Nashik Dhol चा धडाकेबाज ठेका आज तरुणाईला आवडतो आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला हा वाद्यमेळा नाशिकच्या अन्सारी या मुस्लिम समुदायाने ५० च्या दशकात सुरू केला होता. याला सुरूवातीला ‘बडा ढोल’ असे नाव होते.

गणेश विसर्जनात अन्सारी समाजाचे नाशिक ढोल पथक: हरित लवादाची बंधने कोर्टाने उठवली
विसर्जन सोहळ्यात Indian Green Tribunal ने सर्वच ढोल ताशे पथकांवर 30 वादक संख्येची मर्यादा घातली होती पण चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी ही मर्यादा उठवत “Let them continue!” असे म्हटले आहे. या निर्णयामुळे जेष्ठ नाशिक ढोल वादकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
“Let them continue with Dhol Tasha!”
– चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड
“Let them continue with Dhol Tasha!”
सध्या अनेक प्रकारच्या ढोल ताशे पथकांची मांदियाळी असली तरी ‘नाशिक ढोल’ या नाशिक च्या सूप्रसिद्ध अशा अन्सारी या मुस्लिम समाजाचे बहुसंख्य सदस्य असलेल्या ‘नाशिक-ढोल’ या ढोल ताशे पथकासाठी देशभरातून मागणी असते. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निर्णयाचे जेष्ठ Nashik Dhol वादकांनी स्वागत केले आहे.
1950 पासून कार्यरत

(वरील चित्रात गुलाब खान आपल्या नाशिक ढोल पथकासह -Photo courtesy Indian Express)
नाशिक ढोल पथकाची स्थापना 1950 साली नाशिकच्या मुसलमान समुदायाने केली होती. बादशहा अन्सारी व गुलाब खान यांची पथके सुप्रसिद्ध होती. बादशहा अन्सारी यांच्या पथकातील वादकांची केशरचना व वादना दरम्यान ते करत असलेले कसरती चे प्रयोग 50 च्या दशकात फार लोकप्रिय झाले.
सुरूवातीला फक्त मुसलमान समाजाच्या उत्सवांमध्ये, खास करून ईद आणि मोहर्रम मिरवणुकीत हा ढोल वाजवला जात असे. मात्र, काळाच्या ओघात, Nashik Dhol पथकाची लोकप्रियता वाढत गेली आणि हिंदू समाजानेही आपल्या सण-उत्सवांत त्याला महत्त्वाचे स्थान दिले.
मारवाडी व सिंधी समाजाने दिली संधी
सुरूवातीला मारवाडी व सिंधी समाजाने नाशिक ढोल पथकाला आपल्या उत्सवांमधे ढोल वाजविण्यास आमंत्रित केले. 70 च्या दशकात पहिली सुपारी मारवाडी समाजाकडून होती व नाशिक ढोल ने राजस्थानमधे जावून आपली कला सादर केली होती. राजस्थान मधून पुढे नाशिक ढोल पथकाला एवढी मागणी येवू लागली की राजस्थान मधे त्यांना कार्यालय सुरू करावे लागले होते.
इथून पुढे या नाशिक ढोल पथकाची प्रसिद्धी होत गेली व देशभरातून कार्यक्रमासाठी आमंत्रणे येवू लागली. दरवर्षी गणेश उत्सवामधे विशेष करून नाशिक ढोल चे आयोजन होत असते.
धार्मिक ऐक्याचा ठेका – हिंदू मुस्लिम एकता

नाशिक ढोल हा एक प्रकारचा मोठ्या आकाराचा ढोल असतो, जो उंच आणि दणकट आवाज देतो. त्याच्या ठेक्यांमध्ये असलेल्या ऊर्जा आणि जोशामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती आणि अशा इतर हिंदू सणांमध्ये त्याचा वापर होताना दिसतो. यामधून गणेश उत्सवातून साधलेली हिंदू मुस्लिम एकता आणि सामाजिक समन्वयाचे अप्रत्यक्षरित्या दर्शन घडते.
मुस्लिम समाजाने सुरू केलेल्या या पथकाला हिंदू समाजाने आपल्या सणांमध्ये सामावून घेतल्याने वेगवेगळ्या धर्माच्या समाजांमधील ऐक्य, सहिष्णुता, आणि एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्याचे उदाहरण नाशिक ढोलने घालून दिले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण Rhythm चे तरुणाईला आकर्षण
नाशिक ढोल पथकांच्या तालिमी ऑगस्ट महिन्यातच सुरू होतात . मुंबई पुण्याच्या गणेश उत्सव ढोल पथकांमध्ये मुलींचा सहभाग ही दिवसेंदिवस वाढत आहे.
आज नाशिक ढोल पथके महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, तसेच भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या संगीतकलेने लोकांची मने जिंकत आहेत.त्यांच्या ढोलाच्या ठेक्यांमध्ये एक अनोखा जोश, आनंद, आणि जल्लोष असतो, जो सणांच्या उत्साहाला अधिक रंगत आणतो. नाशिक ढोलचा हा Rhythm तरुणाईला विशेष आवडतो.
यावर्षी ही गणेश उत्सव सोहळ्याची सांगता असलेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात नाशिक ढोल दणक्यात वाजणार आहे व धार्मिक ऐक्याचे पडसाद आसमंतात घुमणार आहेत.
हे ही वाचा:
- ‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीची मूर्ती कशी सापडली होती? जाणून घ्या कसबा गणपतीचा इतिहास..
- गणेश जयंती व गणेश चतुर्थी मधला फरक काय आहे ? Ganesh Jayanti चे महत्व जाणून घ्या..


