता.
दक्षिण अमेरिकेच्या कॉन्फिडरेसीला असे वाटले की जर गुलामगिरी बंद झाली तर शेती कामासाठी कामगार मिळणार नाही व उत्पादन थांबेल. कापसाच्या निर्यातीतून मिळणारा मोठ नफा हातचा जात होता .याच कारणासाठी त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या विरुद्ध थेट युद्ध पुकारले.
उत्तर अमेरिकेच्या युनियनने युद्ध जिंकले व गुलामगिरीच्या प्रथेचा शेवट
अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली उत्तर अमेरिकेने हे युद्ध जिंकले व लिंकन यांनी गुलामगिरी प्रथा बंद केली. दक्षिण अमेरिकेचे आफ्रिकन गुलाम आता उत्तर अमेरिकेच्या सैन्यात भरती झाले. शेतांवर कामगार उपलब्ध न झाल्याने दक्षिण अमेरिकेची शेती उत्पादन घटले. कापसाचे उत्पादनही कमी झाले.ब्रिटन ला लागणारा कापड पुरवठा ही आता कमी झाला.
पौष्टिक Pav bhaji खात कापड पुरवठ्याची तूट मुंबई च्या कामगारांनी भरून काढली
ही तूट भरून काढण्यासाठी ब्रिटन ने भारतातील मुंबई मधील कापड गिरण्यांमधे उत्पादन वाढविण्याचे ठरवले.त्यांनी मुंबई मिल कामगारांना मिलमध्ये अहोरात्र कामास जुंपले. मुंबई मधले गिरणी कामगार आता दिवस-रात्र मिलमध्ये राहू लागले.
हे मिल कामगार विविध गट करून एकोप्याने राहत असत. एकाच वेळी सर्वांचे जेवण पटकन तयार व्हावे या उद्देशाने एक शक्कल लढवली गेली. ही शक्कल म्हणजेच पावभाजी या iconic पदार्थाची Pav bhaji Recipe
अशी बनवत मिल कामगार पावभाजी
पोर्तुगीजांनी मुंबईत आधीच अनेक बेकर्या सुरू केल्या होत्या. या बेकऱ्यांमध्ये तयार पाव (Bread) मिळत असे. या पावामुळे चपाती बनवण्याचा त्रास व वेळ वाचे. मिल कामगार आपल्या उरलेला सर्व भाज्या एकत्रित करून त्यांना तेल व मसाल्यामध्ये उकडत व त्याचा लगदा करून पावसासोबत खात. ही भाजी कमी वेळेत तर बनत असेच पण चवीला ही ती उत्कृष्ट असे. सर्व भाज्यांचे मिश्रण असल्यामुळे ती पौष्टिक ही असे. अशाप्रकारे मुंबईच्या मिल कामगारांचा जेवणाचा प्रश्न मिटला व जेवण बनवण्याचा वेळ ही कमी झाला.
प्रसिद्ध पावभाजी चा जन्म अशा प्रकारे मुंबईमध्ये 19 व्या शतकाच्या मध्यावर झाला.
बटाटा हा जसा इतर सर्व भारतीय भाज्यांमध्ये आवर्जून असतो तसा तो पावभाजी मध्येही असतो. विशेष म्हणजे हा बटाटा सुद्धा दक्षिण अमेरिकेचे पीक आहे. बटाट्या सोबत फुल गोबी, मटर ,भोपळा अशा भाज्या मुंबई चे मिल कामगार पावभाजी करताना वापरत. दीडशे वर्षांपूर्वी आफ्रिकन गुलाम अब्राहम लिंकन मुळे गुलामगिरी तून मुक्त झाले आणि इकडे मुंबईत मानवी स्वातंत्र्याचा दरवळ घेवून पावभाजी जन्माला आली.
Pav bhaji स्वतः घरी बनवने अगदी सोपे आहे. मी स्वतः ही historic recipe बनवून पाहिली आहे. खाली फोटो जरूर पहा. आमच्या Knowledge Bites या सदरात अशाच इतर रंजक व माहितीपूर्ण गोष्टी वाचा.
टीप: हा लेख ऐतिहासिक घडामोडी आणि खाद्यसंस्कृतीतील प्रचलित कथनांच्या आधारे मांडलेला सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आहे. येथे मांडलेला संबंध थेट दस्तऐवजीकृत कारण-परिणाम म्हणून नव्हे, तर एक अभ्यासपूर्ण निरीक्षण म्हणून पाहावा.

हे ही वाचा : ▶️येशू ख्रिस्त भारतात आले होते का? Did Christ visit India?
▶️ Old Monk Rum चं जनरल डायरशी जुळणारं नातं.. इतिहास जाणून घ्या
▶️ भोपाळ चे वकील आहेत फ्रांसचे राजा-Nepoleon 4-French king in Bhopal
▶️संत तुकाराम आणि शेक्सपियर – 8 वर्षांची समकालीनता -ब्रिटिशांनी छापली पहिल्यांदा गाथा
▶️पहिली Mumbai Local Train -उद्घाटनाला नाना शंकरशेठ हजर होते पण गव्हर्नर फॉकलंड गायब होते..
▶️या उन्हाळ्यात Cold Coffee पेक्षा कमी acidic अशी ‘Clod Brew’ Coffee ट्राय करा
▶️घरच्या घरी Oven शिवाय बनवा गव्हाच्या पिठाची हेल्दी ब्रेड – whole wheat Bread

