Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

सात वर्षांनंतर अम्मांची पुणे भेट – तारखा व दर्शन व्यवस्था जाणून घ्या -Amma pune visit

Mata Amruta Nandmai picture courtesy Google

केरळच्या आध्यात्मिक गुरू व hugging Saint म्हणून जगभरात ख्याती पावलेल्या अम्मा या तब्बल सात वर्षांनंतर पुण्याला येत आहेत. दिवाळी नंतर दोन दिवस अम्मा निगडी येथील आश्रमात मुक्काम करणार आहेत व भाविकांना दर्शन देणार आहेत असे कळते.

Amma Pune Visit – अम्मांच्या भेटी निमित्त निगडी, यमुना नगर येथील अम्मांचा आश्रम सुसज्ज करण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. पुणेकरांना Amma च्या दर्शनाची ही संधी सात वर्षांनंतर लाभत आहे. Covid च्या संक्रमण काळानंतर अम्मांची ही प्रथमच पुणे भेट असल्या मुळे भाविकांमधे उत्साह आहे. पुण्यातील निगडी आश्रमातील मुक्काम हा अम्मांच्या संपूर्ण भारत दौर्यातील एक टप्पा असेल असे आश्रम प्रशासना कडून कळते.

पुण्यभूमीत अम्मांच्या मठाचे महत्व

अम्मा यांचे देशभरात व जगात अनेक मठ आहेत. पुण्याची आध्यात्मिक परंपरा पाहता अम्माच्या पुणे मठाचे वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. पुणे ही ‘पुण्य भूमी’ मानली जाते कारण इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच मोर्या गोसावीं सारख्या गणेश उपासकांचे जीवन व्यतीत झाले आहे. इतिहास काळात राजमाता जिजाबाई यांनी पुढाकार घेऊन पुण्यात कसबा गणेश मंदिराची स्थापना केली आहे. त्याच पुण्यभूमी मधे आज माता अमृतानंदमयी यांचा मठ भक्ती व प्रेमाची शिकवण देत आहे.

ममत्व मिठीने कुंडलिनी जागृती

अम्मा आपल्या प्रत्येक भक्ताला वैयक्तिक भेटतात व त्यांची दैवी ममत्वाने भारलेली मिठी देतात. अम्मांच्या या मिठीने कुंडलिनी जागृती होते अशी श्रद्धा आहे. आत्तापर्यंत ८ कोटी लोकांना अम्मांनी ही दैवी ममत्व मिठी दिली आहे.

अम्मांच्या पुणे मुक्कामाच्या तारखा

  • दिनांक १४ नोव्हेंबर २०२६
  • दिनांक १५ नोव्हेंबर २०२६

या दोन दिवशी अम्मा यमुना नगर,निगडी येथील आश्रमात भक्तांना दर्शन देणार आहेत. Amma Pune Visit

सकाळची पूजा व दर्शन वेळ

A sign Board at Amma Math Nigadi,Pune displaying the time and date of Pooja.
Puja Vidhi at Pune Amma math time and date board
  • 14 नोव्हेंबर 2026 शनीवारी सकाळी 7 वाजता ‘राहू दोष निवारण पूजा‘ विधी संपन्न होईल.
  • तसेच रविवारी 15 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 7 वाजता शनी दोष निवारण पूजा विधी संपन्न होईल.

दर्शन व्यवस्था – Amma Pune Visit

सकाळी पूजेस उपस्थित राहणार्या भाविकांना एक टोकण दिले जाईल . पूजा विधी संपन्न झाल्यावर सदर टोकण दाखवून भाविकांना अम्मांच्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. हे दर्शन अम्मांच्या मठा शेजारील शाळेच्या इमारतीत नियोजित होण्याची शक्यता आहे.

अम्मांच्या निगडी स्थित आश्रमाचा पत्ता- Mata Amrita nandmayi Math

Amma Math Nigadi gate with a billboard about Ammas pune visit
Amma Math Nigadi,Pune Gate

Yamunagar,Sector No. 21, Mata Amrit Dyan Marg, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044


आश्रम (Mata Amritanandmayi Math) कार्यालय संपर्क क्रमांक

  • +91 8956085286

निगडी मठाचे सुशोभिकरण

अम्मांच्या पुणे भेटी निमीत्ताने निगडी, यमुना नगर येथील मठाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.मुळातच विशिष्ट पारंपरिक केरळ स्थापत्यामधे बांधलेले हे मंदिर व मठ परिसर आहे. इथली गर्द झाडी व पारंपरिक Indian Red रंगात सजलेल्या भिंती व लाल कौलारू छत आपल्याला नकळत केरळच्या निसर्गात घेवून जाते. मंदिरा समोरची दीपमाळ जेंव्हा दिव्यांनी सजते तेंव्हा रात्रीच्या वेळी हे मंदिर स्वर्गीय शांती चे प्रतीक होते. अम्माच्या आगमना दिवशी ही दीपमाळ दिव्यांनी सजण्यास आतूर आहे असेच सध्या वाटत आहे.

Amma Math Nigadi Courtyard
Amma Math Nigadi,Pune
Amma Math Nigadi Pune
Amma Math Nigadi Pune
Amma Math Nigadi Pune
Amma Math Nigadi,Pune

अम्मा यांचा संपूर्ण भारत दौरा असा असेल

  • ०२ – ०३ नोव्हेंबर: म्हैसूर (Mysuru)
  • ०६ – ०७ नोव्हेंबर: बेंगळुरू (Bengaluru)
  • १० – ११ नोव्हेंबर: हैदराबाद (Hyderabad)
  • १८ – १९ नोव्हेंबर: मुंबई (Mumbai) – ब्रह्मस्थान मंदिर
  • २१ – २२ नोव्हेंबर: अहमदाबाद (Ahmedabad)
  • २६ – २७ नोव्हेंबर: दिल्ली (Delhi)
  • ३० नोव्हेंबर: फरिदाबाद (Faridabad)
  • (टीप: अम्मा यांच्या या भारत दौऱ्याची सांगता ५-६ डिसेंबर रोजी कोलकाता येथे होईल.)

अम्मा यांच्या पुणे भेटीदरम्यान ते भाविकांना वैयक्तिक दर्शन व आशिर्वाद देणार आहेत. आपली दर्शन वेळ सुनिश्चित करण्यासाठी सकाळी पूजा विधी आधी Token घेणे गरजेचे आहे.‌ हे टोकण First come First serve या तत्वावर देण्यात येणार असल्याने भाविकांनी शक्यतो लवकर पूजा स्थळी उपस्थित रहावे असे मठ प्रशासना तर्फे मंदीर पुजारी स्वामी राजेश यांनी सांगितले.

दर्शन संदर्भात व इतर माहिती साठी आपण दिलेल्या फोन नंबर वर किंवा कार्यालयीन वेळात प्रत्यक्ष मठ कार्यालयात संपर्क साधू शकता.


टीना टर्नर चं अध्यात्म : Nichiren Buddhism ने बदललं आयुष्य

Pop Queen Madona ने आदी शंकराचार्यांचा संस्कृत श्लोक गायला आहे – Material Girl ने कुंभ स्नान ही केले होते..

Tara – अध्यात्मातील पहिली महिला गुरू- तिचा मंत्र Green Tara Mantra शक्तिशाली मानला जातो

भूमी स्पर्श मुद्रा कशी करावी – Bhumi Sparsha Mudra मार्गदर्शन आणि त्यामागील कथा जाणून घ्या…

महाकुंभ- निमंत्रण वा घोषणे शिवाय हजारो भक्त येतात- mahakumbh ‘घडण्याची’ अद्भुत परंपरा…

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment