Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Lipstick Index : ‘lipstick च्या विक्रीत वाढ’ म्हणजे येणार्या आर्थिक मंदी ची सूचना?!’- रंजक अर्थशास्त्र संकल्पना जाणून घ्या

महिला लिपस्टिक खरेदीवर जास्त पैसे खर्च करू लागल्या तर देशात आर्थिक मंदी येण्याची ती पूर्वसूचना समजावी असे सूत्र Leonard Lauder या अमेरिकन उद्योगपतीने मांडले.जागतिक ब्रांड असलेल्या एस्टेन लॉडर सौंदर्य प्रसाधन कंपनीचे ते मालक होते. त्यांच्या या अभिनव व रंजक अर्थशास्त्रीय सूत्राला Lipstick Index म्हणतात.

Lipstick and an analytical graph paper -Symbolic Image made with AI

‘आर्थिक मंदी’ वर लिपस्टिक करते शिक्का मोर्तब 

Lipstick हे महिलांचे एक आवडते सौंदर्य प्रसाधन आहे. वेगवेगळ्या रंगांच्या शेड मध्ये हे प्रसाधन बाजारात उपलब्ध असते. मेक-अप मधला पटकन होणारा व प्रभावी विधी म्हणजे lipstick रंग लेपन. स्त्रीयांना चेहरा पटकन ऊर्जावान व आकर्षक करायचा असतो तेंव्हा त्या पटकन lipstick ने ओठ रंगवतात. याच Lipstick चा व आर्थिक मंदीचा संबंध (Recession and lipstick connection) आहे हे समीकरण एका अमेरिकन उद्योगपतीने मांडले आहे. हा एक अर्थशास्त्रीय अंदाज आहे व तो Lipstick Index म्हणून ओळखला जातो. गृहिणींच्या खरेदीच्या मानसिकतेचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवला जातो.

गृहिणींच्या खरेदी ट्रेंड वरून आर्थिक अंदाज

Family हे समाजव्यवस्थेत एक महत्त्वाचे unit जर मानले तर या Unit चा प्रमुख म्हणून घराचे अर्थकारण महिला सांभाळत असतात. जेंव्हा आर्थिक मंदी ची चाहूल लागते तेंव्हा घरात पैशांची चणचण सुरू झालेली असते.‌ अशा वेळी मनातील उदासी वर मात करण्यासाठी महिला गडद रंगाच्या लिपस्टिक जास्त वापरू लागतात व एक प्रकारे येणाऱ्या आर्थिक मंदीवर शिक्कामोर्तब करतात असा अंदाज Lipstick Index सांगते.

Warren Buffett यांनी केली होती सौंदर्य प्रसाधन कंपनीत गुंतवणूक

मागील अमेरिकन इलेक्शन च्या अगदी तोंडावर अमेरिकन अब्जाधीश व गुंतवणूकदार वाॅरन बफेट यांनी एका सौंदर्य प्रसाधन निर्मिती कंपनी मधे खूप मोठी गुंतवणूक केली होती.‌या घटनेनंतर ‘ आर्थिक मंदी येणार आहे म्हणूनच वॉरन बफेट यांनी दूरदर्शीपणे ही गुंतवणूक केली आहे ‘अशी चर्चा अमेरिकन सोशल मीडियावर सूरू झाली होती . अर्थतज्ञांनी ही संकल्पना पूर्णतः: स्वीकारली नसली तरीही या Lipstick Index ची चर्चा होत असते. महिलांच्या मानसिकतेवर आधारलेली ही संकल्पना एस्टे लॉडर ( Estee Lauder) या अमेरिकेतील प्रसिद्ध Cosmatic Industry चे मालक असलेल्या Leonard Lauder या उद्योगपतीने मांडली आहे.

Lipstick Index : अर्थव्यवस्था आणि सौंदर्य प्रसाधन यांची सांगड घालत लिओनार्डो लॉडर यांनी मांडली होती संकल्पना 

लिओनार्डो लॉडर, ज्येष्ठ अमेरिकन उद्योगपती व ‘एस्टे लॉडर कॉस्मेटिक्स’ (Estée Lauder Companies Inc.)या Premium Brand असलेल्या जगप्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनी चे अध्यक्ष, यांनी 2001 साली एक अनोखी संकल्पना मांडली जी “Lipstick Index” या नावाने ओळखली जाते. 2001 सालची त्यांची ही संकल्पना lipstick विक्रीला अर्थशास्त्रीय घडामोडींशी जोडते. 

The world RECESSION is written on a washroom mirror with lipstick. The symbolic picture is made with AI for a blog about Lipstick-Index theory

2001 ची आर्थिक मंदी (Recession)

2001 च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात लिओनार्डो लॉडर यांच्या असे लक्षात आले की अमेरिकन महिलांकडून अचानक lipstick खरेदीमध्ये वाढ झाली आहे. या trend वरून‌ त्यांनी असा दावा केला की lipstick खरेदीत अचानक झालेली वाढ‌ म्हणजे आर्थिक मंदीची संभाव्यता आहे.

Lipstick Index नुसार : मंदीच्या काळात महिलांचा आत्मविश्वास वाढवणारा स्वस्त उपाय आहे Lipstick 

लिपस्टिक इंडेक्सचे विश्लेषण असे करता येते की आर्थिक संकटांच्या काळात महिला वर्ग मोठे खर्च टाळतो, जसे की लक्झरी कपडे किंवा उच्च ब्रांड ची पादत्राणे दागिने किंवा मोठे घरगुती उपकरणे खरेदी करणे. त्याऐवजी‌ त्या छोटे पण मनाला समाधान देणारे असे खर्च करतात. आर्थिक चणचणीत, लिपस्टिक सारख्या स्वस्त सौंदर्य उत्पादनांची विक्री वाढते कारण ती परवडणारी लक्झरी मानली जाते. लिओनार्द लॉडर यांच्या मते, मंदीच्या काळात महिलांना आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि मानसिक समाधानासाठी लहान खर्च करणे आवडते, आणि आर्थिक मंदी काळात वाढलेली महिलांची लिपस्टिक  खरेदी हे त्याचेच प्रतीक आहे.

लिपस्टिक विक्रीमागील मनोविज्ञान व लाल रंग प्रतिकात्मकता

   

Lipsticks of diffrent shades shattered on table surface. Picture made with AI

लिपस्टिकचा उबदार गडद रंग, त्याची चमक, आणि त्यातून मिळणारा आत्मविश्वास यामुळे अनेकदा महिलांचा mood uplift होतो. आर्थिक चणचणीणधील काळजी विसरण्यासाठी गडद रंगाची लिपस्टिक महिला लावतात व‌ स्वत:चे मनोबळ त्या एकप्रकारे उंचावतात . कला विश्वात ही लाल रंग हा ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरला जातो.

कला जगत व धर्म-विधींमधील प्रतीकात्मकता

सिने जगतात मेकअप कलाकारांनी याच लिपस्टिक च्या वापराने अभिनेत्रींना Iconic look दीले आहेत. मेर्लीन मन्रो ( Merylin Monroe) चे उदाहरण याबाबत देता येते. भारतीय अध्यात्मात व धार्मिक विधींमध्ये सुद्धा “शक्ती” या अर्थाने लाल रंगाच्या वापराचे महत्त्व आहे .

2001 च्या आधी इतिहासातील 1929 चे उदाहरण

2001 च्या अमेरिकन मंदीच्या काळात लिपस्टिकची विक्री वाढल्याचे लॉडर यांनी पाहिले होते पण यापूर्वीही अशाच परिस्थितीची नोंद इतिहासात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 1929 च्या महामंदीच्या काळात सौंदर्य उत्पादनांच्या विक्रीत विशेष वाढ झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वस्त सौंदर्य उत्पादने विकत घेण्याचा कल महिलांमधे दिसून आला होता. या उदाहरणांतून असे दिसून आले की मंदीच्या काळात महिलांचा सौंदर्यविषयक खर्च कमी होत नाही, तर तो सहज परवडणाऱ्या गोष्टींवर केला जातो.

लिपस्टिक इंडेक्सवर टीका

लिपस्टिक इंडेक्स ही कल्पना अनेक वेळा सत्य ठरली आहे, पण यावर काही टीका देखील झाली आहे. आजच्या डिजिटल युगात, महिलांची खरेदीची सवय बदलली आहे. महिलांची सौंदर्य उत्पादनां बाबत ची पसंती ही अधिक विस्तृत झाली आहे, ज्यामध्ये फक्त लिपस्टिकच नव्हे तर इतर नवनवीन सौंदर्य उत्पादनेही त्या घेत असतात. शिवाय, काही तज्ञांच्या मते लिपस्टिक विक्रीत वाढ झाली असली तरी, ती मंदीची अचूक सूचक ठरत नाही‌ .केवळ एका लिपस्टिक सारख्या क्षुल्लक उत्पादनाच्या विक्रीवर अर्थशास्त्रीय आडाखा मांडणे या अर्थशास्त्रज्ञांना मान्य दिसत नाही.

आधुनिक काळातील Digital Revolution मुळे बदल

2001 च्या आर्थिक मंदी नंतर आता खूप मोठा काळ लोटला आहे. Digital revolution मुळे जग पूर्णत: बदलले आहे . Which is the Best Lipstick असे internate वर शोधले तर शंभर रुपयां पासून काही हजार रूपयांपर्यंतच्या रेंज च्या Lipstick विक्रीस उपलब्ध दिसतात.उत्पादनांची श्रेणी ही आता अधिक विस्तारित झाली आहे. आज, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने, ऑनलाइन खरेदी, आणि सौंदर्य सेवांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ‘लिपस्टिक इंडेक्स’ हा Recession Indicator म्हणून पूर्णतः वापरता येणार नाही. आर्थिक संकटांच्या काळात मन गुंतवण्यासाठी स्त्रीया लहान, परवडणाऱ्या डिजिटल उत्पादनांची किंवा चायना निर्मित Gadgets ची ही खरेदी करू शकतात.

निष्कर्ष

उपभोक्ता उद्योग हा मानवी भावना अभ्यासून आपला खप वाढवत असतो,पण सामाजिक-आर्थिक अस्थिरतेतून निर्माण झालेली मानवी भावना एखाद्या वस्तूचा खप वाढवते व त्यातून येणाऱ्या आर्थिक संकटाचा अंदाज बांधला जातो ही कल्पना विलक्षण आहे. Lipstick Index ही लिओनार्डो लॉडर यांनी मांडलेली एक वेगळीच व मनोरंजक आर्थिक संकल्पना म्हणावी लागेल.


FAQ

‘लिपस्टिक इंडेक्स’ (Lipstick Index) म्हणजे काय?

लिपस्टिक इंडेक्स ही एक आर्थिक संकल्पना आहे. त्यानुसार जेव्हा देशात आर्थिक मंदी येणार असते, तेव्हा लिपस्टिकच्या विक्रीत अचानक मोठी वाढ दिसते. ही वाढ मंदी येण्याचा संकेत मानला जातो.

ही संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली?’

एस्टे लॉडर’ (Estée Lauder) या प्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनीचे अध्यक्ष लिओनार्ड लॉडर यांनी २००१ मधील आर्थिक मंदीच्या काळात ही संकल्पना मांडली होती.

आर्थिक मंदीत लिपस्टिकची विक्री का वाढते?

आर्थिक मंदीच्या किंवा Recession काळात लोक महागड्या वस्तू (उदा. नवीन कपडे, गाड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू) खरेदी करणे टाळतात. महिला वर्ग स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी लिपस्टिकसारख्या लहान व परवडणाऱ्या लक्झरी वस्तू खरेदी करतात.

Lipstick Index या सिद्धांताला इतिहासात काही आधार आहे का?

होय, १९२९ मधील ‘ग्रेट डिप्रेशन’ (महामंदी) आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातही आर्थिक संकट असताना lipstick सारख्या स्वस्त सौंदर्य प्रसाधनांच्या (Cosmetics) विक्रीत मोठी वाढ झाली होती.

लिपस्टिक इंडेक्स हा मंदी ओळखण्याचा १००% अचूक निर्देशांक आहे का?

नाही. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते, हा मंदीचा एकमेव किंवा पूर्णपणे अचूक म्हणावा असा निर्देशांक नाही. विशेषत: आजच्या डिजिटल युगात एकूणच लोकांची पसंती डिजिटल वस्तू आणि टेक गॅजेट्स घेण्याकडे वळली आहे

▶️Johatsu – जपानमधे दर वर्षी १ लाख लोक स्वेच्छेने अदृश्य होत आहेत. का? आणि कसे? जाणून घ्या

▶️जहाज अपघातानंतर समुद्रात पडलेल्या प्लास्टिक बदकांचा 17000 KM प्रवास – शोधले नवे सागरी मार्ग

▶️भारतीय म्हशी 1400 वर्षांपूर्वी पोहोचल्या होत्या Italy मधे- Mozzarella cheese त्यांच्याच दुधापासून बनले

▶️‘जनं गणं मनं’ गीताचे फक्त पहिले कडवे National Anthem झाले – मूळ गीत 5 कडव्यांचे आहे – टागोरांनी लिहिलेले पूर्ण राष्ट्रगीत जाणून घ्या

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment