Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

‘जोड़ीदार म्हणून आमचा प्रवास इथेच संपतो !’ असे म्हणत आदिनाथ कोठारे व पत्नी उर्मिला यांनी वेगळे होण्याचा निर्णय Instagram वर जाहीर केला आहे

१५ वर्षांच्या संसारानंतर आदीनाथ कोठारे व उर्मिला कोठारे या मराठी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता दांपत्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.आपला हा निर्णय आम्ही समन्वयाने घेतला आहे असे त्यांनी Instag च्या आपल्या पोस्ट मधे म्हटलै आहे

सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय

Adinath Kothare and Urmila Divorce – गेल्या काही वर्षांत चित्रपट सृष्टि मधील जोडप्यांकडून ‘समन्वयाने Divorce’ घेण्याच्या घटना वरचेवर आढळून येत आहेत. कूठलीही कोर्ट कचेरी वा वाद न करता एकमेकांच्या सहमतीने या निर्णयावर येणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे.असे असले तरी एक दीड दशक किंवा जास्त काळ आयुष्याची सोबत केल्यानंतर व विशेषतः अपत्य असताना असा टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हे प्रसिद्ध नटांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक असते.

काय लिहिले आहे Instagram Post वर

खूप विचार केल्यानंतर!... अशी सुरूवात करत या पोस्ट मधे आदिनाथ व उर्मिला यांनी आम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे होत आहोत व वा “जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच संपतो!” असे निर्णायक वाक्य या Insta post मधे लिहिले आहे.

मुलगी जिजा हिचे Co Parenting करणार

Insta Post मधे पुढे .. आम्ही विभक्त झालो तरी मुलगी जिजा ही आमच्यासाठी सर्वस्व आहे व तिचे सांगोपन आम्ही एकत्रितपणे (Co parenting) करणार आहोत असे म्हटले आहे.

मित्र ,मीडीया व हितचिंतकांना अपील

आदिनाथ व उर्मिला ने जनतेला अपील करत ” आमच्या Privacy चा आदर करा” तसेच “या विषयावर पूढे कोणतीही चर्चा वा कमेंट आम्ही करणार नाही !”असे म्हणत या नोट चा शेवट केला आहे.


चित्रपट तारकांतील वैवाहिक कलह व घटस्फोट

Adinath Kothare and Urmila Divorce झाल्याची र्चा सध्या मराठी चित्रपट सृष्टीत आहे.पण हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिषेक बच्चन व ऐश्वर्या बच्चन तसेच गोविंदा व सुनीता यांच्या न झालेल्या Divorce च्या चर्चाही अधूनमधून होत असतात. अजूनतरी हे Divorce झालेले नाहीत.

मराठी चित्रपट सृष्टीतील गिरीश ओक ( गिरिजा ओक चे वडील)या जेष्ठ अभिनेत्यांनी काही वर्षांपूर्वी पत्नीपासून विभक्त होवून वेगळा संसार मांडला आहे. अशाप्रकारे चाळीशी मधे किंवा चाळीशी पूढे अनेक वर्षांच्या संसारानंतर असा घटस्फोट घेण्यास Gray Divorce म्हटले जाते.

आमिर खान या बॉलिवूड स्टार ने तर नुकतेच तिसरे लग्न केले आहे. या लग्नाला त्याच्या दोन्ही पूर्वपत्नी हजर होत्या व या पराकोटीच्या’समन्वयाबद्दल’ आमीर खान यांना नेटकर्यांनी बरेच troll केले आहे.

लग्नसंस्था कालबाह्य ?

वरील सर्व घटना आणि नुकतीच पुढे आलेली Adinath Kothare and Urmila Divorce बाबतची Instagram post पाहता एकूणच ‘लग्नसंस्था’ ही आजच्या समाजात हळूहळू कमकुवत होत आहे असे चित्र दिसत आहे. व्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्तीवाद हा नव्या पीढीची मूळ जीवन प्रेरणा आहे. अशा परिस्थितीत समर्पण भावाला न मानणे किंवा झुगारणे हे स्वाभाविक असे वर्तन आहे. नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी “लग्न संस्था कालबाह्य”झाल्याचे विधान एका Podcast मधे केले होते. आपल्या नातीनेही लग्न करू नये असा विचार त्यांनी जाहीरपणे मांडला होता. जाहीर पणे विभक्त होण्याचा निर्णय मांडण्याची पाळी न येण्यासाठी जया बच्चन यांचा विचार अवलंबावा की तडजोडी स्वीकारत व समन्वयाने वैवाहिक जीवन टिकवावे हे आजची सुजाण पीढी स्वतः ठरवेलच..


आदिनाथ यांची मूळ इंस्टाग्राम post खालील लिंक वर पहा

हे ही वाचा

➡️AI च्या युगात लेखणीतून काळाचा खेळ मांडणारा Hollywood चा लेखक दिग्दर्शक

➡️Sanjeev Kumar लाच मानायची त विठ्ठल | तो मिळावा म्हणून तिने पंढरपूर च्या विठ्ठलालाच साकडं घातलं

महाराष्ट्रात Old Monk Rum का मिळत नाही? निर्मिती बंद झाली आहे? खरे कारण काय?

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment