Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Nana Patekar & Dustin Hoffman: ‘रेन मॅन’चा रिमेक ‘हम दोनो’ ते ‘Me Too’चे आरोप… नाना पाटेकर आणि डस्टिन हॉफमनचा समांतर प्रवास!

हॉलीवुड चे दिग्गज अभिनेते Dustin Hoffman Me too आरोपांमुळे चर्चेत होते. खरंतर हे जुनंच प्रकरण पुन्हा एकदा internate वर resurface झाले‌ होते. ‘जुन्या कढीला ऊत’ या उक्तीप्रमाणे नाना पाटेकरांवर आरोप करणारी तनुश्री दत्ता नानांच्या निधनानंतर आपल्या Insta Account वरून अशाच प्रकारे पुन्हा बोलू लागली आहे..

Dustin Hoffman

डस्टिन हॉफमन व नाना पाटेकर Rainman Connection

डस्टिन हॉफमनच्या गाजलेल्या ‘रेन मॅन’ (Rain Man) या चित्रपटाच्या हिंदी रिमेक ‘हम दोनो’ मध्ये नाना पाटेकर यांनी काम केले होते .१९९५ मध्ये आलेल्या ‘हम दोनों’ (Hum Dono) या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती, जो हॉलीवूडच्या ‘रेन मॅन’ चित्रपटापासून प्रेरित होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत ऋषी कपूर आणि पूजा भट्ट यांनीही प्रमुख भूमिका केल्या होत्या.

सिने जगतात Dustin Hoffman या अभिनेत्याची वेगळी ओळख सांगणे गरजेचे नाही

Dustin Hoffman ,ज्यांना काहीजण चुकून “Halfman”म्हणतात , हे हॉलिवूडमधील अत्यंत सन्माननीय आणि प्रतिभावान अभिनेते आहेत.त्यांनी

  • The Graduate (1967)
  • Kramer vs. Kramer (1979)
  • Rain Man (1988)

यांसारख्या सिनेमांमधून जागतिक प्रसिद्धी मिळवली.

त्यांना दोन Academy Awards, अनेक Golden Globes आणि BAFTA पुरस्कार मिळाले आहेत. असे असले पण पुढे त्यांच्यावर Me too चे आरोप ही झाले

Me too आरोप आणि सोशल मिडिया चर्चा

Anna Graham Hunter - writer - photo courtesy Google

Resurfacing of #MeToo Allegations 2017 मध्ये लेखक Anna Graham Hunter हिने सांगितले होते की ती 17 वर्षांची असताना Dustin Hoffman यांनी तिच्यावर असभ्य टिप्पणी केली आणि वाईट वागणूक दिली.

“He asked about sex… He touched me inappropriately…” –Anna Graham Hunter

त्यानंतर आणखी काही महिलांनीही पुढे येऊन अशाच स्वरूपाचे अनुभव शेअर केले.

2017 मधील एका सार्वजनिक मुलाखतीत John Oliver यांनी Hoffman यांना या विषयावर थेट प्रश्न विचारले होते . ती मुलाखत चर्चेत आली होती.

नाना पाटेकरांवरही असेच आरोप झाले होते

हॉफमन प्रमाणेच आपल्या बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरही Me too चे आरोप झाले होते पण हे आरोप कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकले नाहीत. अशा आरोपांमुळे दिग्गज अभिनेत्यांच्या प्रतिमेला तडा जातो . अशा मोठ्या अभिनेत्यांबद्दल प्रेक्षकांच्या मनात विशेष प्रेम असते व या प्रेमाला कुठेतरी अशा घटनांमुळे गालबोट लागते. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत. त्यांच्यावर #MeToo hashtag वापरून तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केले होते पण हे आरोप ती कोर्टात सिद्ध करू शकली नाही. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर ही तिने आपल्या Instagram Account वरून नानांवर आगपाखड केली आहे.

शिळ्या कढीला ऊत ?

काही लोकांचे असे मत आहे की असे आरोप कारस्थानी स्वरूपाचे व खोटे असतात. महिलां संबंधीच्या कायद्यांचा गैरवापर होण्यापासून टाळण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज आहे असे या मतप्रवाहात मानले जाते.

Me too हा हॅशट्रेन्ड खरंतर हॉलीवुड पासूनच सुरू झाला. आपल्यावर झालेला अन्याय महिलेने थेट मीडियामध्ये येऊन जगजाहीर करणे असे या ट्रेन्डचे मूलभूत व थेट असे तंत्र आहे. न्याय व्यवस्थेला दाद मागण्या आधी सरळ जनतेपुढे किंवा जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची ही नवी डिजिटल किंवा सोशल मीडिया जस्टिस (Media Trial)ची पद्धत आहे. #metoo असा टॅग वापरून कोणीही महिला कुठल्याही पुरुषाविरुद्ध आपली यौनशोषनाची तक्रार जगजाहीर करू शकते. याच पद्धतीने डस्टिन हॉफमन यांनाही जनतेच्या न्यायालयात उभे करण्यात आले होते.

दोन्ही दिग्गजांच्या प्रतिमेला Me too मुळे तडे

Dustin Hoffman आणि नाना पाटेकर हे दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रात दिग्गज. पण Me too चळवळीने त्यांच्या प्रतिमेला तडे गेले.

एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे – प्रेक्षक कले बरोबरच कलाकाराचं माणुसपण ही जोखत असतात. “Talent may earn applause, but character earns respect.” प्रेक्षकांचं कलाकारांवरचं पराकोटीच प्रेम एका पायरीवर ‘हम दोनो’ हे द्वैत विलीन करते. — या पायरीवर आपण कलाकारांचं काम आणि त्यांचा व्यक्तिगत स्वभाव वेगळा ठेवू शकतो का?कृपया तुमचं मत खाली comments मध्ये जरूर शेअर करा!


हे ही वाचा

गायक संंजू राठोड- हिंदित अपयशी मराठीत मात्र Hit- आईच्या सल्ल्याने मिळाले यश – म्हणाली होती..

Charlie Chaplin यांना आवडला होता हा मराठी चित्रपट – म्हणाले होते It has a soul !..

Marathi Box Office – प्रथमच देशाच्या एकूण collection मधे मराठी चित्रपटांचा 4% वाटा – सहा महिन्यांत 250+ कोटींची ‘सैराट घोडदौड’

या नटाची स्तुती ऐकून Charlie Chaplin खूपच उदास झाले – शेवटी म्हणाले ‘मी त्याला काम दिलं होतं!’ – तो नट म्हणजे Buster Keaton

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment