Apple iPhone logo design हे आज status symbol झाले आहेत. “चावा घेतलेल्या उष्ट्या सफरचंदाचे हे चित्र” डिझायनर Rob Janoff यांनी बनवले. Rob यांचे हे उष्टे सफरचंद काहींना Adam and Eve च्या गोष्टीतील सफरचंद वाटते..आणि काहींच्या मते ही एका computer गुरू ला श्रद्धांजली आहे ज्याचा मृत्यू विषारी सफरचंद खाल्ल्याने झाला होता.

Apple लोगो चिन्ह : जन्म कथा व अख्यायिका
डिझायनर: रॉब जानॉफ (Rob Janoff)
रॉब जानॉफ, एक प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर, यांनी Apple iPhone logo design ही एक जगप्रसिद्ध लोगो डिझाइन आहे . 1977 साली ऍपल कंपनीने नवीन लोगो डिझाइन करण्याचे काम Rob Janoff यांना सोपवले होते. त्यानंतर त्यांनी साधेपणा, सौंदर्य आणि नवतेचा विचार करून Apple साठी लोगो तयार केला.
संकल्पना: साधेपणातून प्रभावी ओळख
Apple चे मालक स्टीव्ह जॉब्स यांनी “मला अतीशय साधा व सोपा लोगो हवा आहे जो इंटरेस्टिंग असेल व लक्षात ही रहायला हवा” असे डिझायनर राॅब जानाॅफ यांना सांगितले . राॅब जानाॅफ यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या अपेक्षे नुसार सफरचंदाचा आकार दाखवणारा लोगो Apple Software company साठी बनवला . ज्यात साधेपणा आणि आकर्षकता यांचा संगम दिसून येत होता . पण लोगो च्या या पहिल्या आवृत्तीत सफरचंदाला चावा (bite) नव्हता. हा चावा नंतर अंतर्भूत करण्यात आला.
सफरचंदाचा चावा नंतर अंतर्भूत केला गेला
Apple iPhone logo design मधील या सफरचंदाचा चावा घेतलेले दाखवण्या मागे एक कारण होते.
proportion चे कारण
मूळ Apple Logo हे एक फ्लॅट 2D design होते. या सफरचंद आकृती ला खाल्लेले किंवा bite केलेले दाखवले नव्हते. या अखंड सफरचंदाच्या चित्रा ला पाहताना आकृती चे आकारमान (Proportion) स्पष्ट होत नसल्याने पाहणाऱ्याला ते चेरी किंवा टमाटोचे चित्र ही वाटू शकत होते असे डिझायनर Rob Janoff यांच्या लक्षात आले. Logo design मधील ही चूक दुरुस्त करण्यासाठी डीझायनर Robert यांनी एक बदल करण्याचे ठरवले. या सफरचंदाला त्यांनी एक चावा (bite) घेतलेला दाखवला. या बदलामुळे ते लोगो चित्र निश्चित पणे सफरचंदाचेच आहे असे वाटू लागले.
हा चावा अर्थात ‘इंग्रजी मधील Bite हा शब्द’ संगणकीय भाषेतील BYTE (Computer Memory unit )सारखाच ध्वनित होत असल्याने Logo मधले bite म्हणजे संगणकीय ज्ञानाचा घास असा अर्थ ही यातून सूचित होत होता.
अशाप्रकारे मूळ सफरचंदाला चावा घेतल्याचे नंतर दाखविण्यात आले व या चाव्याने लोकांचे लक्षही वेधले. Designer Rob Janoff ने असे का दाखवले असावे याबद्दल काही तर्क मांडले जावू लागले. यातील समर्पक वाटणारा एक तर्क म्हणजे .. या चाव्याच्या दृष्यातून Rob Janoff ने प्रसिद्ध गणितज्ञ व computer Genius Alan Turing यांना श्रद्धांजलि दिली आहे.
Apple iPhone logo design मागील प्रचलित लोककथा खालील प्रमाणे आहेत

कंप्युटर जीनिअस Alan Turing यांना श्रद्धांजली?
ॲलन ट्युरिंग (Alan Turing) हे ब्रिटनचे महान गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ होते. आजच्या आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) चे ते जनक मानले जातात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी जर्मन सैन्याचे गूढ ‘एनिग्मा’ (Enigma) कोड क्रॅक करणारे मशीन तयार करून लाखो लोकांचे प्राण वाचवले होते.
१९५४ साली गणितज्ञ व computer Genius असलेला एलन ट्यूरिंग यांनी साईनाईड विषाने बाधीत झालेला सफरचंद खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला होता असे तपासात आढळले होते. चावा घेतलेले हे सफरचंद त्यांच्या मृतदेहाजवळ आढळले होते. ही आत्महत्या होती की खून याबद्दल अनेक तर्क आहेत. पण एलन हा कंप्युटर मधला गुरू माणूस होता व त्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी स्थापित झालेल्या Apple या कंपनीने आपल्या लोगो द्वारे त्याला श्रद्धांजली दिली आहे असा एक समज जनमानसात आहे.
बायबल कथा (Genesis Chapter 3)संदर्भ: ज्ञानाचे प्रतीक
Apple चा लोगो हा अनेकजणांनी बायबलमधील संदर्भा नुसार ‘आदाम आणि ईव्हच्या कथेशी’ जोडलेला मानला आहे. बायबलमध्ये सफरचंद हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे, ज्यामुळे मानवाने आपलं भविष्य निवडण्याची क्षमता प्राप्त केली. अशाप्रकारे, Apple लोगो तंत्रज्ञानाच्या जगातल्या ज्ञानाच्या वाटचालीचं प्रतीक आहे.
न्यूटन चं ॲपल
काही लोक या Apple logo चिन्हा ला न्यूटन च्या Gravity सीद्धांताला जन्म देणार्या सफरचंदाशी जोडून ते विज्ञानवादाचे प्रतीक आहे असे मानतात.
खरंतर या तिन्ही कथा वास्तवापासून दूर आहेत पण Alon Turing यांची कथा ही तथ्यपूर्ण नसली तरी भावनीक कसोटीवर खरी वाटते . Apple Company चे मालक Steve Jobs यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी दिलेले खालील उत्तर एकाच वेळी नकारार्थी पण काहीसे होकारार्थी वाटते.
Hollywood अभिनेते स्टीफन फ्राय यांनी आपला मित्र असलेल्या Apple च्या निर्मात्या स्टीव्ह जॉब्स ला एकदा विचारले होते की “खरंच का तो Apple logo ॲलन ट्यूरिंग ला श्रद्धांजली आहे?” यावर स्टीव्ह जॉब्स ने …
“God!! …We wish it were!” (देवा! खरंच तसे असायला हवे होते!”)
असे उत्तर देवून Alan Turing यांच्या बदद्ल चा आपला आदर्श प्रदर्शित केला होता.
लोगोतील बदल:
Apple iPhone logo design सुरुवातीला Rainbow colour पट्ट्यांमधे होते. ते जीवनातील विविध रंग आणि तंत्रज्ञानाच्या रंगीत दुनियेचे प्रतीक होते. कंप्युटर ची रंगीत चित्रे बनवण्याची क्षमता हा इंद्रधनू अधोरेखित करीत होता. पूढे 1998 मध्ये ऍपलने या लोगो मधे बदल केला . इंद्रधनू रंगपट्यां ऐवजी मोनोक्रोम रंगात नवा Apple logo सादर झाला जो कंपनीच्या धोरणातील साधेपणाचा आणि आधुनिकतेचा विचार दर्शवतो.
ऍपल लोगो ची प्रतिकात्मकता : Digital Revolution चं एक जागतिक प्रतीक
Apple चा logo हा आता केवळ कंपनीचं चिन्ह नसून तो जागतिक लक्झरी ब्रँडची ओळख बनला आहे. हा लोगो तंत्रज्ञानाच्या दुनियेतला नवा दृष्टीकोन आणि यशाचं प्रतीक बनला आहे . २१ व्या शतकातील Digital क्रांतीचं प्रतीक ही तो आहे.
ऍपल लोगोच्या लोकप्रियतेमागील मानसशास्त्र
ऍपलच्या लोगोची रचना इतकी साधी आकर्षक का आहे यामागील मानसशास्त्र देखील समजून घेण्यासारखं आहे. या चावा घेतलेल्या सफरचंदाच्या आकारात ‘Digital Knowledge Bite‘असा एक स्पष्ट संदेश आहे. एक कल्पक डिझाईन म्हणून चावा घेतलेले हे सफरचंद पाहणार्याची उत्सुकताही वाढवते.
Logo च्या प्रतिकात्मक दृष्यातून सहसा पुर्णत्व दाखवण्याचा प्रघात आहे पण या प्रघाताला Apple logo ने मोडीत काढले. Apple ने अर्धवट खाल्लेले असे उष्टे सफरचंद लोकांपुढे ठेवले . तसेही भारतीय जनमानसात रामायणातील शबरीच्या उष्ट्या बोराची महती प्रचलीत आहेच. Apple iPhone च्या या logo मधे सफरचंदाच्या फळाचा रसरशीतपणा व त्याचं पौष्टीक मूल्य आणि विशिष्ट गोडवा समाविष्ट होतो . सफरचंद या फळाची गुणवत्तापूर्ण ‘रसता’ जगमान्य आहे व आपले product या जगमान्यते बरहुकूम ‘सरस’ आहे असे Apple company सूचित करते. ज्ञानाचा हा पौष्टिक घास (bite)तुम्हीही घ्या असे Apple आपल्याला logo द्वारा आग्रहाने सांगते.
निष्कर्ष
Apple चा logo हा केवळ एक साधे चिन्ह राहिले नसून, ते तरुणाईसाठी एक Status Symbol झाले आहे. तंत्रज्ञानाच्या युगाचे ते एक क्रांतिकारी चिन्ह ही बनले आहे. डिझाईन मधील साधेपणा, अर्थगर्भता, आणि सूचकता यामुळे त्याने लोकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केले आहे.
FAQ
Apple चा प्रसिद्ध लोगो कोणी डिझाइन केला आहे?उत्तर: Apple चा प्रसिद्ध लोगो ग्राफिक डिझायनर रॉब जानॉफ (Rob Janoff) यांनी १९७७ मध्ये डिझाइन केला होता.
Apple चा प्रसिद्ध लोगो ग्राफिक डिझायनर रॉब जानॉफ (Rob Janoff) यांनी १९७७ मध्ये डिझाइन केला होता.
Apple च्या लोगोमधील सफरचंदाला चावा (Bite) का दाखवला आहे?
मूळ लोगोमधले सफरचंद हे चेरी (Cherry) किंवा टोमॅटोसारखे वाटू नये आणि त्याचे योग्य आकारमान (Proportion) लक्षात यावे, म्हणून त्यात चावा (bite) अंतर्भूत करण्यात आला. तसेच, संगणकाच्या भाषेतील ‘Byte’ शी त्याचा अर्थ जोडला जातो.
Apple च्या लोगोचा आणि संगणकतज्ज्ञ ॲलन ट्युरिंग (Alan Turing) यांचा काही संबंध आहे का?
जनमानसात अशी लोककथा प्रचलित आहे की, विषारी सफरचंद खाऊन मृत्यू झालेल्या ॲलन ट्युरिंग यांना श्रद्धांजली म्हणून हा लोगो बनवला गेला. परंतु, Apple Company चे मालक Steve Jobs यांनी हे स्पष्ट केले आहे की ही केवळ एक कथा आहे.
Apple चा सुरुवातीचा लोगो कसा होता?
सुरुवातीला Apple चा लोगो रंगबेरंगी (Rainbow stripes) पट्ट्यांमध्ये होता, जो ॲपल कॉम्प्युटरच्या रंगीत डिस्प्ले क्षमतेचे प्रतीक होता. १९९८ मध्ये यात बदल करून तो सध्याच्या मोनोक्रोम (एकरंगी) रूपात आणला गेला.
हे ही वाचा:
माणसाच्या मेंदूत ही बसवणार चिप:Elon Musk यांचा Neuralink project
Google चा जेमीनी AI मराठीत माहिती सांगणार
पृथ्वी ते स्पेस स्टेशन चे अंतर आहे मुंबई ते वडोदरा एवढे
झुकरबर्ग ला 7800 कोटींचा दंड – वकीलाचा एक शब्द पडला महाग – जाणून घ्या- Meta Case Court room drama

