Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

आता भारत-पाक युद्ध होणार का?

ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानच्या छुप्या दहशतवादाला भारतीय लष्कराचे प्रतिउत्तर

A spilled red Sindoor and taking off combat flight in background
Operation Sindoor भारत-पाक युद्धातची ठिणगी ?

भारताविरुद्ध थेट युद्ध करण्याची क्षमता नसलेल्या पाकिस्तान ने दहशतवादी करवायां मार्फत गेली अनेक वर्षे छुपे युद्ध चालवले आहे. काश्मिर च्या पुलवामातील भारतीय पर्यटकांची पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून निर्घृण हत्या ही माणुसकीला लाजवणारी अतीशय चीड आणणारी घटना आहे व भारताने या घटनेची गंभीर दखल घेत पाकिस्तान वर Operation Sindoor द्वारा थेट हवाई कारवाई केली आहे. यानंतर भारतात अनेक शहरांत लष्करी ‘मॉक ड्रिल’ करण्यात येत आहे. यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता गडद होवू लागली आहे.

Operation Sindoor भारत पाक युद्धाची ठिणगी आहे का?

Operation Sindoor चा उद्देश

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवाया थांबवणे

गेली अनेक वर्षे पाकिस्तानकडून भारतामधे दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. पाकव्याप्त काश्मीर भागातून हे आतंकवादी भारतात घुसतात. या भागात त्यांची ठाणी पिकिस्तान पोसतो. या दहशतवादाला स्थानिक काश्मिरी जनतेचे भारताविरुद्ध चे युद्ध असे म्हणत पाकिस्तान नेहमीच आपला थेट संबंध नाकारतो.

नियंत्रण रेषेवर होणारी घुसखोरी रोखणे

ही पाकपुरस्कृत आतंकवादी घुसखोरी थांबवण्यासाठी भारताला पाकिस्तान ला सज्जड दम देणे भाग होते.

भारताने हाती घेतलेल्या काश्मीर च्या विकासाला खिळ देणारे भीतीचे वातावरण निवळणे

Operation Sindoor चार उद्देश नुसते सामरिक उत्तर नसून काश्मीर मधील विकासाला खिळ बसू नये म्हणून एक आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी केलेली कारवाई आहे.

कारवाईचे स्वरूप

सर्जिकल स्ट्राइकच्या पद्धतीने हल्ले

Operation Sindoor हे सर्जिकल स्ट्राईक पद्धतीने हवाई मार्गाने करण्यात आले.

LOC पार करून दहशतवादी तळांवर अचूक हल्ला

आधुनिक सामरिक तंत्राचा वापर करत पाक व्याप्त काश्मीर भागातील आतंकवाद्यांच्या नेमक्या ठाण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.

ड्रोन, कमांडो आणि गुप्तचर माहितीचा वापर

हा मूलतः ड्रोन हल्ला होता जो गुप्तचर विभाग व हवाई दलाच्या जांबाज कमांडोंच्या समन्वयाने संपन्न झाला.

कारवाईचे प्रमुख निष्कर्ष

७ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

पाकव्याप्त काश्मीर मधील सात आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अझहर मसूद या कुख्यात आतंकवाद्याचा या कारवाईत खात्मा झाला हे विशेष.

१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

आतंकवाद्यांच्या कबील्यावरच अचानक हल्ला झाल्याने एक गठ्ठा रितीने त्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. खात्मा झालेल्या आतंकवाद्यांची संख्या शंभरहून अधिक असल्याचे अधिकृत वृत्त आहे.

कोणत्याही भारतीय जवानाला हानी नाही

पाकिस्तानी पार्लमेंट मधे जरी भारतीय विमाने पाडण्याची खोटी विधाने करून मंत्री व खासदार टेबल बडवत असले तरी वस्तू स्थिती नुसार एक ही भारतीय जवान या कारवाईत क्षतिग्रस्त झाला नाही.

जागतिक प्रतिक्रिया

🇺🇸 अमेरिका: “भारताला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

🇪🇺 युरोपियन युनियन: शांतता राखण्याचे आवाहन

🇨🇳 चीन: काहिशी तटस्थ भूमिका व संयम राखण्याचे औपचारिक निवेदन

🇺🇳 संयुक्त राष्ट्र संघ: “कारवाई स्वसंरक्षणाच्या चौकटीत होती” – भारताच्या पुराव्यांना दुजोरा

भारत-पाक युद्धाची शक्यता

भारत पाक सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांकडून लष्करी हालचाली गतिमान झाल्या आहेत. भारतात काही ठिकाणी लष्करी mock drills घेतल्या जात आहेत ज्या युद्ध पूर्व परिस्थिती च्या सूचक आहेत.

पण खरेच भारत पाक युद्ध होईल का? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. कारण या प्रश्नाचे सरळ उत्तर देणे अवघड आहे. जरी भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तरी तो हल्ला निर्णायक नसेल. असा सल्ला ‘समज’ देण्यापुरता मर्यादित असेल. यामागे महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तान कडील अण्वस्त्र क्षमता हे आहे.

भारताने जरी अण्वस्त्र वापराबाबत भूमिका घेतली नाही तरी पाकिस्तान हे एक असे राष्ट्र आहे ज्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. IMF (International Monetary Fund) कर्जाखाली दबलेला हा कणाहीन‌ अस्तित्व हीन असा देश आहे. एखाद्या रस्त्यावर आलेल्या नागव्या गुंडासारखी सध्या या देशाची प्रतिमा आहे. ‘माकडाच्या हाती कोलित’ उक्तीप्रमाणे या नागव्या देशाच्या हातात अणुबॉम्ब चे बटन आहे, जे दाबायला तो कचरणार नाही कारण त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही.

भारत देश‌ हा प्रथम अण्वस्त्र हल्ला करण्याची चूक कधीच करणार नाही कारण ती भारताची नीती नाही.

निष्कर्ष

ऑपरेशन सिंदूर कडे आपण भारताच्या धैर्यशील, ठाम आणि संतुलित धोरणाचे प्रतीक म्हणून पाहू शकतो. भारत शांततेचा समर्थक आहे, पण भारत दहशतवादासमोर नतमस्तक होणार नाही एवढे नक्की.

हे ही वाचा

एअर मार्शल ए के भारती यांचे तथाकथित मानवता वाद्यांना उत्तर : Target hit करणे हे आमचे लक्ष असते

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “आता भारत-पाक युद्ध होणार का?”

  1. अगदी खरं आहे. युद्ध असंही कोणाला परवडणार नाही.
    भारतचे समजुतीचा धोरण नेहमी ह्यांचा कारवायांना फक्त समाज देण्याएवढच प्रत्युत्तर देत होती.
    पण आता निर्णायक व्हावच लागेल.
    त्यांची जागा त्याना दाखवावीच लागेल.
    वंदे मातरम. भारत माता की जय
    🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

    Reply

Leave a Comment