Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

गणेश उत्सव काळात OTT Releases: प्रत्येक चित्रपट-मालिकेची वैशिष्ट्ये, थोडक्यात कथा आणि का पहावे?OTT Watchlist Guide

गणेश उत्सव काळात प्रेक्षकांसाठी OTT PLATFORMS नवनवीन सिनेमे व सीरीज घेवून आले आहेत. या आठवड्यात (११ सप्टेंबर २०२६ पासून) OTT वरील नव्या कार्यक्रमांची यादी खूपच बहुविध आहे . हिंदी थ्रिलरपासून तमिळ भावनिक चित्रपटापर्यंत, ऐतिहासिक मालिकेपासून हॉरर-कॉमेडीपर्यंत.

काय पहाल ?- OTT Watchlist Guide /September 2026

खाली प्रत्येक कलाकृतीची वैशिष्ट्ये, कथेचा गाभा आणि ती का पहावी याचे सविस्तर विश्लेषण दिले आहे, जेणेकरून तुम्ही या वीकेंडची OTT Watchlist बनवू शकाल.

प्रकार: क्राइम थ्रिलर | कालावधी: सुमारे १५० मिनिटे

थोडक्यात कथानक:

एक प्रामाणिक IPS अधिकारी बुंदेलखंडच्या जंगलात पाठवला जातो, जिथे त्याला राजकारण्यांशी हातमिळवणी करणाऱ्या आणि संपूर्ण प्रदेशाला घाम फोडणाऱ्या डकैताचा शोध घ्यायचा असतो.

वैशिष्ट्ये:

दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी यापूर्वी ‘पान सिंग तोमर’मध्ये एक अविस्मरणीय डकैत चे पात्र दिले होते. यावेळी ते पुन्हा उत्तर भारतीय Hindi Belt वाल्या विषयाकडे वळले आहेत, आणि यावेळी त्यांनी सहसा विनोदी भूमिकांत दिसणार्या अर्शद वारसी यांना खलनायकाची (डकैत महाराजची )भूमिका दिली आहे. प्रतीक गांधी यांचा अधिकारी आदित्य Muscle Power च्या जोरावर किंवा डायलॉगबाजी वर न जिंकता बुद्धी आणि डावपेचांनी शत्रूच्या हद्दीत कसा शिरतो हे पाहण्यासारखे आहे.

का पहावा:

चित्रपट MAMI मुंबई, शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांसह अनेक महोत्सवांत दाखवला गेला, त्यामुळे दर्जाची काहीशी हमी आहे.

२००० च्या दशकातील शेवटच्या काळातील गोंगाट न करणारे, वातावरण आणि गुन्हेगारी चित्रपट तुम्हाला आठवत असतील, तर ‘घमसान’ची तीच पठडी तुम्हाला आवडू शकते. यातील राजपाल यादवची सहाय्यक भूमिका चित्रपटाचे खास आकर्षण मानले जाते.

समीक्षकांच्या मते

चित्रपट विषयाच्या खोली बाबत काहीसा अपूरा पडतो, गती संथ आहे आणि पात्रांची designing अपूर्ण वाटते. डकैत हा विषय आणि धुलिया यांची शैली आवडणाऱ्यांसाठी योग्य.

प्रकार: ऐतिहासिक ॲक्शन मालिका | एकूण भाग: ८

थोडक्यात कथानक:

१९१० च्या दशकातील कथानक, चार विशेष प्रकाशात न आलेले क्रांतिकारक :रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सान्याल, बाघा जतिन यांची गोष्ट. ब्रिटीश राजवटीविरुद्ध सशस्त्र उठावाची योजना आखण्यासाठी भूमिगत जाळे उभे करतात.

वैशिष्ट्ये:

संजीव सान्याल यांच्या ‘ Revolutionaries : The Other story of how India won its freedom ‘ या बेस्टसेलर पुस्तका वर आधारित. मुख्य प्रवाहात कमी आलेल्या अशा सशस्त्र क्रांतीच्या घटनेवर प्रकाश टाकणारी ही मालिका आहे. यात भूवन बाम हे रासबिहारी बोस साकारतात, रोहित सराफ सचिंद्रनाथ सान्याल, तर प्रतिभा रांता आणि गुरफतेह पिरझादा देखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. निर्मिती मूल्य मोठे आहे . छायाचित्रण, पोशाख, नेपथ्य यांनी १९१० च्या दशकाचा माहौल पुन्हा उभा केला आहे, आणि संगीतही कौतुकास पात्र आहे.

का पहावा:

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘अहिंसा’च्या बाहेरची कार्यरत दुसरी विचारधारा दाखवणारी ही मालिका वेगळा ऐतिहासिक दृष्टिकोन देते. भूवन बामच्या अभिनयात ‘जिवंत आकर्षण’ असल्याचे मत व्यक्त झाले आहे, रोहित सराफचेही कौतुक झाले.

मात्र काही समीक्षकांच्या मते भावनिक खोली अपुरी आहे, क्रांतिकारकांनी हिंसक मार्ग का निवडला याचे मानसिक विश्लेषण फारसे नाही, आणि एकूण मालिका गंभीर इतिहासापेक्षा ॲक्शन मनोरंजनाकडे झुकते.

प्रकार: कौटुंबिक नाट्य/प्रेमकथा | भाषा: तमिळ (बहुभाषिक डबिंगसह)

थोडक्यात कथानक:

सरोगसीद्वारे वडील बनलेला एक अब्जाधीश खेळाडू, मुलाच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमुळे सरोगेट आईशी संपर्क साधतो, आणि वयातील फरकामुळे संकोचलेली एक प्रेमकथा सुरू होते.

वैशिष्ट्ये:

OTT Watchlist Guide मधे तिसर्या क्रमांकावर सूर्या अभिनीत Vishwanath and Sons या चित्रपटाची थिएटरमध्ये जागतिक स्तरावर २६० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे, आणि २०२६ मधील तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बॉक्स ऑफिस यशांपैकी एक ठरला आहे. वेंकी अटलुरी दिग्दर्शित हा चित्रपट बालपणातील आघात, सरोगसी आणि वयातील फरक असलेली प्रेमकथा यांसारख्या संवेदनशील विषयांना हाताळतो. सूर्याचा अभिनय प्रेक्षकांनी ‘अयान नंतरचा सर्वोत्तम सूर्या चित्रपट’ म्हटला आहे, आणि भावनिक दृश्ये पाहून ‘खरोखर डोळे भरून आले’ अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाली आहे. ममिता बैजूचा सहज अभिनयही भरपूर कौतुकास पात्र आहे.

का पहावा:

भावनिक उब, संवेदनशीलतेने भरलेला पण विनोदही असलेला कौटुंबिक चित्रपट हवा असेल, तर हा नक्की पहा. IMDb रेटिंग ७.६, आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्ये ‘भावनिक उबदारपणा’ आणि ‘सच्चेपणा’ यांवर भर आहे.

लक्षात ठेवा .. काही प्रेक्षकांनी Netflix आवृत्तीत चित्रगुणवत्तेची (HDR आणि Dolby Vision नसणे) तक्रार केली आहे. सूर्याचे चाहते किंवा कौटुंबिक भावनिक विषय आवडणाऱ्यांसाठी हा चित्रपट योग्य आहे.

प्रकार: ॲक्शन थ्रिलर | भाषा: मल्याळम

थोडक्यात कथानक:

दीर्घकाळ घरापासून दूर राहिल्यानंतर एक व्यक्ती आपल्या गावी परततो, आणि त्याचे येणे वर्षानुवर्षे दबून राहिलेल्या कौटुंबिक वैमनस्य आणि जुन्या शत्रूंना पुन्हा उघड करते.

वैशिष्ट्ये:

जोजू जॉर्ज अभिनीत, शाजी कैलास दिग्दर्शित. सूड हा मुख्य धागा, त्यात विश्वासघात, कुटुंब आणि मुक्ती हे विषय गुंफलेले आहेत. मुरली गोपी, अर्जुन अशोकन यांसारखे मल्याळम चित्रपटसृष्टीतील सक्षम कलाकार कास्टमध्ये आहेत.

का पहावा:

स्पष्टपणे सांगायचे तर, या चित्रपटाचे मूल्यांकन चांगले नाही. समीक्षकांनी स्पष्ट म्हटले आहे की पटकथा जुनी आणि तर्कहीन आहे, शैली स्लो-मोशन आणि ठराविक मारामारीवर अवाजवी अवलंबून आहे, आणि भावनिक अभिव्यक्ती पोकळ आहे. जोजू जॉर्जचे कट्टर चाहते किंवा मल्याळम ॲक्शन चित्रपटांचे हार्डकोर रसिक यांच्याशिवाय इतरांनी हा चित्रपट पाहण्याबाबत सावध विचार करावा.

५. अली बाबा और ४० भूत (Ali Baba Aur 40 Bhoot)प्लॅटफॉर्म: JioHotstar |

प्रकार: हॉरर-कॉमेडी मालिका

थोडक्यात कथानक:

विज्ञान आणि तर्कावर विश्वास ठेवणारी एक न्यूरोसायकॉलॉजिस्ट आपल्या गावी गायब झालेल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ वडिलांच्या शोधात जाते, आणि ४० अस्वस्थ आत्म्यांच्या प्राचीन कोड्यात अडकते.

वैशिष्ट्ये:

आशा नेगी मुख्य भूमिकेत ‘आलिशा’ ही व्यक्तिरेखा साकारते, विशाल वशिष्ठ एक गोंधळलेला पण दयाळू पोलीस साकारतो, आणि दोघे मिळून तपास-जोडी बनवतात. ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ या लोककथेवर सैलपणे आधारित, जिथे ४० चोरांच्या जागी ४० भूतं आहेत.

का पहावा:

ही मालिका देखील फारशी शिफारसीय नाही. समीक्षकांच्या मते मालिका भीती आणि विनोद यांमध्ये दोलायमान राहते, विनोद obvious वाटतात, भीती जुन्या जंप-स्केअरवर चालते, आणि कथानक संथ आहे. एकमेव आकर्षण विशाल वशिष्ठचा अभिनय असू शकतो, ज्याने पात्राचा गोंधळ आणि सच्चेपणा बऱ्यापैकी विनोदी रंगवला आहे. भारतीय हॉरर-कॉमेडीची विशेष आवड नसेल तर वगळा.

OTT Watchlist Guide September 2026 या गणेश उत्सव काळातील OTT कार्यक्रमांचा हा एक आढावा आहे.‌ जो watchlist reference म्हणून तुम्हाला नक्कीच मदत करेल .

आमची थेट शिफारस :

झटपट निर्णय मार्गदर्शक – OTT रिलीज

🎬 निर्णय मार्गदर्शक

११ सप्टेंबर २०२६ पासून– या आठवड्यातील OTT रिलीज

तुमची आवडशिफारस
जुन्या पद्धतीचा क्राइम थ्रिलर, जर तिग्मांशू धुलिया शैली आवडत असेल तरघमसान (ZEE5)
ऐतिहासिक विषय, भारतीय स्वातंत्र्यलढा, भूवन बामचा अभिनय पहायचा असेल तरद रेव्होल्यूशनरीज (Prime Video)
कौटुंबिक भावना, सूर्या चाहते असाल तर, Warm चित्रपट आवडतोविश्वनाथ अँड संस (Netflix)
टाळण्यासारखेवरवु आणि अली बाबा और ४० भूत वगळा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment