Prada- आहे अती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड- जाणून घ्या प्राडा बद्दल सर्व काही
Prada-हाअती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड आहे. “मिनिमलिस्ट फॅशन डिझाईन” हे प्रादाचे वैशिष्ट्य आहे. 1913 साली इटली मधे एक छोटेखानी चामड्याच्या वस्तू विकणारे दुकान आज जागतिक फॅशन ब्रांड झाले आहे. या यशा मागे रूढ सौंदर्य संकल्पनेला छेद देत मांडलेली त्यांची ugly chic ही भूमिकाच आहे हे निश्चित.






