अग्निपथ सिनेमाच्या संवादात मराठी तरुणाचे योगदान- Avinash Ghodke Agneepath सिनेमाला मराठी touch या मथळ्याचा स्वाती केतकर यांनी लिहिलेला लेख महाराष्ट्र टाईम्स मधे प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची प्रत व लेखाच्या अनुषंगाने अग्निपथ सहसंवाद लेखक अविनाश घोडकेंचे मत
Avinash Ghodke Agneepath – महाराष्ट्र टाईम्स मधील लेख
एका सामान्य मराठी माणसाच्या संषर्घाची कहाणी सांगणाऱ्या बहुचचिर्त’अग्निपथ’ सिनेमात अजय- अतुल या मराठी संगीतकार जोडीने ‘चिकनी चमेली’गाण्याने हिंदी सिनेसृष्टीत धमाल उडवली असतानाच, या सिनेमाच्या मेकिंगमध्ये आणखी एका मराठी माणसाचे मोलाचे योगदान असल्याचे समोर आले आहे. मराठीमाणसाची, मराठी संस्कृतीची आणि मुख्य म्हणजे मुंबईची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाला खास मराठमोळा टच यावा,यासाठी Avinash Ghodke Agneepath च्या सह संवाद लेखनाचे काम गेले वर्षभर करत होता.
संजय दत्त चा कांचा व ऋषी कपूर अभिनित रौफ लाला या दोन पात्रांवर विशेष काम’
अग्निपथ’चे संवाद लेखक पियूष मिश्रा यांनी लिहिले आहेत.मात्र मिश्रा हे उत्तर भारतीय असल्याने स्क्रिप्टलाही उत्तर भारतीय लहेजाआला होता. दिग्दर्शक करण मल्होत्राला या कथेला खास ‘मुंबय्या’ गंध हवा होता. ते काम त्याने सोपवले अविनाशवर. पटकथेत फरक न करता वाक्यांवर,शब्दांवर काम करून संवादांना मुंबय्या टच देण्याची अवघड कामगिरी अविनाशला पार पाडायची होती. मुख्यत: संजय दत्तने रंगवलेल्या कांचा चीना आणि ऋषी कपूरच्या रौफ लाला या दोन पात्रांवर त्याने विशेष मेहनत घेतली. त्यांच्यासंवादामध्ये अविनाशचा मोठा वाटा आहे.
सिनेसृष्टीत अनेक विभागांत काम
करण मल्होत्रा ने संधी दिली
सिनेसृष्टीतच काम करण्याचानिश्चय अविनाशने सिद्धार्थ कॉलेजमध्ये असतानाच केला होता. शाम बेनेगलांचा’मंडी’ हा सिनेमा पाहिला आणि सिनेमातच कोणत्या तरी विभागात काम करायचे असे त्याने पक्के ठरवले. मग कधी स्टिल्स कर, तर कधी डिरेक्शनमध्ये हात मार, कधी अॅक्टिंग कर, तर कधी कॅमेरा सेटिंग अशा वेगवेगळ्या बाजूंनी तो या क्षेत्रात झगडत राहिला. या प्रवासातच एका मित्राने अचानकच लिखाणाची ऑफर दिली. अविनाशने हेही आव्हान स्वीकारले. थैमान, देवदासी या दोन मराठी सिनेमांसाठी लेखन केले. ‘सगळं करून भागले’ या सिनेमासाठी गीतेही लिहिली.
दरम्यान, त्याने एक हिंदी स्क्रिप्टही लिहिले. अनिल कपूर, सतीश कौशिक,आशुतोष गोवारीकर यांसारख्या अनेक प्रोड्युसर्स, डिरेक्टर्सना तो ही स्क्रिप्ट नरेट करीत होता..ही स्क्रिप्ट गोवारीकरांकडे आली असताना ‘अग्निपथ’चा दिग्दर्शक करण मल्होत्राने ती वाचली . पटकथा लेखन शैली आवडल्या मुळे करण मल्होत्रा ने गेल्या जानेवारीत अविनाशला फोन करून ‘मेहबूब स्टुडिओ’त बोलवून. मराठी संस्कार करण्यासाठी ‘अग्निपथ’ची स्क्रीप्ट त्याच्या हातात सोपवली आणि या निमित्ताने त्याच्याही आयुष्यात एका नवीन ‘अग्निपथा’ची सुरुवात झाली….. Maharashtra Times /26 Jan 2012
अग्निपथ चे माझे Assignment हिंदी संवाद लेखनाचेच होते. माझी Cultural pride व मराठी संस्कृती च्या परिवेशात घडणारी मूळ Agneepath कथा , यामुळे मी यात मराठी शब्द आणले – अविनाश घोडके
Avinash Ghodke Agneepath च्या ‘मराठी करणा’ बाबत म्हणतात – “मराठी शब्द नाही, मराठी Vibes”
वरील लेख 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र टाईम्स मधे प्रसिद्ध झाला होता. लेखातील “मराठी ” angle मुळे मी अग्निपथ मधील फक्त मराठी शब्दांचे लेखन केले आहे असा समज होण्याची काही अंशी शक्यता आहे पण वस्तुतः मी प्रामुख्याने हिंदी संवादच लिहिले आहेत. मराठी शब्द ;प्रसंग व पात्रांच्या अनुषंगाने मी नक्कीच Agneepath मधे लिहिले आहेत. करण मल्होत्रा ने मला फक्त मराठी शब्द लिहिण्यासाठी बोलावले नव्हते. दिग्दर्शक करण मल्होत्रा ला Agneepath मधे Matathi Vibes अपेक्षित असाव्यात हा माझा अंदाज होता आणि तो खरा ठरला. करण संवादातील शब्दांबाबत खूप चूजी होता पण मी अग्निपथ मधे लिहिलेले बरेच मराठी शब्द करणने स्वीकारले.
प्रियांका चोप्रा चा हट्ट
अग्नीपथ ची कथा ही मूलतः एका मराठी तरुणाची कथा आहे.विजय दिनानाथ चौहान (चव्हाण) हे त्या तरुणाचे नाव. विजय वर प्रेम करणार्या काली या तरुणीची भूमिका प्रियांका चोप्रा करत होती. प्रियांका ने स्वतः तिच्या पात्राच्या तोंडी मराठी वाक्ये असावीत असा हट्ट केला होता हे विशेष. याबद्दल मी सविस्तर लेख लिहिलेला आहे.
अग्निपथ मराठी माणसांची गोष्ट असल्यामुळे त्यात मराठी cultural Vibes आणने याबद्दल मी दक्ष होतो. मला दिग्दर्शकाकडून तशी विशेष सूचना नव्हती. मी स्वतःहून जेंव्हा जेंव्हा हिंदी संवादांसोबत हे मराठी शब्द आणले तेंव्हा दिग्दर्शक करण मल्होत्रा व त्याच्या अमराठी सहायकांनाही ते खूप आवडले.
कांचा पात्राचे मराठी करण
कांचा या मांडवा गावात वाढलेल्या मराठी खलनायकाचे नाव कांचा “चीना ” कसे असेल?. मी या चीना शब्दा ऐवजी ” भाऊ” शब्द वापरला. मांडवा गावचे गावकरी कांचाला ” कांचा भाऊ”अशी हाक मारतात असे मी लिहिले. हा एक स्वाभाविकपणे येणारा बदल होता.
पंकज त्रिपाठी कांचा ला ‘कांचा भाऊ!’ म्हणतात
आजचे प्रसिद्ध नट पंकज त्रिपाठी यांनी अग्निपथ मधे एक छोटीशी गावकर्याची भूमिका केली होती. एका प्रसंगात ते कांचा ला ” कांचा भाऊ”संबोधताना चित्रपटात दिसतात. हा पंकज त्रिपाठी यांना अग्निपथ मधे मिळालेला एकमेव संवाद असावा. आज ते खूप मोठे नट म्हणून नावारूपाला आले आहेत.
कांचा चा ” येरे येरे पावसा” सीन
विक्षिप्त स्वभावाचा कांचा एका प्रसंगात चक्क प्रसिद्ध मराठी बाल कविता म्हणतोय असे मी दाखवले आहे. “येरे येरे पावसा तुला देतो पैसा”असे म्हणत तो हाताचा तळवा पुढे करून चालत येताना दिसतो तेंव्हा हा विरोधाभास नाट्यमय परिणाम साधतो. यातील Nuances ही समजून घेण्यासारखे आहेत. कांचा ची Money Centric वृत्ती या प्रसंगातून अप्रत्यक्षपणे अधोरेखित होते. स्वतः:ला देव समजणारा हा व्हिलन पावसा सारख्या divine element शीही पैशाचा सौदा करतोय की काय असा एक भास निर्माण होतो..
अग्निपथ २ साठी अविनाश घोडके हे सहायक लेखक होते का?
नाही . अविनाश घोडके मुख्य लेखक पियुष मिश्रा यांचे सहायक नव्हते. पियुष मिश्रा यांनी लिहिलेला स्क्रिप्ट चा ड्राफ्ट अविनाश घोडके यांना स्वतंत्र पणे Additional Dialogue writer म्हणून पुनर्लेखनासाठी देण्यात आला होता.
Agneepath चित्रपटाचे कथाकार कोण आहेत?
अग्निपथ १ ची मूळ कथा Santosh Saroj यांची आहे . Agneepath 2 ची पटकथा Ila Bedi Dutta यांनी लिहिली आहे
हे ही वाचा:
▶️Remake – Agneepath आणि Parle G बिस्किट
▶️कांचा च्या संवादातील ‘गीता’ शब्द का बदलला गेला – AGNEEPATH 2 BTS
▶️ऋषी कपूर : ” रायटर को बुलाओ!” म्हणणारा Last Roman -Agneepath 2
