Audrey Hepburn Shocking Fact: 50 च्या दशकात Hollywood Marylin Monroe च्या Curvy मादक सौंदर्याने भारावलेले असताना एक अती Slim Look असलेली नटी नवी सौंदर्य व्याख्या ठरली. आजच्या भाषेत तिला Zero Figure म्हणता येईल पण यासाठी तीने कुठलाच Diet Plan अंगिकारला नव्हता. या बारिक चणी मागे तिने युद्ध काळात भोगलेली भयानक उपासमार होती.

Dutch Girl – Audrey Hepburn – मेरलीन मोन्रो शी स्पर्धा करणारी Timeless Beauty
50 च्या दशकात Slender,Gamin(बालिश व boyish), Elegant अशी विशेषणे जिला लावली जात होती ती अभिनेत्री म्हणजे Audrey Hepburn. ‘सर्वकालीन सर्वात सुंदर स्त्री’ ( Timeless Beauty)अशी उपाधी तिला दिली गेली. ऑड्री हेपबर्न रूढ अर्थाने सुंदर नव्हती. ५० च्या दशकता Hollywood वर खरंतर Merilyn Monroe चे राज्य होतं. Monroe च्या Curvy व मादक सौंदर्याने भारावलेला तो काळ होता. अशात एका कृश बांध्याच्या मुलीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सौंदर्यांची पारंपारिक व्याख्या मोडत ती Hollywood मधे beautiful Elegant Star म्हणून प्रस्थापित झाली होती. विनोद बुद्धी, मनातली करुणा व आत्मविश्वास या गुणांनी खरंतर Audrey Hepburn चा Aura तयार झाला होता. हा Aura तिने गत आयुष्यातील युद्ध काळात भोगलेल्या कठीण काळाचा साक्षी होता.
खालील चित्रात Style Icon Audrey Hepburn यांची एक अदा – Pic Courtesy Google

“अशी एक ही स्त्री नाही जिला Audrey Hepburn सारखे दिसण्याचे स्वप्न नाही “
– गिवांची ( Fashion designer)
ऑड्रे चे आयुष्य
१९२९ साली बेल्जियम च्या ब्रसेल्स शहरात Audrey चा जन्म झाला होता. तिचे वडील ब्रिटिश होते त्यामुळे तिला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते. आईच्या पहिल्या पतीपासून झालेल्या दोन सावत्र भावांसोबत ती पुढे इंग्लंडमध्ये रहात होती.
आयुष्यभर मनात दडवले आई वडीलांचे एक गुपित -Audrey Hepburn Shocking Fact
Audrey Hepburn ला आयुष्यभर मनात एका गोष्टीची सल व भीती होती. ती गोष्ट म्हणजे तिचे आईवडील हिटलर चे समर्थक होते. लंडन मधील ऑड्रेचा लहानपणीचा १९३९ पर्यंतचा काळ हा हिटलर च्या नाझी पक्षाचा उदयाचा काळ होता. सुरूवातीच्या काळात नाझी पक्षाच्या विचारसरणीचा व एकूणच हिटलरच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव युरोप अमेरिकेच्या काही समुदायांवर होता. त्यांनी Fascism ला पाठिंबा देणार्या संघटना उभारल्या. Audrey Hepburn चे आई वडील सुद्धा लंडन मधील British Union of Fascist या संघटनेचे सदस्य होते.
आईवर हिटलरचा प्रभाव
Audrey ची आई बॅरोनेस ही १९३५ साली हिटलर च्या न्यूरेनबर्ग रॅली ला उपस्थित राहिली होती. Hitler बद्दल “सर्वात मोहक व्यक्तीमत्व!” असे उद्गार तिने काढले होते.
वडीलांनी घर सोडल्याचं दुःखं
याच वर्षी ऑड्रे च्या वडिलांनी कुटुंबाला सोडले. अवघ्या सहा वर्षांच्या Audrey Hepburn साठी हा मानसिक आघात होता. कोवळ्या वयात तिच्या मनावर खोल परिणाम झाला. या घटनेमुळे आयुष्यभर तिच्या मनात पुरुषांबद्दल ची भीती घर करून राहिली.
पूढे १९३८ साली ऑड्रे च्या वडिलांना ब्रिटिशांनी जर्मन एजंट कडून पैसे घेतल्याच्या संशयावरून अटक केली होती.
आई नाझी विरोधक झाली
१९३९ मधे दुसरे महायुद्ध ( World War 2) सुरू होताच ऑड्रे च्या आईने दहा वर्षांच्या Audrey ला नेदरलँड्स या तटस्थ देशात सुरक्षेच्या दृष्टीने पाठवले. पण १९४० मधे जर्मनीने नेदरलँड्स वरही आक्रमण केले.
नाझी पक्षाची क्रूरता जसजशी समोर येत होती तसतशी ऑड्रेच्या आईची नाझींवरील श्रद्धा ढळत होती. तिचा मुलगा इयान ( ऑड्रे चा सावत्र भाऊ) याला नाझींनी जर्मनी च्या छावणीत पाठवले. १९४२ मधे बहिणीच्या नवर्याची नाझींकडून हत्या झाल्यावर मात्र बॅरोनेस ने डच प्रतिकार चळवळीत सहभाग घेतला व ती उघडपणे नाझी विरोधक बनली.
13 वर्षांच्या Audrey Hepburn चा नाझी विरोधी चळवळीत गुप्त सहभाग

१९४२ साली नेदरलँड्स मधे १३ वर्षांची Audrey आपल्या आईसोबत नाझी विरोधी चळवळीत काम करू लागली. गुप्त संदेश पोहोचवणे व चळवळी साठी लागणारे पैसे (Cash) कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे अशी कामे ती करू लागली. Audrey ला नृत्य कलेची आवड होती. बॅले नर्तिका होण्याचे तिचे स्वप्न होते. चळवळीच्या काळात ती Black Evening या कार्यक्रमात नृत्य सादर करून चळवळी साठी आपले छोटे आर्थिक योगदान देत होती.
१९४२ साली भारतात ही ब्रिटिशांविरुद्ध ‘चले जाव’ आंदोलनाचा भडका उडाला होता हे विशेष .
१९४४-४५ चा भयानक दुष्काळ – Hunger winter
१९४४ मधे नेदरलॅंड मधे हाडे गोठवणारी थंडी होती अशातच जर्मन सैन्याने नेदरलँड्स चा अन्नपुरवठा तोडला. मित्र राष्ट्रांकडून त्वरित मदत आली नाहीं. २०,००० डच नागरिक उपासमारीने मरण पावले.
१५ वर्षांची Audrey ही भयाण परिस्थिती पहात होती. अन्नाची उपलब्धता शून्य होती. अशा परिस्थितीत Audrey हिने ट्यूलिप झाडाचे कोश व प्रसंगी गुरांप्रमाणे गवत खाऊन दिवस काढले. कुपोषणामुळे तिला कावीळ झाली. हाडांच्या सांध्यांना सूज व श्वसनाचा गंभीर आजार झाला. तिचे वजन ४० किलोपर्यंत घटले. ही उपासमारी Audrey च्या शरीर स्वास्थ्यावर कायमस्वरूपी अपाय करून गेली. स्वास्थ्य समस्येमुळे तिचे बॅले नृत्यांगना होण्याचे स्वप्न ही भंगले होते. १९४४ च्या Hunger winter ने दिलेल्या स्वास्थ्य समस्या तिच्या आयुष्याच्या शेवटा पर्यंत तिच्यासोबत राहिल्या.
Audrey Hepburn ची अती सडपातळ देहयष्टी ही खरेतर स्वास्थ्य समस्या
Audrey Hepburn ज्या Ultra slim बांध्यामुळे परिचित व प्रसिद्ध होती ते शरीर तिने कुठला ही विशिष्ट Diet plan अवलंबून मिळवले नव्हते. १९४४ च्या उपासमारीची ती देण ( Side effects) होती. Audrey ने याची वाच्यता संपूर्ण आयुष्यात कधीच केली नाही. तिच्या मरणानंतर २०१९ साली प्रकाशित झालेल्या The Dutch Girl Audrey Hepburn या तिच्या चरित्र ग्रंथात हा खुलासा प्रथमच झाला आहे.
Audrey ने आपल्या आई वडीलांवर शेवटपर्यंत प्रेम केले. वडीलांचे वागणे मनाला लागले होते तरी तिने वडीलांचा द्वेष केला नाही. आपल्या कर्तृत्वाने ती 50 च्या दशकात Hollywood ची मोठी अभिनेत्री झाली मात्र तिने स्वतःला कधीच मोठे मानले नाही. प्रेक्षकांनी तिला सुंदर मानले पण तिने स्वतःला कधी सुंदर मानले नाही.
“माझ्या दीसण्यावरून मी एकेकाळी स्वतःचा द्वेष करत होते!
असे ती एकदा म्हणाली होती. आपले आई वडीलांचे ‘नाझी समर्थन’ जर प्रेक्षकांना व जगाला कळाले तर तिच्या सिने कारकिर्दीवर विपरीत परिणाम होईल अशी भीती तिला आयुष्यभर वाटत राहिली. आपल्या भूतकाळातील कौटुंबिक गोष्टी लोकांना माहीत होवू नये असे तिला वाटे. याच कारणामुळे मुलाखतीसाठी ३० मिनीटांपेक्षा जास्त वेळ ती देत नसे.
Red Cross च्या मदतीने वडीलांचा शोध
६० च्या दशकाच्या सुरुवातीला Audrey Hepburn हिने आपल्या वडीलांचा Red Cross संस्थेच्या मदतीने शोध घेतला. वडील जोसेफ हे डब्लिन मधे तिला भेटले. मुलगी Audrey ने दिलेली आर्थिक मदत त्यांनी स्वीकारली. त्यांच्यात पत्रव्यवहार ही होत असे.
१९८० मधे वयाच्या ९१ व्या वर्षी Audrey चे वडील जोसेफ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मरणा पूर्वी अस्वस्थ असताना त्यांनी आपण Audrey या आपल्या मुलीला लहानपणी प्रेम दिले नाही याची त्यांनी खंत व्यक्त केल्याचे समजते..
मृत्यू नंतर २६ वर्षांनी आत्मचरित्रामुळे ऑड्रे चे गुपित जगापुढे

ऑड्रे हेपबर्न ने स्वतः आपले आत्मचरित्र लिहिले नाही.तसेच जाहीरपणे ती आपल्या आयुष्याबद्दल कधीच बोलली नाही. प्रसिद्धी च्या ऐन शिखरावर असताना ती निवृत्त झाली व कुटुंबाला वेळ देत UNICEF ची Goodwill Ambassador (राजदूत) म्हणून समाजकार्य करू लागली. तिच्या मनात आपल्या आईवडीलांबद्दल जे नाझी संबंधांबाबत गुपित दडलेले होते ते तिने आपल्या मृत्यू पर्यंत मनातच ठेवले.तिच्या मृत्यू नंतर २६ वर्षांनी ,(2019 साली) तिच्या आयुष्यावर रॉबर्ट मॅटेझन यांनी संशोधन करून The Dutch Girl हे पुस्तक लिहून प्रकाशित केले . Audrey Hepburn Shocking Fact सांगणारे हेच ते पुस्तक आहे.
ऑड्रे हेपबर्न चे २० जानेवारी १९९३ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. स्वित्झर्लंडमधील टोलोचेनाझ (Tolochenaz) येथे तिच्या राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला.
ऑड्रे हेपबर्न चे ५ सर्वात महत्त्वाचे चित्रपट : 5 Best Movies of Audrey Hepburn
| वर्ष | चित्रपट | दोन ओळीत कथा | पुरस्कार / महत्त्व |
|---|---|---|---|
| 1953 | Roman Holiday | रोममध्ये एका राजकुमारीला सामान्य तरुणीप्रमाणे जगण्याची संधी मिळते. पत्रकारासोबतच्या एका दिवसात प्रेम आणि कर्तव्याचा संघर्ष उभा राहतो. | Best Actress – Academy Award (Oscar), Golden Globe, BAFTA. |
| 1954 | Sabrina | चालकाची मुलगी पॅरिसहून परतल्यानंतर दोन श्रीमंत भावांमध्ये प्रेमाचा गुंता निर्माण होतो. | Oscar नामांकन; Audrey च्या रोमँटिक प्रतिमेला मोठी लोकप्रियता मिळाली. |
| 1961 | Breakfast at Tiffany’s | स्वतंत्र स्वभावाच्या Holly Golightly च्या प्रेम, स्वातंत्र्य आणि आत्मशोधाची संस्मरणीय कथा. | Audrey Hepburn ची सर्वात प्रसिद्ध भूमिका; फॅशन आयकॉन म्हणून ओळख दृढ झाली. |
| 1964 | My Fair Lady | एका फुलविक्रेत्या मुलीचे उच्चभ्रू समाजातील सुसंस्कृत स्त्रीमध्ये रूपांतर करण्याची प्रेरणादायी कथा. | चित्रपटाला 8 Academy Awards; Audrey च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड. |
| 1967 | Wait Until Dark | अंध महिलेच्या घरात घुसलेल्या गुन्हेगारांशी ती धैर्याने सामना करते. थरारक शेवटासाठी हा चित्रपट आजही प्रसिद्ध आहे. | Best Actress – Academy Award (Oscar) नामांकन; Audrey Hepburn यांच्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक. |
टीप:
•Roman Holiday (१९५३) ने Audrey Hepburn ला जागतिक स्टार बनवले. या hit चित्रपटात तिच्या सोबत Gregory Peck हे सुप्रसिद्ध स्टार नट सहकलाकार होते.

रोचक माहिती: Roman Holiday या चित्रपटाने जगभरातील अनेक चित्रपटांना प्रेरणा दिली. भारतात महेश भट्ट दिग्दर्शित Dil Hai Ke Manta Nahin (1991) या चित्रपटाची कथा त्याच्याशी अनेक बाबतीत साम्य दर्शवते, मात्र भारतीय प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार तिच्यात लक्षणीय बदल करण्यात आले होते.
•Breakfast at Tiffany’s चित्रपटा ने Audrey ला फॅशन आयकॉनचा दर्जा दिला.
•Wait Until Dark ने Audrey Hepburn ही केवळ सुंदर अभिनेत्री नव्हे तर अत्यंत समर्थ अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले.(Best Actress Academy Award चे Nomination)
Breakfast at Tiffany’s बद्दल एक रंजक गोष्ट
चित्रपट निर्माते सुरुवातीला Holly Golightly या भूमिकेसाठी Marilyn Monroe चा विचार करत होते. पण तिच्या अभिनय प्रशिक्षिका Lee Strasberg यांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित छटा असलेली भूमिका स्वीकारू नये असा Monroe ला सल्ला दिल्यामुळे तिने ती भूमिका नाकारली. नंतर ही भूमिका Audrey Hepburn ला मिळाली .ही भूमिका ऑड्रे ला अभिनेत्री म्हणून प्रतिष्ठा देणार्या भूमिकांपैकी एक ठरली.
FAQ
Audrey Hepburn यांची Zero Figure डाएटमुळे होती का?
नाही. दुसऱ्या महायुद्धातील Hunger Winter काळात झालेल्या तीव्र उपासमारीमुळे त्यांची शरीरयष्टी कायम सडपातळ राहिली होती
Audrey Hepburn यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता का?
होय. Roman Holiday (1953) या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना Best Actress Academy Award (Oscar) मिळाला होता.
Audrey Hepburn यांनी नाझीविरोधी चळवळीत भाग घेतला होता का?
होय. किशोरवयात त्यांनी नेदरलँड्समधील डच प्रतिकार चळवळीसाठी गुप्त संदेश आणि आर्थिक मदत पोहोचवण्याचे काम केले होते.
Audrey Hepburn यांच्या जीवनावर कोणते महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले?
अलीकडेच म्हणजे..2019 मध्ये लेखक Robert Matzen यांनी लिहिलेले ‘The Dutch Girl: Audrey Hepburn and World War II’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांच्या बालपणातील युद्धकाळ, उपासमार आणि कुटुंबाविषयी अनेक महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत.
Audrey Hepburn यांची प्रसिद्ध Quote मुलींना सदैव आनंदी रहायला सांगते

हे ही वाचा
- ➡️ AI च्या युगात लेखणीतून काळाचा खेळ मांडणारा Hollywood चा लेखक दिग्दर्शक !
- ➡️Apple logo ची जन्म कथा आणि लोक कथा
- ➡️Me too – Dustin Hoffman पासून नाना पाटेकरांपर्यंत – जेष्ठ अभिनेत्यांवर झालेत आरोप
- ➡️अभिनेते राजकुमार यांचा अंत्यविधी गुप्तपणे झाला होता- पण या दिग्दर्शकाला त्यांनी अंत्यदर्शनाची संधी दिली होती- तीही मृत्यू आधी
- ➡️Dr Babasaheb Ambedkar : मामूट्टी आधी आंबेडकरांची भूमिका Robert de Niro करणार होते

