Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

लालबहादूर शास्त्रींमुळे हा आघाडीचा नट Superhit दिग्दर्शक झाला..

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली होती.तेंव्हाचे सुप्रसिद्ध नट मनोजकुमार यांना भेटायला बोलावून’ या घोषणे मधील संदेश लोकांपर्यंत पोहोचेल असा चित्रपट बनव!’ असे त्यांनी मनोजकुमार यांना सुचवले.‌ नट म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मनोजकुमार यांनी प्रथमच दिग्दर्शन करून ‘उपकार’ हा सिनेमा पूर्ण केला होता. –Manoj Kumar directed Bollywood film Upkar

Manoj Kumar as Bharat in film Upkar with Indian flag

शहीद चित्रपटाचा दिल्लीत Special Show

60 च्या दशकात मनोज कुमार हे नट म्हणून सुप्रसिद्ध होते. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद’ चित्रपटात त्यांनी भगतसिंग यांची भूमिका केली होती. शहीद चे दिग्दर्शक S राम शर्मा हे होते. August 1965 मधे दिल्ली च्या प्लाझा थिएटर मधे शहीद सिनेमाचा विशेष खेळ पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. लालबहादूर शास्त्री या चित्रपटाने खूपच प्रभावित झाले . यानंतर मनोजकुमार यांना त्यांनी चहासाठी घरी निमंत्रित केले. या भेटीत त्यांनी मनोजकुमार यांना ”तू माझ्या जय जवान जय किसान या घोषणे मधला संदेश भारतीय लोकांपर्यंत पोहोचेल असा सिनेमा बनव” असे सुचवले.

मनोजकुमार यांनी दिल्ली मुंबई ट्रेन प्रवासात लिहिली पटकथा

प्रत्यक्ष लालबहादूर शास्त्री यांनी चित्रपट बनविण्याचा आदेश दिल्यामुळे मनोजकुमार खूप उत्साहित झाले.‌त्यांनी तात्काळ स्वतः हा चित्रपट लिहिण्याचे काम हाती घेतले. शहीद मधे त्यांनी शहीद भगतसिंग यांची भूमिका करण्यासोबतच चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ही लिहिले होते. हा चित्रपट लेखनाचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी दिल्ली मुंबई ट्रेन चा प्रवास करतानाच चित्रपटाच्या script चा first draft लिहून काढला.सुरूवातीला या चित्रपटाचे नाव ‘ जय जवान जय किसान’ असेच होते पण पुढे ते बदलावे लागले.

File picture of Bollywood Director Manoj Kumar meeting Prime minister Lalbahadur Shstri ji --.Photo courtesy Google

चित्रपटाचे नाव बदलले

Manoj Kumar यांनी मोठ्या उत्साहाने ‘जय जवान जय किसान ‘ या चित्रपटाचे काम पूर्ण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करून त्यानी प्रथमच आपले दिग्दर्शकिय पदार्पण केले. मुख्य भूमिका व पटकथा लेखन ही त्यांचे स्वतःचे होते. पुढे Censor certificate साठी सिनेमा पाठविल्यावर परिक्षण समितीने ‘जय जवान जय किसान ‘ हे चित्रपटाचे नाव बदलण्यास मनोजकुमार यांना सांगितले. Censor board च्या या सूचनेनंतर ‘उपकार’ हे नवे नाव सिनेमाला देण्यात आले.

लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे आकस्मिक निधन

मनोजकुमार यांची भेट झाल्यानंतर 5 महिन्यांतच म्हणजे ११ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री रशिया दौऱ्यावर असताना त्यांचे ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. मनोजकुमार यांनी मात्र चित्रपटाचे काम नेटाने सुरूच ठेवले कारण हा चित्रपट त्यांना दिवंगत पंतप्रधानांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करायचा होता. लालबहादूर शास्त्री यांच्या इच्छेनुसार मनोज कुमार यांनी बनवलेला ‘उपकार’ हा चित्रपट लालबहादूर शास्त्री स्वतः मात्र पाहू शकले नाहीत.

उपकार चित्रपटात दोन भावांची कथा होती

एका सधन शेतकरी कुटुंबातील दोन भावांची ही कथा आहे. मोठा भाऊ ‘भारत’ (मनोज कुमार) हा देशप्रेमी, साधी जीवनशैली जगणारा आणि शेतीवर नितांत प्रेम करणारा असतो, तर लहान भाऊ ‘पुरम’ (प्रेम चोप्रा) हा शहरात जाऊन आधुनिक व सुखवस्तू जीवन जगण्याची स्वप्ने पाहणारा आहे. भारत आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी अनेक त्याग करून त्याच्या पाठीशी उभा रहातो.‌दोघांच्या जीवन मूल्यांचा संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे दिग्दर्शक व अभिनेते मनोज कुमार यांनी उभा केला आहे. या चित्रपटाचा शेवट दोन भावांमधील पुनर्मिलन व‌ समेट दाखवतो

उपकार चित्रपट सुपरहिट ठरला

11 August 1967 रोजी मनोज कुमार दिग्दर्शित पहिला चित्रपट भारतभर रिलीज झाला. या चित्रपटाने Box office वर विक्रमी कमाई केली.

Awards

  • Filmfare चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
  • भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार

हे महत्वाचे पुरस्कार उपकार सिनेमाला मिळाले

मनोज कुमार यांचे भारत कुमार नामकरण

उपकार मधे मनोजकुमार यांच्या पात्राचे नाव भारतकुमार होते. हेच नाव पुढे प्रत्येक चित्रपटात त्यांनी कायम ठेवले.

यशस्वी दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू

उपकार च्या यशानंतर Manoj Kumar यांची Film Director म्हणून कामगिरी सुरू झाली.‌ त्यांनी देशप्रेम व राष्ट्रवाद संकल्पना मांडणारे चित्रपटच प्रामुख्याने बनवले. उपकार नंतरचा त्यांचा सिनेमा ‘पूरब और पश्चिम ‘ हा NRI भारतीयांना भारतात परत बोलावून इथे देश उन्नती चे काम करायला प्रेरित करणारा सिनेमा होता.

उपकारची गाणी विशेष गाजली

उपकार चे संगीतकार कल्याणजी आनंदजी हे होते व गीते इंदीवर , गुलशन बावरा व मूराद यांनी लिहिली होती. उपकार ची दोन गाणी विशेष प्रसिद्ध झाली

  • मेरे देश की धरती सोना उगले – गीतकार इंदीवर
  • कसमे वादे प्यार वफा – गीतकार गुलशन बावरा

मनोज कुमार यांची गाणे चित्रित करण्याची विशेष स्टाईल

मेरे देश की धरती या गाण्याचे चित्रीकरण मनोजकुमार यांनी अतिशय वेगवान व उत्साहवर्धक असे केले आहे. One scene One shot अशा पद्धतीने फक्त focus point बदलत व camera pan करत चित्रिकरण करण्याची त्यांची स्टाईल पुढे त्यांची signature style म्हणून प्रसिद्ध झाली. Low angle shots, Mirror reflection असे कल्पक सिनेमा तंत्र प्रकार वापरून ते आपल्या गाण्यांना कलात्मक दृश्यात्मकता देत.

प्राण यांची विशेष भूमिका

Pran in film Upkar

गावातील मलंग काका हे फकीरासारखे वाटणारे सकारात्मक पात्र खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राण यांनी वठवले होते. १९६५ च्या युद्धात पाय गमालेला हा सैनिक असतो. खलनायक अशी जनमानसात प्रतिमा तयार झालेल्या प्राण यांना ही सकारात्मक भूमिका देवून मनोजकुमार यांनी एक Risk घेतली होती. प्राण यांचे राष्ट्रवादी विचारांचे हे दमदार पात्र प्रेक्षकांना मात्र आवडले होते. या भणंग फकीराचा look लक्षवेधी झाला होता. या पात्राचा मेकअप KV मिरजकर यांनी खूप वास्तववादी असा केला होता.मलंग काका या पात्राला एक महत्वाचे गाणे ( कसमे वादे प्यार वफा) देवून मनोजकुमार यांनी आपली वेगळी दिग्दर्शकीय दृष्टी सिद्ध केली होती.

राष्ट्रभावनेची अजरामर गाणी आजही वाजतात

लालबहाद्दूर शास्त्री यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत मनोज कुमार यांनी शेवटपर्यंत राष्ट्रप्रेमावर आधारित असेच चित्रपट बनवले. त्यांच्या चित्रपटातील देशप्रेमावर आधारित गाणी विशेष गाजली. स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन मनोज कुमार यांच्या चित्रपटातील एक तरी गाणे या दिवशी ऐकायला मिळते.


FAQ

उपकार’ हा मनोज कुमार यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता का?

होय, ‘उपकार’ (१९६७) हा मनोज कुमार यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच (डेब्यू) चित्रपट होता. दिग्दर्शनाचा कोणताही पूर्वअनुभव नसताना त्यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन यशस्वीपणे हाताळले.

लालबहादूर शास्त्री आणि मनोज कुमार यांची भेट कधी झाली होती?

ऑगस्ट १९६५ मध्ये दिल्लीतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात ‘शहीद’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनादरम्यान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि मनोज कुमार यांची ऐतिहासिक भेट झाली होती. (शास्त्रीजींच्या निधनाच्या साधारण ५ ते ६ महिने आधी ही भेट झाली होती.)

‘उपकार’ चित्रपटाची कथा मनोज कुमार यांनी कुठे आणि कधी लिहिली?

दिल्लीत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर, मुंबईला परतताना ट्रेनच्या (रेल्वे) प्रवासातच मनोज कुमार यांनी ‘उपकार’ चित्रपटाची मूळ कथा आणि पटकथा लिहिण्यास सुरुवात केली होती

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना ‘उपकार’ चित्रपट पाहायला मिळाला होता का?

दुर्दैवाने नाही. ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे लालबहादूर शास्त्रींचे अचानक निधन झाले, तर ‘उपकार’ चित्रपट ३० जून १९६७ रोजी प्रदर्शित झाला. शास्त्रीजींच्या निधनानंतर मनोज कुमार यांनी हा चित्रपट पूर्ण करून तो शास्त्रीजींच्या स्मृतीस आणि ‘जय जवान, जय किसान’ या विचाराला समर्पित केला.

उपकार मधे प्रसिद्ध खलनायक प्राण यांनी Positive role केला होता का?

हो. प्राण यांची जनसामान्यांत खलनायक नट म्हणून प्रसिद्ध होती.असे असताना मनोज कुमार यांनी त्यांना प्रथमच positive भूमिका दिली होती,जी प्रेक्षकांना भावली

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment