Charlie Chaplin and Buster Keaton: चार्ली चॅपलीन हे मूकपट काळात प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच Buster Keaton हा नट आपल्या Stunts साठी Hollywood मधे सुप्रसिद्ध झाला होता. एकदा चार्ली यांच्या मुलीबरोबर आलेल्या मित्राने बस्टर किटॉन ची एवढी स्तुती त्यांच्यापुढे केली की चार्ली चॅपलीन उदास व गप्पच झाले ..

चार्ली चॅपलीन यांची मुलगी जेराल्डीन (Geraldine) हिने सांगितला होता किस्सा
Charlie Chaplin यांची मुलगी जेराल्डीन यांनी आपल्या वडीलांबद्ल सांगितलेला हा किस्सा चार्ली आणि बस्टर किटॉनचे वेगळे नाते सांगतो.चार्ली चॅपलीन हे Buster Keaton या प्रतिस्पर्धी नटाबद्दल मनात छुपी ईर्षा बाळगून असावेत असाही अर्थ काही समिक्षक काढतात.
काय घडले होते त्या दिवशी
चार्ली चॅपलीन यांची मुलगी जेराल्डीन हिने एका माहितीपटासाठी दिलेल्या मुलाखतीत हा प्रसंग सांगितला आहे. त्यांनी असे सांगितले की….. त्या दिवशी जेराल्डीन आपल्या एका तरुण मित्राला चार्ली चॅपलीन यांना भेटण्यासाठी घेऊन आल्या होत्या. हा त्यांचा मित्र सिनेमा या विषयाबाबत अभ्यासू व उत्साही होता. चार्ली चॅपलीन यांच्यासमोर बसून तो Buster Keaton या नटाबद्दल भरभरून बोलू लागला. Buster Keaton हे किती महान नट आहेत व त्यांचे चित्रपट कसे उत्कृष्ट आहेत हे तो चार्ली चॅपलीन यांना सांगत होता.
Geraldine यांनी असे पाहिले की त्यांचे वडील’चार्ली चॅपलीन हे Buster Keaton यांची ही स्तुती ऐकत असताना हळूहळू गप्प होत गेले.”कुणी तरी त्यांच्यावर आघात करावा व ते घायाळ होवून आपल्या कोशात आकुंचित होत जावे अशी त्यांची शरीरभाषा दिसत होती” असं Geraldine नमूद करते.
.. Geraldine पुढे म्हणाल्या. या नंतर Charlie Chaplin खोलीतील Fire place ( अग्नी कुंड) समोर गप्प बसून ज्वालांकडे एकटक पहात राहिले. शेवटी ते खिन्न पणे एवढेच म्हणाले....
” मी ही एक कलाकार होतो…! मी त्याला काम दिले होते!”
Charlie Chaplin and Buster Keaton: समांतर आयुष्य

चार्ली चॅपलीन यांचा जन्म 1889 चा तर बस्टर किटॉन यांचा जन्म 1895 चा. दोघांचे बालपण हालाकीत व गरीबीत गेले. दोघेही लहान वयात मनोरंजन व्यवसायात काम करु लागले. पुढे 1910 ते 1930 या दोन दशकांत ते Hollywood चे श्रेष्ठ विनोदी नट म्हणून नावारुपाला आले. दोघेही समकालीन नट व दिग्दर्शक होते. दोघेही विनोदी सिनेमे बनवत पण त्यांची शैली भिन्न होती. चार्ली यांचे उदास भोळे पात्र ट्रॅंप (Tramp) प्रेक्षकांना आवडे याचवेळी कमालीचा भावहीन निर्विकार चेहरा ठेवून अचाट स्टंट करणारा बस्टर किटॉन ही प्रेक्षकांना आवडे. बस्टर यांच्या या प्रसिद्ध निर्विकार चेहर्यावरून त्यांना ‘ The Great Stone Face’ (पाषाण मुखी)असे नाव पडले होते.
निवृत्ती काळात चॅपलीन यांनी Buster Keaton ला Limelight या बोलपटात काम दिले होते
50 च्या दशकात मूकपटांचा काळ संपल्यानंतर Hollywood मधे बोलपट सुरू झाले होते. Charlie Chaplin and Buster Keaton हे दोघे ही निवृत्तीच्या टप्प्यात होते. या दरम्यान बस्टर यांची परिस्थिती काहिशी बिकट झाली होती. याच काळात 1952 साली Charlie Chaplin यांनी Limelight हा बोलपट बनवला होता ज्यात त्यांनी Buster Keaton यांना एक छोटीशी भूमिका ही दिली होती. Buster यांना काही मदत व्हावी या हेतूने दिलेली ही भूमिका फक्त दोन सीन पुरतीच मर्यादित होती. हॉलिवूड मधे तेंव्हा अशी ही चर्चा रंगली होती की चार्ली चॅपलीन यांनी Buster यांची भूमिका मुद्दाम कापली, कारण चार्ली यांना Buster आपल्याहून वरचढ (upstaged)झाल्यासारखे वाटले होते.
50 च्या दशकात मूकपटांचा काळ संपल्यानंतर Hollywood मधे बोलपट सुरू झाले होते. Charlie Chaplin and Buster Keaton हे दोघे ही निवृत्तीच्या टप्प्यात होते. या दरम्यान बस्टर यांची परिस्थिती काहिशी बिकट झाली होती. याच काळात 1952 साली Charlie Chaplin यांनी Limelight हा बोलपट बनवला होता ज्यात त्यांनी Buster Keaton यांना एक छोटीशी भूमिका ही दिली होती. Buster यांना काही मदत व्हावी या हेतूने दिलेली ही भूमिका फक्त दोन सीन पुरतीच मर्यादित होती. हॉलिवूड मधे तेंव्हा अशी ही चर्चा रंगली होती की चार्ली चॅपलीन यांनी Buster यांची भूमिका मुद्दाम कापली, कारण चार्ली यांना Buster आपल्याहून वरचढ (upstaged)झाल्यासारखे वाटले होते.
Limelight चित्रपटातील Charlie Chaplin and Buster Keaton यांचे एक दृश्य खालील Youtube video मधे पहा:
Buster Keaton यांची परिस्थिती बिकट होण्यामागची कारणे
बोलपटांमधे मूकपटातील नायक निष्प्रभ
Buster Keaton यांचा कारकीर्दीचा आलेख बोलपट सुरू झाल्यावर खूप खाली आला होता. बोलपटांमुळे आता संवादांना महत्व आले होते . कथनशैली बदलली होती . अशात Buster Keaton सारख्या विना-संवाद ; केवळ Stunt दृश्यांमधून प्रेक्षकांना अवाक करणारा नट मागे पडणे स्वाभाविक होते.

The General (1926) महत्वाकांक्षी चित्रपटाचे अपयश
बस्टर किटॉन यांनी 1926 साली The General या महत्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे बजेट 7 लाख 50 हजार डॉलर एवढे प्रचंड होते. पण या चित्रपटाने कमाई मात्र केवळ 4 लाख 74 हजार 264 डॉलर्स इतकीच केली. या आर्थिक नुकसानीतून बस्टर किटॉन पुढे कधीच बाहेर येऊ शकले नाहीत.
The General मधील Bridge वरून Train कोसळण्याचा सीन गाजला

The General चित्रपटातील ‘पुलावरून रेल्वे गाडी कोसळण्याचा महत्वाकांक्षी सीन’ Buster यांनी चित्रित केला होता. अमेरिकेच्या Oregon प्रांतातील रो नदीवर (Row River) हा 215 फूट लांब लाकडी पूल बांधण्यात आला होता व यावरून खरी रेल्वे गाडी खाली कोसळण्याचे थरारक दृश्य 23 July 1926 रोजी चित्रित करण्यात आले होते. हे दृश्य आजच्या सारखे Multi Camera setup लावून 6 कॅमेरे लावून चित्रित झाले. या एकाच दृश्याचा खर्च 42,000 डॉलर (आजचे 5-6 कोटी) इतका प्रचंड होता.
केवळ ही अद्भुत शूटिंग पहाण्यासाठी Oregano प्रांतात सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली होती व 3 ते 4 हजार आरेगानो वासी हे चित्रिकरण पहायला आले होते.
जरी The General हा चित्रपट आर्थिक दृष्ट्या अपयशी ठरला तरी Hollywood इतिहासातील तो एक Milestone मानला जातो
- महान दिग्दर्शक Orson Welles यांनी The General या चित्रपटाची स्तुती करताना ” आत्तापर्यंत बनलेला सर्वोत्तम विनोदी चित्रपट!” असे म्हटले आहे.
- AFI (American Film Institute)च्या सर्वोत्तम 100 अमेरिकन चित्रपटांच्या यादीत The General 18 वा आहे.
- Indiana Jones व यासारख्या अनेक hollywood साहस पटांनी Buster Keaton यांच्या The General मधून प्रेरणा घेतली आहे.
MGM Studio शी करार – Worst Mistake
बोलपट काळात Hollywood मधे स्टूडिओ सिस्टीम सुरू झाली. Buster Keaton यांनी MGM ( Metro-Goldwyn-Mayer) स्टूडिओ या मोठ्या स्टूडिओ शी 26 जानेवारी 1928 ला करार करून आर्थिक स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न केला. हा करार दोन वर्षांचा होता. बस्टर किटॉन यांना आठवड्याला 3000 Dollar एवढा लठ्ठ पगार ठरला होता जो MGM STUDIO मधे इतर कुणालाच मिळत नव्हता. पण याची दुसरी वास्तव बाजू अशी होती की करारानुसार Buster हे पूर्णपणे Studio चे बाधील झाले होते. करारा अनुसार त्यांना जिवाचा धोका असलेले Stunt करण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. हे त्यांच्या मूळ बलस्थानावरच घाव केल्यासारखे होते . एके काळी स्वत:ची सिने कंपनी चालवणार्या बस्टर यांना या अटी जाचक वाटत होत्या.
विशेष म्हणजे चार्ली चॅपलीन यांनी Buster Keaton यांना ‘हा करार त्यांनी करू नये’ असा सल्ला दिला होता. शेवटी 1933 साली हा करार संपल्यावर बस्टर यांनी स्वतः ” It was my worst mistake!” अशी प्रतिक्रिया दिली होती.
कौटूंबिक कलह व व्यसन
या काळात Buster Keaton यांना कोटुंबिक कलहामुळे मानसिक तणावातून जावे लागले आणि यातूनच त्यांना मद्यपानाचे व्यसन जडले.
वरील सर्व कारणांमुळे बस्टर किटॉन शेवटच्या काळात आर्थिक व मानसिक दृष्ट्या अस्थिर होते. आपल्या अचाट व अवाक करणार्या स्टंटमुळे त्यांनी मूकपटांचा काळ (Silent era of Hollywood) गाजवला होता.अमेरिकेत त्यांची प्रसिद्धी Charlie Chaplin एवढीच होती. हे दोघेही महान नट विनोदी चित्रपट बनवत पण त्यांच्या शैलीमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.
Buster Keaton यांची वेगळी शैली
Charlie Chaplin प्रेक्षकांना हसत हसत भावुक करत होते तेंव्हाच Buster Kiton चे अचाट स्टंट प्रेक्षकांना आवाक करत होते. दोघांनी Hollywood silent era गाजवला . चार्ली चॅपलीन आपल्या चित्रपटातून वंचितांचे दुःख आपल्या चित्रपटात मांडत तर Buster Keaton हे माणुस विरुद्ध मशीन हा अस्तित्ववादी संघर्षाचा थरार मांडत.त्या काळी समिक्षकांनी चार्ली चॅपलीन यांना अभिजात कलावंत मानले पण बस्टर यांच्याकडे STUNT MAN म्हणून दुर्लक्ष केले.असे असले तरी आज मात्र सिनेतंत्र अभ्यासक बस्टर यांच्या सिनेतंत्राची आवर्जून दखल घेताना दिसतात जे काळाच्या पुढचे होते.
अमेरिकेबाहेर लोकांना बस्टर किटॉन YouTube मुळे माहित झाले
अमेरिकेबाहेर बस्टर किटॉन यांचे चित्रपट योग्य प्रकारे वितरीत झाले नव्हते. पण गेल्या दोन दशकांत प्रसारित झालेल्या YouTube वरील त्यांच्या Stunt च्या चित्रफितींमुळे आमेरिके बाहेरील लोकांना ते जास्त दिसले व माहित झाले.



चार्ली चॅपलीन व बस्टर किटॉन यांनी एकमेकांचा आदर केला
Charlie Chaplin and Buster Keaton हे दोघे जरी व्यावसायिक प्रतिस्पर्धी असले तरी ते एकमेकांचा आदर करत होते. चॅपलीन यांनी कठीण काळात बस्टर यांना आपल्या चित्रपटात काम दिले ही कृती त्यांंच्यातील मैत्रभाव अधोरेखित करते.Buster Keaton यांची काही वक्तव्येही या मैत्रभावाची ग्वाही देतात.
- “I have always been friendly with Chaplin socially…we spoke the same language!” – Buster Keaton
- “To my mind he is the greatest Director of Comic Actors there is …!” – Buster Keaton
- Charlie Chaplin यांच्यावर जेंव्हा साम्यवादी असल्याचा आरोप करून अमेरिकन सरकारने बंदी आणली तेंव्हा Buster Keaton यांनी उघडपणे त्यांची बाजू घेतली होती.
दोघांना Oscar चा सन्मान
Limelight – London Premier ठरला “Limelight मधून Exit”
19 सप्टेंबर 1952 रोजी Limelight च्या लंडन प्रिमियर साठी चार्ली चॅपलीन लंडनकडे जहाजावर प्रवास करत होते याच वेळी अमैरिकेच्या ॲटॉरनी जनरल यांनी त्यांच्या परतीचा परवाना रद्द केला. चार्ली चॅपलीन यांचे आपली जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या अमेरिकेशी नाते कायमचे तुटले.ते यापुढे युरोपात राहू लागले.
1972 साली Oscar academy ने त्यांना मानाने अमेरिकेत बोलावून Honorary Academy Award अवॉर्ड देवून सम्मानित केले. खालील Youtube link वर तुम्ही हा 44 व्या Oscar सोहळ्यातील ऐतिहासिक भावुक प्रसंग पाहू शकता..
या सोहळ्यासाठी चार्ली चॅपलीन दोन दशकांनंतर आपल्या कर्मभूमीत परतले होते. अवॉर्ड घेताना प्रेक्षकांनी तब्बल 12 मिनिटांचे ऐतिहासिक Standing Ovation (प्रदीर्घ टाळ्यांचा गजर) देवून या महान नटाला सन्मानित केले होते. यावेळी चार्ली चॅपलीन पाणावलेल्या डोळ्यांनी स्टेजवर नि:शब्द उभे राहिले होते.संवेदनशील प्रसंगात निःशब्द होण्याचा त्यांचा स्वभाव असावा. .आपला समकालीन नट बस्टर किटॉन ची स्तूती ऐकून ते असेच एकदा निःशब्द झाले होते.
Buster Keaton यांना चार्ली चॅपलीन आधी Academy Award
Buster Keaton यांना या आधीच 1960 साली Oscar Academy ने Honorary Academy Award देवून सम्मानित केले होते.
शेवट
Oscar academy award मिळाल्यानंतर सहा वर्षांनी February 1966 मधे Buster Keaton यांचे कॅलिफोर्निया येथे निधन झाले. 1972 सारी चॅपलीन यांना मानद Academy Award मिळाले तेंव्हा बस्टर किटॉन या जगात नव्हते ही खेदाची बाब आहे.
25 December 1977 रोजी स्विट्जरलैंड येथे चार्ली चॅपलीन यांचे ही निधन झाले. व या दोन समकालीन महान विभूतींचा अध्याय संपला.
सारांश
चॅपलीन यांच्या चित्रपटातील भावनीक मांडणीमुळे ते वैश्विक व कालातीत झाले. बस्टर किटॉन चे चित्रपट कालातीत नसले तरी आजही ते सिने अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहेत.
Charlie Chaplin and Buster Kiton यांच्या यश अपयशाची तुलना करण्याचे प्रयोजन या लेखाचे नक्कीच नाही.एकाच काळात विनोदाच्या दोन पूर्णपणे भिन्न सिने-भाषा (Cine language) कशा जन्माला आल्या, व दोन महान कलाकारांनी आपले आयुष्य या सिने भाषांना कसे समर्पित ठेवले हे समजून घेण्यासाठी आहे.
संदर्भ सूची
- David Robinson – Chaplin: His life and Art
- Kevin Brownlow and Devid – Hollywood: A Celebration of the American silent film (1980)
- Chrlie Chaplin Archive – अधिकृत संगृह
- British Film Institute (BFI)- Silent film archive
- The international Buster Keaton Society
FAQ
चार्ली चॅपलीन यांन अमेरिकेत पुनः प्रवेश का नाकारला गेला?
1952 साली चार्ली चॅपलीन यांना “साम्यवादी विचारसरणी” असल्याचा केल्याचा आरोप ठेवून अमेरिकेत पुनः प्रवेश नाकारला गेला.
कोणत्या चित्रपटात Buster Keaton व Charlie Chaplin यांनी एकत्र काम केले होते?
Charlie Chaplin यांनी आपल्या Limelight (1952)या बोलपटात Buster Keaton यांना काम दिले होते. या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले.
Charlie Chaplin व Buster Keaton यांच्यामधील नाते कसे होते?
Charlie Chaplin व Buster Keaton हे एकमेकांचा आदर करत होते.बस्टर किटॉन यांनी जाहिर रित्या तशी वक्तव्य केली आहेत. चार्ली चैपलिन यांनी बस्टर किटॉन यांना आपल्या Limelight (1952)या चित्रपटात छोटीशी भूमिका ही दिली होती
Buster Keaton यांना कुठल्या उप नावाने ओळखले जायी?
Buster Keaton यांना The ‘ Great Stone Face’ ( महान पाषाण मुखी) या नावाने ओळखले जायी. कारण ते चित्रपटात नेहमी आपला चेहरा निर्विकार ठेवत.
हे ही वाचा
➡️प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा

