ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रात Old Monk उपलब्ध नाही आहे त्यामुळे या Iconi Rum चे प्रेमी सध्या निराश झाले आहेत. निर्माते Mohan Makins कडून याबाबत अजून अधिकृत असे वक्तव्य आलेले नाही, पण Social Media वर काही accounts वरून याबाबत विचारणा होत आहे ..

Maharashtra News – Old Monk : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये ऐन पावसाळ्यात‘ओल्ड मॉन्क’ (Old Monk) ही लोकप्रिय Iconic Dark Rum वाईन शॉप्स मधे सध्या् मिळेनाशी झाली आहे. ऐन पावसाळ्यात गोडसर Vanilla notes चा flavour असलेली Old Monk रिचवण्याच्या आनंदाला ओल्ड मॉंक प्रेमी यंदा मुकले आहेत. वाईन शॉप्स आणि बार बाहेर “No Stock” चे बोर्ड दिसल्याने सोशल मीडियावर अनेकांनी यावर पोस्ट लिहिल्या आहेत. काहिंना “हा ब्रँड कायमचा बंद झाला की काय?” अशी भीती ही वाटत आहे.
Old Monk Rum हा ब्रँड बंद झालेला नाही.
Old Monk चे निर्माते Mohan Meakins कडून Old Monk तुटवड्या बाबत अधिकृत असा कुठलाही खुलासा वा Press Release केले गेलेले नाही. Distributors व Wine Shop owners कडून Old Monk Rum चे production बंद झालेले नाही याबाबत ग्वाही दिली आहे. सध्याच्या तुटवडा तात्पुरता असून त्याची काही कारणे वितरक समुदायाकडून दिली जात आहेत.
Old Monk Rum तात्पुरत्या तुटवड्याची कारणे खालीलप्रमाणे:
१. FSSAI ने बदललेले नियम
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) अल्कोहोलयुक्त पेयांच्या ingredients ची मंजुरी तसेच लेबलिंग बाबत नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नवीन नियमावलीच्या पूर्ततेसाठी आणि तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेसाठी पुरवठा साखळीत (Supply Chain) अडथळे निर्माण झाले आहेत. ही मंजुरी मिळेपर्यंत बाजारात नवीन स्टॉक येणे थांबले आहे. तसेच आधीच वितरीत झालेला स्टॉक ही नवीन नियमानुसार लेबलिंग करण्या साठी मागे बोलावण्यात आला आहे.
२. खोपोली व उत्तरेतील प्लांटवर भार
ओल्ड मॉन्कची उत्पादक कंपनी ‘मोहन मेकिन’ (Mohan Meakin) समूहाने गेल्या काही वर्षांत लखनऊ आणि चेन्नई येथील आपले जुने उत्पादन प्रकल्प कायमचे बंद केले आहेत. त्यामुळे सध्या या ब्रँडच्या उत्पादनाचा बहुतांश भार महाराष्ट्रातील खोपोली येथील मुख्य प्रकल्पावर आणि उत्तर प्रदेशातील प्रकल्पांवर आहे. सध्याचे मर्यादित उत्पादन पाहता अचानक वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे कंपनीला सध्या कठीण जात आहे.
३. मिलिटरी कॅन्टीनकडून लष्करी पुरवठ्याला प्राधान्य
भारतीय लष्करामध्ये (India Army Canteens) ओल्ड मॉन्कला नेहमीच प्रचंड मागणी असते. जेव्हा उत्पादनात घट होते, तेव्हा कंपनीकडून पहिल्यांदा मिलिटरी कोटा आणि कॅन्टीनचा पुरवठा पूर्ण केला जातो. यामुळे खुल्या व्यावसायिक बाजारासाठी (Commercial Market) अत्यंत कमी साठा शिल्लक राहतो.
४. पावसाळ्यातील वाढती मागणी
महाराष्ट्रात पावसाळ्याच्या दिवसांत Old Monk Rum ची मागणी कमालीची वाढते. एकीकडे पुरवठा आधीच कमी झालेला असताना, दुसरीकडे ग्राहकांकडून अचानक अतिरिक्त मागणीमुळे (Seasonal Demand) बाजारातील उपलब्ध स्टॉकही संपून गेला आहे.
थोडक्यात सांगायचे तर: ओल्ड मॉन्क कंपनी किंवा ब्रँड बंद झालेला नाही. Old Monk चा इतिहास पाहता ही Rum एक Cult म्हणून भारतीय जनमानसात रूजली आहे. या Brand Identity देणार्या Rum ची निर्मिती बंद करणे मोहन मेकिन्स कंपनीलाही परवडण्यासारखे नाही.येत्या काही काळात सरकारी नियमावलीची प्रक्रिया पूर्ण होताच आणि खोपोली प्रकल्पातून पुरवठा सुरळीत होताच ओल्ड मॉन्क पुन्हा वाईन्स शॉप्समध्ये उपलब्ध होईल, असा अंदाज उद्योग सूत्रांनीही वर्तवला आहे.
Instagram वर Old Monk च्या मार्केट मधून गायब होण्याबाबत अनेक पोस्ट पहायला मिळतात.त्यातीलच @punepulse या अकाऊंट ची एक प्रातिनिधिक पोस्ट(Reel) खाली आपण पाहू शकता. यात मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांच्या Old Monk संबधी पोस्ट चा आढावा घेतलेला आहे.
FAQ :
ओल्ड मॉन्क आणि भारतीय लष्कराचे (Indian Army) काय नाते आहे?
ओल्ड मॉन्कचे निर्माते कपिल मोहन हे स्वतः भारतीय लष्करात ब्रिगेडियर/जनरल राहिले होते भारतीय लष्करात काम केल्यामुळेच त्यांना लष्कराच्या गरजांची जाणीव होती. प्रथमतः सैन्याच्या मिलिटरी कॅंटिन मधे सैनिकांसाठी उपलब्ध केली गेलेली ही रम पुढे नागरी बाजारात ही उपलब्ध होवू लागली .
Old Monk बनवणारी मोहन मेकिन्स ही कंपनी मूलतः ब्रिटिश व्यक्तीची होती का?
होय Edward Abraham Dyer या ब्रिटिश व्यावसायिकाने १८५५ मध्ये हिमाचल प्रदेशातील कसौली (Kasauli) येथे आशियातील पहिला बिअर कारखाना (Brewery) सुरू केला होता.
पुढे १९४९ मधे नरेंद्र नाथ मोहन (N.N. Mohan) यांनी कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन आपल्या हाती घेतले. १९५४ मधे नरेंद्र नाथ मोहन यांचा मुलगा कपिल मोहन याने Old Monk Rum चे उत्पादन सुरू केले
१९१९ चे जालियनवाला बाग हत्याकांड करणाऱ्या जनरल डायरचा Old Monk कंपनी शी काय संबंध आहे?
जनरल डायरचा Old Monk बनवणार्या कंपनीशी संबंध आहे पण तो संबंध थेट नाही.सध्याच्या कंपनीचे पहिले ब्रिटिश मालक एडवर्ड डायर यांचे ते पुत्र होते.
हे ही वाचा
- Prada – छोट्याशा दुकानापासून जागतिक ब्रँड पर्यंत -Prada Luxury Fashion Brand चा इतिहास जाणून घ्या
- Tesla India च्या किती गाड्या भारताच्या रस्त्यावर? काय आहे Tesla Car price in India जाणून घ्या

