Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

पुराच्या पाण्यामुळे गावचा गणपती मशीदीत हलवला- ४५ वर्षांनी आजही मशीदीतच बसवला जातो हा गणपती

मशीदीत बसणारा सांगलीचा गणपती: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील या गावात १९६१ पासून मशीदीमधे गणपती बसवला जातो. दरवर्षी हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात

सांगलीच्या गोठखिंडी गावात 1961 पासून मशिदीमध्ये गणपती बसवला जातो.

1961 साली पुण्यातील पानशेत धरण फुटले होते. त्यामुळे सर्वत्र प्रचंड पूर आला होता. यावर्षी प्रथमच सांगलीच्या गोठखिंडी गावात गणपती बसवण्यात आला होता. धरण फुटीच्या दुर्दैवी घटनेमुळे हाहाकार माजला होता. पुराचे पाणी गावात घुसले होते. या परिस्थितीत गावातील गणपती पाण्यात भिजू लागला हे पाहून निजाम पठाण या मुस्लिम गावकऱ्याने गणपतीला मशिदीत बसवावे असे गावकऱ्यांना सुचवले व त्याप्रमाणे गणेश मूर्ती ला पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी मशिदीत हलविण्यात आले. या घटनेनंतर पुढे हीच प्रथा सर्व गावकऱ्यांच्या विचाराने कायम ठेवण्यात आली.

1961 साली पुण्यातील पानशेत धरण फुटले होते. त्यामुळे सर्वत्र प्रचंड पूर आला होता. यावर्षी प्रथमच सांगलीच्या गोठखिंडी गावात गणपती बसवण्यात आला होता. धरण फुटीच्या दुर्दैवी घटनेमुळे हाहाकार माजला होता. पुराचे पाणी गावात घुसले होते. या परिस्थितीत गावातील गणपती पाण्यात भिजू लागला हे पाहून निजाम पठाण या मुस्लिम गावकऱ्याने गणपतीला मशिदीत बसवावे असे गावकऱ्यांना सुचवले व त्याप्रमाणे गणेश मूर्ती ला पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी मशिदीत हलविण्यात आले. या घटनेनंतर पुढे हीच प्रथा सर्व गावकऱ्यांच्या विचाराने कायम ठेवण्यात आली. मशीदीत बसणारा सांगलीचा गणपती म्हणून हा गणपती आज ओळखला जातों.

काही वर्षे गणेश उत्सव बंद पण १९८० पासून उत्सव पुन्हा सुरू

मधली काही वर्षं गावात गणपतीच बसवला गेला नाही . पण 1980 साला पासून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा गणेशोत्सव सुरू करण्याचे ठरवले. पूर्वीप्रमाणेच गणपती मशिदीतच बसवायचा असा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. तेव्हापासून गोठखिंडी च्या न्यू गणेश कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळा तर्फे गेली 45 वर्ष सातत्याने हा गणेश उत्सव साजरा होत आहे व सांगली च्या गोठखिंडी गावच्या मशीदीत गणेश प्रतिमेची स्थापना होत आहे. गावातील मुस्लिम समाज या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळात सर्व विधी व‌ सोपस्कारांमधे आनंदाने सहभागी होत असतो.

धार्मिक सलोखा जपणारे गोठखिंडी गाव

गोठखिंडी गावात पूर्वीपासून धार्मिक सलोखा आहे. एकमेकांच्या सणात इथले हिंदू मुस्लिम सहभागी होत असतात. यावर्षी ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेशोत्सव काळातच मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद सण होता. त्यावेळी इथल्या मुस्लिम समाजाने गणेश विसर्जनापर्यंत म्हणजे ६ सप्टेंबर पर्यंत कुठलीही कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला होता. जेंव्हा जेंव्हा ईद व गणेशोत्सव एकाच वेळी येतात तेंव्हा अशाच प्रकारे गोठखिंडी गावचे मुस्लिम बांधव गणेश उत्सव काळात ईद ची कुर्बानी टाळतात.दरवर्षी गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत असे १० दिवस गोठखिंडी गावचे हिंदू मुस्लिम एकोप्याने गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. खालील Reel मधे ते तुम्ही मशीदीत बसणारा सांगलीचा गणपती नक्की पहा..

पुरामुळे धार्मिक श्रद्धांचा संगम

एकमेकांच्या सणांचा व धार्मिक भावनांचा आदर करत या गावचे हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत आहेत. 1961 साली पानशेत धरणाच्या फुटलेल्या बांधानी गोठखिंडी गावच्या हिंदू-मुस्लीमांच्या धार्मिक श्रद्धांचा अनोखा संगम घडवून आणला आहे.ही प्रथा यापुढेही अशीच चालवली जाईल असे न्यू गणेश कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळा चे सदस्य निर्धाराने सांगतात.

भारतात हिंदू मुस्लिम एकोप्याची गंगा-जमुना संस्कृति होती पण कालांतराने ती नष्ट होत गेली. अशातही सांगली च्या गोठखिंडी गावचे हिंदू मुस्लिम या संस्कृतिचा स्वीकार करत आहेत ही उल्लेखनीय बाब आहे..


हे ही वाचा

➡️अंजीर झाडाचे धार्मिक महत्त्व- Fig Tree

➡️‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- पुण्याच्या मानाच्या कसबा गणपतीची मूर्ती कशी सापडली

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment