Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

“चीनच Covid चा दोषी!”हे सिद्ध करणार्या डॉ मोनाली रहालकर यांचे आता नवे संशोधन – पुण्याच्या वेताळ टेकडीवर शोधले विषारी मिथेन खाणारे जीवाणु -Methane eater Bacteria

 

Pune : पुण्याच्या वेताळ टेकडीवर दगड खाणीत प्रदूषण खाणारे जीवाणू Methane eater Bacteria: डॉ. मोनाली रहालकर यांचे संशोधन 

Science info,Pune : ARI ( Agharkar Research Institute) या संशोधन संस्थेच्या जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ मोनाली राहालकर यांनी मिथेन खाणार्या जीवाणूं (Methane eater Bacteria) चा शोध लावला आहे.

हे जीवाणू मुख्यत: पुण्याच्या वेताळ टेकडीवरील दगड खाणीत आढळले आहेत .  साधारणतः भात शेतांमधे व पाणथळ अशा दलदलीच्या भागात हे bacteria सापडतात.

Global warming ला उत्तर शोधणार्या डॉ. मोनाली रहालकर: परीचय व कार्य 

 

शिक्षण -सावित्रीबाई फुले विद्यापीठ व जर्मनीत डॉक्टरेट

Dr मोनाली रहालकर या पुण्याच्या ARI (आघरकर रीसर्च इन्स्टिट्यूट) या अनुसंधान संस्थेत Research and Development Scientist म्हणून गेली ११ वर्षे कार्यरत आहेत. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Msc केल्यानंतर त्यांनी जर्मनीतील University of Konstanz मधून‌ Microbial Ecology या विषयावर Doctorate मिळवली.   Global warming , Methane Cycle, जीवाणू संवर्धन, शेत जमीनीत Nitrogen वृद्धी करणारे जीवाणू अशा विषयांमधे Dr मोनाली रहालकर यांना रस आहे.

२०१९ -COVID प्रसार संदर्भात संशोधन 

COVID विषाणू  चीनच्या वूहान प्रयोगशाळेतूनच जगभर पसरल्याचे सिद्ध केले

संपूर्ण जगात COVID साथीची लागण झाल्यावर कोवीडचे विषाणू चीन च्या वूहान येथील प्रयोगशाळेतून जगभर पसरले असा आरोप चीनवर झाला पण चीनने सातत्याने या आरोपाचे खंडण करत COVID चे विषाणू प्राण्यांकडून माणसांमधे पसरले असे सांगितले.‌ चीन चा हा तर्क पुराव्यांसकट खोटा असल्याचे सिद्ध करून Dr मोनाली रहालकर यांनी चीनच्या वूहान प्रयोगशाळेतूच COVID चे विषाणू जगभर प्रसारित झाले असे ठामपणे सांगितले होते.  

वातावरण प्रदूषणातील मोठा घटक असलेल्या मिथेन ला खाणार्या जीवाणूंचा शोध

नुकतेच डॉ मोनाली रहालकर यांचा मिथेन खाणार्या जीवाणूंवरील(Methane eater Bacteria) शोध अभ्यास Indian Journal of Microbiology आणि इतर वैज्ञानिक जरनल मधे प्रसिद्ध झाला आहे. वातावरण बदल व Global warming च्या अनुषंगाने या विषयावर सातत्याने पुढील संशोधन होत रहाणे गरजेचे आहे असे पुण्याच्या महिला वैज्ञानिक मोनाली राहालकर म्हणतात.

पुण्यातील वेताळ टेकडी वरील संशोधन -(Science Info)

पुण्यातील वेताळ टेकडी Morning व Evening walkers चं हक्काचे ठिकाण. छोटासा ट्रेक करून या टेकडीवर जाता येते व गाडीने ही वर थेट पोहोचण्याचा मार्ग आहे. या वेताळ टेकडीवर दगड खाण आहे आणि याच खाणीच्या परीक्षण व संशोधना अंती इथे मिथेन खाणारे जीवाणू आहेत असे डॉ मोनाली राहालकर यांच्या लक्षात आले.‌

सूक्ष्मदर्शकाखाली Methanotrophs
सूक्ष्मदर्शकाखाली Methanotrophs Pic courtesy Google 

Methanotrophs अर्थात मिथेन खाणारे जीवाणू 

या जीवाणूंना Methanotrophs असे शास्त्रीय नाव आहे. भातशेती व पाणथळ भूभागांमधे हे जीवाणू आढळून येतात.

Methanotrophs हे असे सूक्ष्मजीव आहेत जे मिथेन (CH₄) वायू ला ऊर्जा आणि कार्बनचा स्रोत म्हणून वापरतात. ते मिथेनचे ऑक्सिडेशन करून त्याचे कार्बन डायऑक्साइड (CO₂) मध्ये रूपांतर करतात. त्यामुळे वातावरणातील मिथेनचे प्रमाण कमी करण्यास त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

या Methanotrophs ची शास्त्रीय संज्ञा Methylocucumis Oryaze अशी आहे.  सूक्ष्मदर्शकाखाली यांचा आकार काकडी सारखा दिसतो या कारणामुळे ‘मिथेन खाणारी काकडी ‘ ( Methane eating cucumber)असे या Methanotrophs ना टोपण नाव दिले गेले आहे. 

Methanotrophs Microscopic view

डॉ मोनाली राहालकर यांनी संशोधित केलेल्या या Methanotrophs ची संरचना unique अशी आहे व अशा पद्धतीचे Methanotrophs जगात इतरत्र कुठेही आढळलेले दिसत नाही.

Global warming च्या लढ्यातील महत्वाचे पाऊल 

 Dr Monali Raharkar यांचा हा शोध Global warming विरुद्ध च्या लढ्यातील एक महत्वाचे पाऊल आहे‌ कारण Methane हा Green house gas वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड पेक्षा २६ पट अधिक असतो.

कार्बन डाइऑक्साइड पेक्षा घातक कसा -(GWP)

जर सम प्रमाणात वातावरणात मिथेन व कार्बन डाइऑक्साइड सोडले तर येणार्या १०० वर्षांच्या कालावधीत मिथेन कार्बन डाइऑक्साइड पेक्षा 27 ते 30 % जास्त उष्णता पृथ्वी च्या वातावरणात अडकवून ठेवेल ((100-year Global Warming Potential किंवा GWP100)

डॉ मोनाली राहालकर यांच्या संशोधनामुळे वातावरणातील हे विषारी मिथेन कमी करण्यास मदत होणार आहे. Global warming मुळे होणारी निसर्ग हानी कमी करण्या बरोबरच  शेती मधे पीक उत्पादनाची प्रत व क्षमता वाढवण्यासाठी डॉ मोनाली राहालकर यांच्या या संशोधनाचा उपयोग होणार आहे .

मिथेन चे नियंत्रण

जर शेण किंवा सेंद्रिय कचऱ्यातून निर्माण होणारा मिथेन थेट वातावरणात गेला, तर तो घातक असा शक्तिशाली हरितगृह वायू म्हणून ‘ग्लोबल वॉर्मिंगला’ हातभार लावतो..

गोबर गैस मधे शुद्ध मिथेन नसते हे समजून घेणे महत्वाचे आहे गोबर गॅस मधे 50 ते 70 % मिथेनचे घटक असतात. हे मिथेन गोबर गॅस प्लांटमध्ये इंधन म्हणून वापरले जाते, तेंव्हा ते उपयुक्त ऊर्जा बनते आणि वातावरणात घातक शुद्ध मिथेन सोडला जाण्याचे प्रमाण काही अंशी कमी होते.


FAQ

मिथेन (Methane) म्हणजे काय?

मिथेन हा रंगहीन आणि ज्वलनशील वायू असून तो एक शक्तिशाली हरितगृह (Greenhouse) वायू आहे.

मिथेन कुठे उत्पादित होतो?

पशुपालन, भातशेती, कचरा डेपो (Landfills), दलदली, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि तेल-गॅस उद्योग हे मिथेनचे प्रमुख स्रोत आहेत.

मिथेन ग्लोबल वॉर्मिंगसाठी इतका धोकादायक का मानला जातो?

मिथेन हा कार्बन डायऑक्साइडपेक्षा अनेक पटींनी अधिक प्रभावी हरितगृह वायू आहे. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणात उष्णता अडकून राहते आणि पृथ्वीचे तापमान वाढण्यास हातभार लागतो

हे ही वाचा

परसदारातील वेधशाळेतून थेट आकाश गंगेचे Astro Photo: हौशी खगोल छायाकार मिशेल ची हनुमान उडी

Non Stick भांड्यांमुळे अमेरिकेत Teflon Flue

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment