माघ महिन्यात येणारी गणेश जयंती व गणेश चतुर्थी उत्सवा मधला फरक | Ganesh Jayanti
दरवर्षी माघ महिन्यात गणेश जयंती आली की एक प्रश्न वारंवार विचारला जातो आणि बरेचदा तो मनात अनुत्तरित राहतो—गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती मधला फरक काय ?
गणेश जयंती व गणेश चतुर्थी हे दोन वेगळे सण आहेत का?
माघ महिन्यात साजरी होणारी Ganesh Jayanti ही शास्त्र, पुराण आणि परंपरा यांचा संगम असलेला महत्त्वाचा दिवस आहे.
या लेखात आपण गणेश जयंती व गणेश चतुर्थी मधला फरक स्पष्टपणे समजून घेणार आहोत.
Ganesh Jayanti म्हणजे काय?
Ganesh Jayanti म्हणजे पार्वती पुत्र श्रीगणेशांचा जन्मदिवस.
हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला साजरा केला जातो.
शास्त्रांनुसार हीच तिथी श्रीगणेशांचा अवतार झाल्याची मानली जाते.
म्हणूनच Ganesh Jayanti चे संदर्भ हे पौराणिक व धार्मिक आहेतसाधना, उपवास आणि आत्मचिंतनाची ही तिथी मानली जाते
गणेश जयंती चे दुसरे नाव माघी गणेशोत्सव
महाराष्ट्रात Ganesh Jayanti ला अनेकदा ‘माघी गणेशोत्सव’ असेही म्हटले जाते कारण तो माघ महिन्यात येतो.
- माघी – माघ महिन्यात येणारा सण
- गणेशोत्सव – भाद्रपदात येणारा गणेशाचा उत्सव
म्हणजेच माघी गणेशोत्सव हे गणेश जयंती चे दुसरे नाव आहे. म्हणजे एकाच सणाची दोन नावे असे म्हणता येईल.
फरक फक्त शब्दप्रयोगाचा आहे, अर्थाचा नाही.
पुराणानुसार गणेश जयंती चे महत्त्व
शिवपुराण, स्कंदपुराण आणि मुद्गल पुराण यांमध्ये गणेश जन्माची कथा येते.
देवी पार्वतीने स्नान करताना आपल्या अंगमळापासून एका बालकाची निर्मिती केली. या बालकाल तिने “मी स्नान करताना कुणाला ही आत प्रवेश देवू नकोस” असे सांगुन स्नानगृहा बाहेर थांबायला सांगितले. आईची आज्ञा म्हणून गणेशाने प्रत्यक्ष शिव शंकराला ही आत जाण्यास मज्जाव केला. यावर शीव शंभो संतापले व त्यांनी या बालकाचा शिरच्छेद केला . पुढे तथ्य समजल्यावर त्यांनी या बालका च्या धडावर हत्ती चे मस्तक लावले व त्याला पुनर्जीवन दिले अशी ही पौराणिक कथा आहे. पुराणातील कथा या अतर्क्य असतात पण त्यात एक गूढ अर्थ असतो असे सांगितले जाते.
पुराणांनुसार गणेश जन्माची ही घटना माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी घडली.
म्हणून ही तिथी गणेश जयंती i म्हणून पूजली जाते.
आता गणेश जयंती व गणेश चतुर्थी मधला फरक जाणून घेवू
| मुद्दा | Ganesh Jayanti (माघी) | गणेश चतुर्थी (भाद्रपद) |
|---|---|---|
| अर्थ | श्रीगणेशांची जन्मतिथी | श्रीगणेशांचे आगमन |
| महिना | माघ | भाद्रपद |
| स्वरूप | आध्यात्मिक, व्रतप्रधान | सार्वजनिक, उत्सवप्रधान |
| कालावधी | १ दिवस | १ ते १० दिवस |
| मूर्ती विसर्जन | साधारणपणे नाही | अनिवार्य |
थोडक्यात सांगायचे तर…
Ganesh Jayanti म्हणजे श्रीगणेशांचा जन्मदिवस,
तर गणेश चतुर्थी म्हणजे श्रीगणेशांचे लोकांमध्ये आगमन.
Ganesh Jayanti ही आतल्या अडथळ्यांवर विजय मिळवण्याची तिथी आहे, गणेश जयंती ही कौटुंबिक पातळीवर साजरी केली जाते..
तर गणेश चतुर्थी हा समाज एकत्र येण्याचा उत्सव आहे. जो लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक पातळीवर सुरू केला व आज तो एक लोकप्रिय उत्सव आहे. काही प्रांतात गणेश जयंती मधे घरात गणेश चतुर्थी प्रमाणे च १० दिवस गणपती बसवला जातो हे विशेष.
Ganesh Jayanti हा सण आपल्याला केवळ पूजा नाही, तर विवेक, निष्ठा आणि कर्तव्य पालन शिकवतो.
बाह्य उत्सवांइतकेच आंतरिक शांततेचे महत्त्व अधोरेखित करतो.
म्हणूनच गणेश जयंती व गणेश चतुर्थी मधला फरक म्हणजे आंतरिक निष्ठा व सामाजिक कर्तव्य इतकाच आहे.
हे ही वाचा: ‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- कसा सापडला स्वयंभू कसबा गणपती- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचा इतिहास.. || मशिदीत बसणारा सांगली चा गणपती- ४५ वर्षांची परंपरा- धार्मिक सलोख्याचे अनोखे उदाहरण ||Panch kailash yatra आणि तामिळनाडू मधील 6th Velliyangiri Kailash







